पुणे जिल्ह्याच्या धरणक्षेत्रात पावसाची हजेरी

पुणे जिल्ह्याच्या धरणक्षेत्रात पावसाची हजेरी
पुणे जिल्ह्याच्या धरणक्षेत्रात पावसाची हजेरी

पुणे : सह्याद्रीच्या पूर्व उतारावर असलेल्या जिल्ह्याच्या मावळ पट्ट्यातील धरण क्षेत्रात पावसाने मध्यम ते जोरदार हजेरी लावली आहे. रविवारी (ता. १२) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये झालेल्या पावसामुळे धरणांमधील पाण्याची आवक वाढली असून, पाणी सोडण्यात येत आहे. खडकवासला साखळीतील धरणांमधून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला आहे. खडकवासला धरणातून सकाळी नऊ वाजता कालवा, बंद पाइपलाइन आणि सांडव्यातून एकूण ८ हजार २९२ क्युसेक विसर्ग सुरू होता.

खडकवासला धरण साखळीतील पानशेत, टेमघर धरण क्षेत्रात पावसाने जोर धरल्याने पानशेतमधून ३ हजार ५६४, तर टेमघर धरणातून ७६८ क्युसेक विसर्ग सुरू आहे. या पाण्यासह पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसाने खडकवासला धरणामध्ये पाण्याची आवक वाढल्याने शनिवारी सांयकाळपासून धरणातून ३४२४ क्युसेक वेगाने मुठा नदीपात्रात पाणी सोडण्यात येत होते. दुपारी १ वाजता विसर्ग वाढवून ६ हजार ६४८ करण्यात आला होता.

पवना, कलमोडी, चासकमान, आंद्रा ही धरणे १०० टक्के भरल्याने धरणातून पाण्याचा विसर्ग सुरूच आहे. पवना धरणातून एकूण २ हजार २०८, कलमोडी ८६०, चासकमान ४ हजार ५३५, आंद्रा ६५ विसर्ग सुरू आहे. नीरा खोऱ्यातील तर नीरा देवघर धरणामधून ७५० आणि वीर धरणातूनही २ हजार ३७७ क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात येत आहे. कुकडी खोऱ्यातील येडगाव धरणातून १ हजार ४०२ क्युसेक, वडज १५२ क्युसेक, डिंभे ७५० क्युसेक, चिल्हेवाडी ४ हजार ५५६ क्युसेक, घोड धरणातून ६१५ क्युसेक वेगाने, तर उजनी धरणातूनही ४ हजार १५० क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू असल्याचे पाटबंधारे विभागातर्फे सांगण्यात आले.  

रविवारी (ता. १२) जिल्ह्यातील धरण क्षेत्रात पडलेला पाऊस (मिलिमीटरमध्ये) : टेमघर १०१, वरसगाव ४१, पानशेत ४५, खडकवासला ७, पवना ७१, कासारसाई ९, मुळशी ४६, कलमोडी ३५, चासकमान ६, भामा अासखेड ७, आंद्रा १२, वडीवळे ४०, गुंजवणी २४, भाटघर ७, नीरा देवघर ३८, वीर १, पिंपळगाव जोगे १४, माणिकडोह ८,  येडगाव १, वडज २, डिंभे ६.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com