सांगली जिल्ह्यात पावसाचा खंड

सांगली जिल्ह्यात पावसाचा खंड
सांगली जिल्ह्यात पावसाचा खंड

सांगली ः पावसानं उघडीप दिली हाय... शेतात पीक वाळू लागल्याती... पाऊस झाला नाय तर खरीप हंगाम वाया जाईल... पेरणीला घातलेला खर्चबी मिळणार नाय... मुलांचं शिक्षण, घरचा खर्च कसा चालायचा असा प्रश्न पडला हाय... असे पिंपरी बुद्रुक येथील शेतकरी हताश होऊन सांगत होते.

सांगली जिल्ह्यात सुमारे ८० टक्के पेरणी झाली आहे. वाळवा, पलूस, मिरज, कडेगाव तालुक्यांत चांगला पाऊस झाल्याने या भागातील पिके जोमाने वाढली आहेत. मात्र, दुष्काळी पट्ट्यातील आटपाडी, जत कवठेमहांकाळ तालुक्‍यात अपेक्षित पाऊस झालाच नाही. त्यामुळे विहिरी, कूपनलिका, तलावांच्या पाणीसाठ्यात वाढ झाली नाही. परिमाणी खरीप हंगामातील पिकांना याचा फटका बसू लागला आहे. पाणी नसल्याने पिके सुकू लागली आहेत. अपेक्षित पाऊस झाला नाही, तर खरीप हंगाम वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे.

दुष्काळी भागाला सर्वाधिक पावसाची गरज असताना त्या ठिकाणी पावसाने अपेक्षाभंग केला आहे. गतवर्षी मान्सूनपूर्व पावसाने दुष्काळी भागास मोठा दिलासा दिला होता. यंदा मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली होती, तरीही ती पुरेशी ठरली नाही. आटपाडी तालुक्‍याला सर्वाधिक फटका यंदाच्या पावसाळ्यात बसला आहे. आटपाडी तालुक्यात गतवर्षी ३० जुलैपर्यंत झालेल्या पावसाची आकडेवारी पाहता यंदा ७९ टक्के कमी पाऊस नोंदला गेला आहे. त्या खालोखाल जत तालुक्‍याची स्थिती आहे. या ठिकाणी ४९ टक्के कमी पावसाचे चित्र आहे. कवठेमहांकाळ तालुक्‍यातही गतवर्षीपेक्षा २३ टक्के कमी पाऊस नोंदला गेला आहे.

या भागाला कायमस्वरूपी पाणी योजना व्हावी. टेंभू योजनेबाबत राजकीय नेत्यांना आम्ही सतत भेटलो आहे. जिल्हाधिकारी यांनीच या भागाकडे लक्ष घालावे व कायमस्वरूपी शेतीचा पाण्याचा प्रश्न निकाली काढावा. - विजय माने, शेतकरी पिंपरी बुद्रुक, ता. आटपाडी   पाऊस नाही खरीप हंगाम वाया जाऊ लागला आहे. बी-बियाणे मशागत याचा शासनाने खर्च द्यावा. नाहीतर शासनाने शेतीसाठी कायमस्वरूपी पाणी योजना द्यावी. - अण्णा मोटे, शेतकरी, विभूतवाडी, ता. आटपाडी

तालुकानिहाय तुलनात्मक पाऊस
तालुका ३० जुलै २०१७ ३० जुलै २०१८
इस्लामपूर २५७ २१५
पलूस ८६.५ १६५.३
तासगाव १२८ १२०
शिराळा ३७९ ५६१
मिरज १३७ २२८
विटा १५९ २२५
आटपाडी १७३ ३७
कवठेमहांकाळ १८६ १४४
जत २६९ १३९
कडेगाव १९५ ३०६

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com