agriculture news in marathi, rainfall status in nagar district, maharashtra | Agrowon

नगर जिल्ह्यामध्ये सरासरी ४२.९३ टक्के पाऊस
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 27 जुलै 2018

नगर   ः यंदाचा पावसाळा सुरू होऊन आता जवळपास दोन महिन्यांचा कालावधी होत आला आहे, मात्र अजूनही बहुतांश भागात पुरेसा पाऊस नाही. असे असले तरी जिल्ह्यामध्ये सरासरी ४२.९३ टक्के पाऊस झाला असल्याचा प्रशासनाचा अहवाल आहे. अकोले तालुक्‍यात सर्वाधिक ८०.४३ टक्के पाऊस झाला आहे. कर्जतची पावसाची आकडेवारी मात्र सर्वात कमी २० टक्के आहे. गेल्यावर्षी आजच्या तारखेपर्यंत ५१.८५ टक्के पाऊस झाला होता.  

नगर   ः यंदाचा पावसाळा सुरू होऊन आता जवळपास दोन महिन्यांचा कालावधी होत आला आहे, मात्र अजूनही बहुतांश भागात पुरेसा पाऊस नाही. असे असले तरी जिल्ह्यामध्ये सरासरी ४२.९३ टक्के पाऊस झाला असल्याचा प्रशासनाचा अहवाल आहे. अकोले तालुक्‍यात सर्वाधिक ८०.४३ टक्के पाऊस झाला आहे. कर्जतची पावसाची आकडेवारी मात्र सर्वात कमी २० टक्के आहे. गेल्यावर्षी आजच्या तारखेपर्यंत ५१.८५ टक्के पाऊस झाला होता.  

नगर जिल्ह्यामधील अकोले तालुक्‍यातील पश्‍चिम भाग वगळला तर अजूनही अन्य भागात पुरेसा पाऊस नाही. पेरण्या, कापूस लागवडीला उशीर होत असल्याने शेतकऱ्यांनी अल्प पावसावरच पेरणी, कापूस लागवड केली असून जवळपास सरासरीच्या ९० टक्‍क्‍यांपर्यंत पेरणीचे क्षेत्र गेले आहे. असे असले तरी गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा पेरण्यांवरही चांगला पाऊस नसल्याने परिणाम झालेला आहे. जिल्ह्यामध्ये आतापर्यंत ४२.९३ टक्के पाऊस झाला आहेत. जिल्ह्याची सरासरी ४९७.४ मिमी असून आतापर्यंत २१३.५२ मिमी पाऊस झाला असल्याचे प्रशासनाकडून सांगितले जात आहे.

अकोले तालुक्‍यात पावसामुळे भंडारदरा भरले असून मुळा धरणात ५७, निळवंडे धरणात ६८ टक्के पाणीसाठा झाला आहे. मात्र, जिल्ह्याच्या अन्य भागाला जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. अनेक भागात गेल्या आठ दिवसांपासून पाऊसच झाला नसल्याने पेरलेली पीकंदेखील अडचणीत येण्याची शक्‍यता आहे. तालुका झालेला पाऊस (टक्के) : अकोले ः ८०.४३, संगमनेर ः ६९.४३, कोपरगाव ः ४७.७१, श्रीरामपूर ः ६४.९१, राहुरी ः ३६.६५, नेवासा ः २७.८६, राहाता ः ४०.२१, नगर ः २६.१३, शेवगाव ः ४७.९६, पाथर्डी ः ३१.४१, पारनेर ः ३३.५५, कर्जत ः २०.५०, श्रीगोंदा ः ३५.४४, जामखेड ः ४५.५३.

सोळा मंडळात अल्प पाऊस
जिल्ह्यामध्ये असलेल्या ९७ महसूल मंडळापैकी पेडगाव, काष्टी, देवदैठण, मांडवगण, माही जळगाव, मिरजगाव, पुणतांबा, कुकाणा, कापूरवाडी, वाळकी, बोधेगाव, चापडगाव, एरंडगाव, वाडेगव्हाण, तळेगाव, िंपपरणे या सोळा महसूल मंडळात १०० मिमीपेक्षा अल्प पाऊस झाला आहे. वाडेगव्हाणला सर्वाधिक कमी पाऊस आहे. सुरेगाव, साकीरवाडी, शेंडी, राजूर, अकोले, डोळासणे, अंदिरगाव, श्रीरामपूर महसूल मंडळात ३०० मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडला आहे. 

इतर ताज्या घडामोडी
बोंड अळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी...परभणी : सद्यःस्थितीत पाणी दिलेल्या कपाशीच्या...
नागपूरला होणार रेशीम कोष मार्केटनागपूर   ः राज्यात विस्तारत असलेल्या रेशीम...
खानदेशातील रब्बी पाण्याअभावी संकटातजळगाव  : अत्यल्प पावसामुळे खानदेशात...
साखर कारखान्यांच्या ताबेगहाण कर्जाला...मुंबई  ः साखर कारखान्यांना शेतकऱ्यांच्या ‘...
नगरमधील शेतकऱ्यांना मिळणार शेळीपालन,...नगर   : पशुसंवर्धन विभागामार्फत शेतकऱ्यांना...
जळगावात सीताफळाला प्रतिक्विंटल २५०० ते...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता...
संग्रामपूर खरेदी केंद्रावर अाॅनलाइन...बुलडाणा   : अाधारभूत किमतीने शेतीमाल...
एफआरपी थकवलेल्या ११ कारखान्यांवर कारवाई...मुंबई  : राज्यातील ११ साखर कारखान्यांनी...
गोंदिया जिल्ह्यात ५२ हजार क्विंटल धान...गोंदिया  ः शासनाच्या वतीने नाफेडच्या...
मदत, पुनर्वसन समितीच्या अहवालानंतर...अकोला  ः कमी तसेच अनियमित पावसामुळे निर्माण...
सातारा जिल्ह्यात रब्बीसाठी आतापर्यंत...सातारा : जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत तसेच सहकारी...
‘उजनी`चे २० टीएमसी पाणी सोलापूर, अऩ्य...सोलापूर : सोलापूर आणि इतर शहरांच्या पिण्याच्या...
मक्यावरील अमेरिकन लष्करी अळीचे नियंत्रणशास्त्रीय नाव ः स्पोडोप्टेरा फ्रुजीपर्डा  ...
बेणापूर ग्रामपंचायतीने केली गायरानावर...खानापूर तालुक्यातील बेणापूर ग्रामपंचायतीने आपल्या...
भुरीच्या प्रादुर्भावावर लक्ष ठेवासर्व द्राक्ष विभागांमध्ये वातावरण पुढील आठ...
नगर जिल्ह्यात ११५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठानगर   : जिल्ह्यातील गाव-शिवारातील...
साताऱ्यात सोयाबीनच्या दरात सुधारणासातारा   ः जिल्ह्यात सोयाबीनच्या दरात...
गुंजवणी प्रकल्पाच्या ‘सुप्रमा’मधील अटीत...मुंबई   : पुणे जिल्ह्याच्या वेल्हे...
खपली गहू लागवडीचे सुधारित तंत्रगेल्या काही दशकांमध्ये कमी उत्पादकतेमुळे खपली गहू...
सुरळीत वीजपुरवठ्यासाठी परभणीत भजन आंदोलनपरभणी  ः महावितरणच्या बोबडे टाकळी (ता. परभणी...