agriculture news in marathi, Rainfall in some parts of the city city | Agrowon

नगर जिल्ह्याच्या काही भागांत पावसाचे आगमन
टीम अॅग्रोवन
बुधवार, 19 सप्टेंबर 2018

नगर ः गेल्या अनेक दिवसांपासून गायब झालेला आणि गणपत्ती बाप्पाच्या आगमनानंतर सर्वांनाच प्रतीक्षा असलेल्या पावसाचे सोमवारी (ता. १७) सायंकाळी आगमन झाले. सोमवारी सायंकाळी नगर, नेवासा, राहुरी, पाथर्डी, कर्जत तालुक्‍यांत पाऊस झाला. या पावसामुळे खरिपातील काही पिकांना आधार मिळाला असून, रब्बीच्या पेरण्याला सुरवात होण्याचीही आशा वाढली आहे. काल ९७ पैकी ३४ मंडळांत पावसाने हजेरी लावली.

नगर ः गेल्या अनेक दिवसांपासून गायब झालेला आणि गणपत्ती बाप्पाच्या आगमनानंतर सर्वांनाच प्रतीक्षा असलेल्या पावसाचे सोमवारी (ता. १७) सायंकाळी आगमन झाले. सोमवारी सायंकाळी नगर, नेवासा, राहुरी, पाथर्डी, कर्जत तालुक्‍यांत पाऊस झाला. या पावसामुळे खरिपातील काही पिकांना आधार मिळाला असून, रब्बीच्या पेरण्याला सुरवात होण्याचीही आशा वाढली आहे. काल ९७ पैकी ३४ मंडळांत पावसाने हजेरी लावली.

मध्यंतरी भीज पावसानंतर जिल्ह्यात कुठेही पाऊस झाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते. पाऊस नसल्याने खरिपाची सुमारे तीन लाख हेक्‍टर क्षेत्रावरील पिके धोक्‍यात होती. गणपती बाप्पाच्या आगमनानंतर पावसाचे वातावरण तयार होत असे. आभाळ भरून येते; पण पाऊस मात्र पडत नव्हता. बाप्पाच्या आगमनानंतरही चार दिवस कोरडे गेल्याने चिंतेत वाढ झाली होती.

मंगळवारी (१८) दिवसभर आभाळ आलेले होते. दुपारी ऊनही चांगलेच चटकत होते. त्यामुळे नागरिकांना पावसाची प्रतीक्षा होतीच. सायंकाळी सहाच्या सुमारास नगर शहरासह, नेवासा, शेवगाव, पाथर्डी, कर्जत, राहुरी भागात पाऊस झाला. गेले दोन दिवसांपासून उकाडा चांगलाच वाढला होता. आजच्या पावसाने काहिसा दिलासा मिळाला. ग्रामीण भागातही काही ठिकाणी पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्या आहेत. पाऊस नसल्याने पेरण्या खोळंबल्या होत्या. या एका पावसाने पेरण्या होणार नसल्या तरी गणपतीच्या काळात पाऊस आल्यामुळे आगामी दहा दिवसात तो बरसेल, असा अंदाज बांधला जात आहे. अकोले, भंडारदरा, घाटघर, रतनवाडी भागात मात्र पाऊस सध्यातरी पूर्णतः थांबलेला आहे.

सोमवारी झालेला मंडळनिहाय पाऊस असा ः कर्जत ः ६, मिरजगाव ः १९, टाकळीभान ः ८, ब्राह्मणी ः २, ताहाराबाद ः ४, नेवासा खुर्द ः ११, नेवासा बुर्द्रुक ः ८, सलाबतपूर ः २०, कुकाणा ः २५, चांदा ः २२, घोडेगाव ः २४, वडाळा बहिरोबा ः २१, सोनई ः ३०, नगर (नालेगाव) ः ३६, जेऊर ः ८, रुईछत्तीशी ः ४, कापूरवाडी ः ७, केडगाव ः ३८, चास ः १५, भिंगार ः ११, नागापूर ः २, वाळकी ः २१, चिचोंडी पाटील ः ३, सावेडी ः २९, कोरडगाव ः ७, करंजी ः १८, मिरी ः १२, शेवगाव ः २०, बोधेगाव ः ६, चापडगाव ः १६, भातकुडगाव ः १९, एरंडगाव ः ३२, ढोरजळगाव ः १८.

इतर ताज्या घडामोडी
सातारा जिल्हा बॅंक देणार मध्यम मुदत...सातारा :  स्थापनेपासून गेल्या ६८ वर्षांत...
औरंगाबादेत हिरवी मिरची ४००० ते ५०००...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
जळगाव : खरिपाचा रासायनिक खतपुरवठा रखडलाजळगाव : रासायनिक खतांचा खरिपासंबंधीचा पुरवठा...
दुष्काळी मदतीची गावनिहाय माहिती जाहीर...मुंबई  : राज्यातील बहुतांश...
पाण्यासाठी भीमा नदीपात्रात ठिय्या आंदोलन मांडवगण फराटा, जि. पुणे  : घोड आणि...
निम्‍न दुधना धरणाच्या पाण्यासाठी...परभणी : दुष्काळामुळे मानवत तालुक्यातील दुधना...
‘उजनी’काठच्या शेतकऱ्यांची पिके...भिगवण, जि. पुणे   ः प्रशासनाच्या...
पुणे जिल्ह्यातील धरणे तळाशीपुणे  : जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठा...
अकोल्यातील खरीप आढावा बैठक...अकोला  ः शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाच्या...
दुष्काळ निवारणासाठी सातारा जिल्हा...सातारा : जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्‍...
फळबागेत पाणी साठवण कुंड कोकणातील जांभ्या जमिनीमध्ये पाण्याच्या निचऱ्याचे...
फणस लागवड  उष्ण व दमट हवामान फणस पिकाला मानवते....
ऊसवाढीच्या टप्‍प्यानुसार द्या पुरेसे...जमिनीच्या प्रकारानुसार योग्य ठिबक सिंचन पद्धतीची...
पोटदुखीवर पेटाराच्या सालीचा काढा उपयुक्तस्थानिक नाव    : पेटार, पेटारी,...
उष्ण, कोरडे हवामान मॉन्सून वाटचालीस...महाराष्ट्राच्या पश्‍चिम भागावर १००८ हेप्टापास्कल...
भंगाराम तळोधी येथे राइसमिलवर कारवाईचंद्रपूर ः कृषी विभागाला मिळालेल्या गोपनीय...
परभणीत कोबीला प्रतिक्विंटल १२०० ते २०००...परभणी : पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
नाशिक जिल्ह्यातील ५४३ गावांची...नाशिक ः गावठाण निश्‍चितीसाठी गावांमध्ये ग्रामसभा...
नाशिक : टँकरने पाणीपुरवठ्यासाठी जीपीएस...नाशिक : जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती अधिक जाणवू...
अनुदानाअभावी चारा छावण्या संकटातबिजवडी, जि. सातारा : माण तालुक्‍यामध्ये १९७२...