agriculture news in marathi, rainfall till September, pune | Agrowon

राज्यात सप्टेंबरअखेर ८१ टक्के पावसाची नोंद
संदीप नवले
शुक्रवार, 6 ऑक्टोबर 2017

मध्य महाराष्ट्रातील नगर, पुणे, सातारा, सांगली जिल्ह्यात सर्वाधिक शंभर टक्केपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. तर नाशिक, धुळे, नंदुरबार, सोलापूर या जिल्ह्यात ७५ टक्केपेक्षा अधिक पाऊस झाला.

पुणे ः राज्यात  जून ते सप्टेंबर या कालावधीत सरासरी ११४० मिलिमीटरपैकी ९२९.४ मिलिमीटर म्हणजेच ८१.५ टक्के पाऊस झाला असून वीस जिल्ह्यांत ७५ टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस झाला असल्याचे कृषी विभागाने नमूद केले आहे. सर्वात कमी पाऊस यवतमाळ जिल्ह्यात ४८.३ टक्के झाला. 

यंदा कोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार पाऊस झाला असला तरी, मराठवाडा आणि विदर्भात दडी मारल्याचे चित्र अनुभवास मिळाले. त्यामुळे सोयाबीन, मूग, उडिद पिकांचे नुकसान झाले. परंतु, आॅगस्ट, सप्टेंबरमध्ये झालेल्या पावसाने शेतकऱ्यांना दिलासा दिला. त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाली.

पावसाच्या खंडामुळे शेतकरी त्रस्त
जूनच्या शेवटच्या आठवड्यात अनेक भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. त्यानंतर जुलैच्या पहिल्या आठवड्यात पावसाने दडी मारल्याने शेतकरी चांगलेच त्रस्त झाले. मात्र, तेरा जुलैपासून माॅन्सून पुन्हा सक्रिय झाला. वीस जुलैनंतर पुन्हा पाऊस गायब झाला. या कालावधीत मराठवाडा व विदर्भ वगळता कोकण व मध्य महाराष्ट्राच्या काही भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. १९ आॅगस्टनंतर अनेक भागांत मुसळधार पावसाने हजेरी लावली. सप्टेंबरमध्येही अनेक भागात जोरादार पाऊस पडला. 

कोकणात १०७ टक्के पाऊस 
गेल्या चार महिन्यांत कोकणात दोन हजार ९७५ मिलिमीटर पैकी तीन हजार १९४ मिलिमीटर म्हणजेच सरासरी १०७ टक्के पाऊस झाला. जून महिन्यात ११९.४ टक्के, जुलैमध्ये ९४. १ टक्के, आॅगस्टमध्ये १०१.७ टक्के तर सप्टेंबरमध्ये १३५.१ टक्के पाऊस झाला. यंदा शेतकऱ्यांना भात लागवडी वेळेवर करता आल्याने वाढही चांगली झाली. ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्यात शंभर टक्केपेक्षा अधिक तर रत्नागिरी आणि सिंधुदूर्गमध्ये ७५ टक्केपेक्षा अधिक पाऊस पडला. 

मध्य महाराष्ट्रातही ८९ टक्के पाऊस  
मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूर, नगर आणि नाशिकच्या अनेक भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. मात्र, जळगाव, धुळे, नंदुरबार आणि जळगाव, सोलापूर, नगर, पुणे, सातारा, सांगली जिल्ह्याच्या काही भागात पावसाने दडी मारल्याचेच चित्र होते. नाशिक विभागात सरासरी ७१७.४ मिलिमीटरपैकी ६४५.३ मिलिमीटर म्हणजेच सरासरी ८९.९ टक्के तर पुणे विभागात ८८३.३ मिलिमीटरपैकी ७८७.४ मिलिमीटर म्हणजेच ८९.१ टक्के पाऊस पडला. मध्य महाराष्ट्रातील नगर, पुणे, सातारा, सांगली जिल्ह्यात सर्वाधिक शंभर टक्केपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. तर नाशिक, धुळे, नंदुरबार, सोलापूर या जिल्ह्यात ७५ टक्केपेक्षा अधिक पाऊस झाला. तर कोल्हापूर जिल्ह्यात ७५ टक्केपेक्षा कमी पाऊस झाल्याचे दिसून येते. 

