पुणे जिल्ह्यात धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस

पुणे जिल्ह्यात धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस
पुणे जिल्ह्यात धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस

पुणे ः धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असून अनेक भागात पावसाची संततधार सुरू होती. गुरुवारी (ता. २२) सकाळी आठ वाजेपर्यंत वडीवळे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सर्वाधिक ५६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे ओढे, नाले खळाळून वाहत असून धरणातील पाणीपातळीत चांगलीच वाढ झाली आहे.

पुणे जिल्ह्याच्या पश्चिमेकडील मावळ, मुळशी, भोर, वेल्हा, हवेली आणि उत्तरेकडील खेड, आंबेगाव, जुन्नर तालुक्यांत दिवसभर भागात पावसाची संततधार सुरू होती. पश्चिमेकडील मावळ, मुळशी, भोर, वेल्हा तालुक्यांत पावसाने दमदार हजेरी लावली. भोर तालुक्यातील भोळावडे येथे सर्वाधिक ६८ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली. पूर्वेकडील तालुक्यात पावसाच्या अधूनमधून सरी बरसत होत्या. त्यामुळे खरिपातील पिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

गेल्या आठवड्यापासून पुणे जिल्ह्यातील बहुतांशी भागात ढगाळ हवामान आहे. चार ते पाच दिवसांपासून पश्चिमेकडील मावळ, मुळशी, भोर, वेल्हा तालुक्यांत सकाळपासून संततधार चालू आहे. त्यामुळे भात पिकांना चांगलाच दिलासा मिळत असून काही ठिकाणी भात लागवडी अंतिम टप्‍प्यात आल्या असून अनेक ठिकाणी भाताची वाढही जोमदार आहे. वडीवळे धरणाच्या पाणलोट क्षेत्रानंतर नीरा देवधर आणि टेमघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ५१ मिलिमीटर पाऊस पडला.

पानशेत ४३, मुळशी ३८, पवना ४०, वरसगाव ३८, गुंजवणी ३६, पिंपळगाव १७, भाटघर १७, कळमोडी १५, खडकवासला १४, आंध्रा १३, माणिकडोह, डिंभे १२, भामाआसखेड १०, कासारसाई १०, घोड पाच, चासकमान तीन, वीर, नाझरे, येडगाव, वडज धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दोन मिलिमीटर पाऊस पडला. त्यामुळे नीरा देवधर, भाटघर, वीर, कळमोडी, चासकमान, भामाआसखेड, वडीवळे, आंध्रा, पवना, मुळशी, वरसगाव, पानशेत, खडकवासला ही धरणे शंभर टक्के भरली असून उर्वरित टेमघर, कासारसाई, पिंपळगाव जोगे, माणिकडोह, येडगाव, वडज, डिंभे, घोड, विसापूर या धरणांतील पाणी पातळीत वाढ होऊ लागली आहे. या भागात पावसाची अशीच स्थिती आठ दिवस राहिल्यास ही धरणे भरण्याची शक्यता आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com