देशात सरासरीच्या तुलनेत पाच टक्के कमी पाऊस
संदीप नवले
सोमवार, 11 सप्टेंबर 2017

पुणे ः गेल्या सव्वातीन महिन्यांत देशातील अनेक भागांत जोरदार पाऊस झाला आहे; मात्र काही भागांत अजूनही पावसाने दडी मारल्याचे चित्र आहे.

देशात एक जून ते सात सप्टेंबर या कालावधीत सरासरी ७५५.८ मिलिमीटर एवढा पाऊस पडतो. यंदा याच कालावधीत ७२०.४ मिलिमीटर एवढा पाऊस पडला आहे. हा पाऊस सरासरीच्या तुलनेत पाच टक्‍क्‍यांनी कमी आहे, असे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

पुणे ः गेल्या सव्वातीन महिन्यांत देशातील अनेक भागांत जोरदार पाऊस झाला आहे; मात्र काही भागांत अजूनही पावसाने दडी मारल्याचे चित्र आहे.

देशात एक जून ते सात सप्टेंबर या कालावधीत सरासरी ७५५.८ मिलिमीटर एवढा पाऊस पडतो. यंदा याच कालावधीत ७२०.४ मिलिमीटर एवढा पाऊस पडला आहे. हा पाऊस सरासरीच्या तुलनेत पाच टक्‍क्‍यांनी कमी आहे, असे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

एक जून ते सात सप्टेंबर या कालावधीत हिमालय, पश्‍चिम बंगाल, सिक्कीम, आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश येथे मुसळधार पाऊस पडला. ईशान्य भारतात १२०५.४ मिलिमीटर पाऊस पडला आहे. या भागात झालेला पाऊस हा सरासरीएवढा आहे. हा पाऊस पिकांना चांगला असला, तरी अनेक भागांत नुकसान झाल्याचेही चित्र पाहावयास मिळाले.

वायव्य भारतात सरासरी ५३३.७ मिलिमीटर एवढा पाऊस पडतो. यंदा ५१०.० मिलिमीटर एवढा पाऊस पडला आहे. सरासरीच्या तुलनेत हा पाऊस चार टक्के कमी आहे.

यंदा मध्य भारतात पावसाने चांगलीच हुलकावणी दिल्यामुळे अनेक भागांत दुष्काळजन्य परिस्थिती उद्भवली होती. महाराष्ट्रातही पावसाचा मोठा खंड  पडल्याने पिके वाया गेली आहेत. दरवर्षी मध्य भारतात सरासरी ८४४.५ मिलिमीटर एवढा पाऊस पडतो. यंदा सात सप्टेंबरपर्यंत ७७६.१ मिलिमीटर  म्हणजेच आठ टक्के कमी पाऊस पडला. दक्षिण द्वीपकल्प भागातही यंदा कमी पावसाचे चित्र आहे.

ईशान्य भारतात जोरदार; मध्य भारतात कमी
गेल्या आठवड्यातही ईशान्य भारतात जोरदार पाऊस पडला. त्यापाठोपाठ दक्षिण द्वीपकल्पच्या भागातही बऱ्यापैकी पाऊस पडला आहे. मध्य भारतात पडणाऱ्या पावसाचे प्रमाण अत्यंत कमी होते.

दक्षिण भारतात जोरदार पावसाचा अंदाज
बंगालच्या उपसागरात चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. ही स्थिती अरबी समुद्र व केरळच्या दिशेने सरकत आहे. त्यामुळे येत्या बुधवारपर्यंत (ता. १३) तमिळनाडू, केरळ, कर्नाटक, कोकण, गोवा आणि लक्षद्वीपच्या काही भागात जोरदार पाऊस पडेल; परंतु आंध्र प्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड, विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र झारखंड, ओडिशा आणि पश्‍चिम बंगालच्या अनेक भागात पावसाचा जोर कमी होऊन हलका पाऊस पडण्याची शक्‍यता आहे, तर १४ ते २० सप्टेंबर या कालावधीत पावसाचा जोर आणखी कमी होणार आहे, असा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला.

इतर ताज्या घडामोडी
पुणे जिल्ह्यात हलका ते मध्यम पाऊसपुणे : जिल्ह्यात गुरुवारी (ता. २१) दिवसभर पावसाने...
दहा गावांतील शेतकऱ्यांचे एकाचवेळी उपोषणवणी, जि. यवतमाळ ः शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकडे...
जळगाव येथे कोथिंबीर १८०० ते ३००० रुपये...जळगाव : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील घाऊक...
महात्मा फुले कृषी विद्यापीठात...राहुरी, जि. नगर  : महात्मा फुले कृषी...
दीक्षाभूमी त्याग, शांतता, मानवतेची...नागपूर ः नागपुरातील दीक्षाभूमी त्याग, शांतता व...
नगर : मांडओहळ धरण १०० टक्के भरले टाकळी ढोकेश्वर : पारनेर तालुक्याला वरदान...
उजनी धरणातून भीमेमध्ये पाण्याचा विसर्ग...सोलापूर : जिल्ह्यात विश्रांती घेतलेल्या पावसाने...
फिनोलेक्स प्लासनसह चार ठिबक कंपन्यांना...पुणे : पंतप्रधान कृषी सिंचन योजनेतून राज्यात...
पावसामुळे सोयाबीन, घेवडा कुजण्याची शक्‍... सातारा ः जिल्ह्यात झालेल्या दमदार पावसामुळे...
खरीप हंगामातील उत्पादन वाढणारनवी दिल्ली ः देशात यंदा समाधानकारक पावसाच्या...
ई-पॉस यंत्रणेबाबत तांत्रिक अडचणी जळगाव  ः खतांच्या विक्रीमध्ये पारदर्शकता व...
धारवाड येथे आजपासून कृषी प्रदर्शनसंकेश्‍वर, कर्नाटक ः येथील धरावाड कृषी...
मंगळावर पाण्याचे प्रचंड साठे मंगळावर पाण्याचे साठे असल्याचे नवे पुरावे...
सांगली जिल्ह्यात द्राक्षाच्या क्षेत्रात...सांगली : जिल्ह्यात यंदा द्राक्षाच्या शेती...
बुलेट ट्रेनने अहमदाबाद जाऊन ढोकळा...मुंबई : सोशल मिडीयात काही लपून राहत नाही. सोशल...
वादळी पावसामुळे नांदुरा तालुक्यात...नांदुरा (बुलडाणा) : काल संध्याकाळी नांदुरा...
वाहनचालकाच्या प्रयत्नातून शेतीचे...बीड : एकीकडे शेती नकोशी वाटणाऱ्यांची संख्या वाढत...
भारतात आणखी १ लाख टन गहू आयात होणार मुंबई ः पुढील काही दिवसांत केंद्र सरकारकडून...
मुंबईला पाणी पुरविणारी सातही धरणे भरली मुंबई ः तलावांच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार...
कर्जमाफीची रक्कम १५ ऑक्टोबरपासून बँक... मुंबई : अनेक घोषणांनंतर लांबलेली कर्जमाफीची...