agriculture news in marathi, Rainfall in Telhara, Akot taluka | Agrowon

तेल्हारा, अकोट तालुक्यांत अवकाळी पाऊस; गाराही पडल्या
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 22 फेब्रुवारी 2019

अकोला : जिल्ह्यात तेल्हारा, अकोट तालुक्यांत बुधवारी (ता. २०) रात्री, गुरुवारी (ता. २१) पहाटे काही भागांत पावसाच्या मध्यम स्वरूपात सरी कोसळल्या. देवरी फाटा परिसरात रात्री हरभऱ्याच्या आकाराएवढ्या गाराही पडल्याने काही वेळ नागरिकांची तारांबळ उडाली. 

अकोला : जिल्ह्यात तेल्हारा, अकोट तालुक्यांत बुधवारी (ता. २०) रात्री, गुरुवारी (ता. २१) पहाटे काही भागांत पावसाच्या मध्यम स्वरूपात सरी कोसळल्या. देवरी फाटा परिसरात रात्री हरभऱ्याच्या आकाराएवढ्या गाराही पडल्याने काही वेळ नागरिकांची तारांबळ उडाली. 

विजांचा कडकडाट तसेच वादळासह अवकाळी पाऊस झाला. प्रामुख्याने रात्री आठच्या सुमारास तेल्हारा येथे पाऊस झाला. याच दरम्यान देवरी फाटा परिसरात पावसासह गारपीटसुद्धा झाली. तेल्हारा तालुक्यात बहुतांश भागात बुधवारी रात्री वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडला. या तालुक्यातील बेलखेड, राणेगाव, पाथर्डी, घोडेगाव अादी ठिकाणी रात्री वादळी पाऊस झाला. विजेच्या कडकडासह पावसाच्या सरी झाल्या. 

अकोट तालुक्यात मुंडगाव, देवरी या गावात पाऊस झाला. यामुळे शेतकरी चिंतातूर झाला होता. या भागात रब्बीत हरभऱ्याची लागवड केलेली अाहे. काही शेतांमध्ये हरभरा सोंगून ठेवलेला असून, तो ओला झाला. परिणामी या हरभऱ्याचे घाटे गळून पडण्याची भीती व्यक्त होत अाहे. काही ठिकाणी वादळामुळे शेतात उभे असलेले गव्हाचे पीक लोळले अाहे. २० ते २५ मिनिटे झालेल्या या पावसामुळे रात्रीच्या वेळी नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. अंधारामुळे सोंगून ठेवलेला हरभरा झाकणेसुद्धा शेतकऱ्यांना शक्य  झाले नाही. गुरुवारी दिवसभर वातावरण स्वच्छ होते. काहिसा दमटपणा मात्र जाणवत होता.

इतर ताज्या घडामोडी
लोकसभेच्या निकालावर ठरेल विधानसभेची...नगर ः लोकसभा निवडणुकीत कोणत्या मतदारसंघातून...
उष्णतावाढीमुळे यावर्षीही साताऱ्यात आले...सातारा  ः मागील तीन ते चार वर्षांपासून मे...
नांदेड जिल्ह्यात १२१ टॅंकरने पाणीपुरवठानांदेड  ः नांदेड जिल्ह्यातील पाणीटंचाईचे...
जलसंधारण कामांसाठी पुणे जिल्ह्याला ११...शेटफळगढे, जि. पुणे  : जिल्ह्यातील जलयुक्त...
पाणीप्रश्नी किनगाव ग्रामपंचायतीवर...रोहिलागड, जि. जालना  : किनगाव येथील महिलांनी...
अठराशेवर गावांमध्ये घेतल्या जाणार २६५२...औरंगाबाद   : येत्या खरीप हंगामात...
खानदेशात बाजरी मळणीचा हंगाम आटोपलाजळगाव  ः खानदेशात बाजरीचा मळणी हंगाम आटोपला...
धुळे, नंदुरबारमध्ये राष्ट्रीयीकृत...धुळे : धुळे व नंदुरबार जिल्हा बॅंकेने १२ हजारांवर...
कोल्हापुरात ‘पाणीबाणी’ची शक्यताकोल्हापूर : जिल्ह्यात वेळेवर पाऊस सुरू न झाल्यास...
आरग येथे नागिलीच्या पानांचे सौदे सुरूसांगली  ः कधीकाळी खाण्यासाठी वापरण्यात...
अकोला जिल्ह्यात २० टक्क्यांपर्यंत...अकोला :  आगामी खरीप हंगामासाठी जिल्ह्यात पीक...
नगर जिल्ह्यातील १२४ गावांचे पाणी दूषितनगर  : जिल्ह्यातील २६४५ गावांचे पाणीनमुने...
बुलडाणा जिल्हा कृषी विक्रेता संघटनेच्या...बुलडाणा ः जिल्हा कृषी विक्रेता संघटनेची १४...
निफाड तालुक्यात द्राक्षबागांच्या...नाशिक  : निफाड तालुक्यातील द्राक्षबागांमध्ये...
सोलापूर जिल्हा परिषद करणार ‘रोहयो’ची...सोलापूर ः जिल्हा परिषदेच्या वतीने यंदाच्या...
भूगर्भात पाणीसाठा टिकविण्यासाठी भूमिगत...भूमिगत बंधारा बांधण्याचे काम जमिनीखाली असल्याने...
सरकारने शेतकऱ्यांच्या समस्यांत टाकली...नागपूर ः दुष्काळी मदत नाही, कर्जमाफीच्या...
वडगाव येथील पाटबंधारे कार्यालयासमोर...वडगाव निंबाळकर, जि. पुणे  ः नीरा डावा...
पुणे बाजार समितीवर पुन्हा प्रशासकीय...पुणे : विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर पुणे बाजार...
अळिंबी उत्पादनातून केली संकटांवर मातलोणी (जि. जळगाव) येथील अनिल माळी यांच्याकडे कृषी...