वायव्य, मध्य भारतात पावसाची हुलकावणी

पाऊस
पाऊस

पुणे ः यंदा देशात चांगला पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला होता. तरी दरवर्षीप्रमाणे पावसाने यंदाही देशातील वायव्य आणि मध्य भारतात हुलकावणी दिली असल्याचे एक जून ते १३ सप्टेबर या कालावधीत झालेल्या पावसाच्या नोंदीवरून दिसून येते.

देशात आत्तापर्यंत ७५२.७ मिलिमीटर एवढा पाऊस पडला आहे. एक जून ते सात सप्टेंबर या कालावधीत ईशान्य भारतातील हिमालय, पश्‍चिम बंगाल, सिक्कीम, आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश येथे मुसळधार पाऊस पडला.

ईशान्य भारतात सरासरी १२८०.५ मिलिमीटर एवढा पाऊस पडतो. प्रत्यक्षात ईशान्य भारतात १२६६.६ मिलिमीटर पाऊस पडला आहे. सरासरीच्या तुलनेत एक टक्के कमी पाऊस पडला आहे.

सर्वदूर झालेल्या पावसामुळे पिकांना चांगला मिळाला असला तरी अनेक भागात नुकसान झाल्याचेही चित्र पाहावयास मिळाले. वायव्य भारतात सरासरी ५६८.५ मिलिमीटर एवढा पाऊस पडतो. यंदा ५१९.७ मिलिमीटर एवढा पाऊस पडला आहे. सरासरीच्या तुलनेत आत्तापर्यंत नऊ टक्के कमी पाऊस पडला.

मध्य भारतात जुलैमध्ये पडलेल्या पावसाच्या खंडामुळे अनेक भागात दुष्काळजन्य परिस्थिती उद्भवली होती. महाराष्ट्रातही पावसाचा मोठा खंड पडल्याने पिके वाया गेली. दरवर्षी मध्य भारतात सरासरी ८९५.६ मिलिमीटर एवढा पाऊस पडतो. यंदा १३ सप्टेंबरपर्यत ८११.४ मिलिमीटर म्हणजेच नऊ टक्के कमी पाऊस पडला. दक्षिण द्वीपकल्पाच्या अनेक भागात कमी पाऊस पडला असून, गेल्या पंधरवाड्यात चांगला पाऊस झाल्याचे चित्र आहे. दक्षिण भारतात जोरदार पावसाचा अंदाज अरबी समुद्र ते कर्नाटक यादरम्यान चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. ही स्थिती अरबी समुद्र व केरळच्या दिशेने सरकत आहे. त्यामुळे येत्या बुधवारपर्यंत (ता. २०) केरळ, लक्षद्वीप, कर्नाटक, कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात जोरदार पाऊस पडेल; परंतु आंध्र प्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड, विदर्भ, मराठवाडा, झारखंड, ओडिशा आणि पश्‍चिम बंगालच्या अनेक भागात पावसाचा जोर कमी होऊन हलका पाऊस पडण्याची शक्‍यता आहे.

उत्तर भारतातही हलक्‍या पावसाची शक्‍यता आहे, तर २१ ते २८ सप्टेंबर या कालावधीत पावसाचा जोर कमी होणार आहे, असा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com