मराठवाड्यात ८० टक्के पाऊस 
मराठवाड्यात सरासरी ७२८.८ मिलिमीटर पाऊस पडतो. यंदा ७८७.४ मिलिमीटर म्हणजेच ८९.१ टक्के पाऊस पडला. जूनमध्ये ११७.६ टक्के, जुलैमध्ये ३६.७ टक्के, आॅगस्टमध्ये १०७.५ टक्के, तर सप्टेबरमध्ये ७४.१ टक्के पाऊस पडला. गेल्या चार महिन्यांत उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये सर्वाधिक शंभर टक्केहून अधिक पाऊस पडला आहे. औरंगाबाद, जालना, बीड, लातूर जिल्ह्यामध्ये ७५ टक्केपेक्षा अधिक पाऊस पडला. तर नांदेड, हिंगोली व परभणीमध्ये पन्नास टक्केपेक्षा अधिक पाऊस पडला.

विदर्भात अवघा ६४ टक्के पाऊस
विदर्भातील नागपूर व बुलढाणा जिल्ह्यात ७५ टक्केपेक्षा कमी पाऊस झाला आहे. उर्वरित जिल्ह्यांमध्ये ५० टक्केपेक्षा कमी पाऊस झाला. एक जून ते ३० सप्टेंबर या कालावधीत अमरावती विभागात सरासरी ७९७.७ मिलिमीटर पाऊस पडतो. यंदा ५१२.३ मिलिमीटर म्हणजेच ६४.२ टक्के पाऊस पडला. नागपूर विभागात ११६८.६ मिलिमीटर पाऊस पडतो. चालू वर्षी ७४८.१ मिलिमीटर  म्हणजेच ६४.० टक्के पाऊस पडला आहे. एकंदरीत चार महिन्यांचा विचार केल्यास जूनमध्ये विदर्भात सर्वाधिक पाऊस पडल्याचे दिसून येते. 

विभागनिहाय झालेला पाऊस (मि.मी.मध्ये) 

विभाग   जून जुलै आॅगस्ट सप्टेंबर
कोकण ७८८.४ १०९६.१ ७६९.८ ५१२.४
नाशिक १३८.४ २१९.६  १६३.८  १२३.२
पुणे १६७.९  २६६.७  १३६.७  २०५.४
औरंगाबाद १७१.५ ७३.८ २१२.०   १३१.०
अमरावती १३८.१ १४७.१ १२४.७ १०२.३ 
नागपूर ११८.५ २७४.४ २२७.२   १२५.८
एकूण २१९.१ २८८.९ २३५.२ १८०.३
 

 

इतर अॅग्रो विशेष
खानदेशातील जलसाठ्यात घट जळगाव : खानदेशात पाणीबाणी वाढू लागली असून,...
जिनर्स कापूस खरेदी केंद्रांसाठी ९००...जळगाव ः भारतीय कापूस महामंडळाच्या (सीसीआय) कापूस...
राज्यात दुधाचे दर पुन्हा घसरलेपुणे: राज्यात होत असलेल्या जादा दुधाच्या...
दावणीला आणि छावणीला परिस्थितीनुसार चारा...बीड : राज्यात सरासरीच्या ७० टक्के पाऊस पडला असून...
सत्ताधाऱ्यांना नमवण्याची ताकद...मुंबई : गेल्या चार वर्षांत देश चुकीच्या...
दुष्काळातही माळरानावर हिरवाई फुलवण्याचे...लातूर जिल्ह्यातील वाघोली येथील सोनवणे कुटुंब...
सेंद्रिय पद्धतीने ऊस लागवड ते...लातूर येथील विलास सहकारी साखर कारखान्याने...
श्री विठ्ठल-रुक्मिणीचे २४ तास दर्शनसोलापूर ः पंढरपुरात श्री विठ्ठल -रुक्मिणीच्या...
हरभरा पेरणी ३३ टक्क्यांनी माघारलीनवी दिल्ली ः देशातील दुष्काळी स्थितीचा परिणाम...
राणी लक्ष्मीबाईंचे गाव बनले पाणीदारसातारा: झाशीची राणी लक्ष्मीबाईंचे मूळ गाव म्हणजे...
विदर्भापाठोपाठ मराठवाडा, मध्य...पुणे : राज्यात किमान तापमानाचा पारा घसरल्याने...
खानदेशात जनावरांची निम्म्या दरात विक्रीचाळीसगाव, जि. जळगाव ः लांबलेल्या व अवेळी पडलेल्या...
रब्बी पेरणी २० टक्क्यांनी घटलीनवी दिल्ली ः देशातील बहुतांशी भागात यंदाच्या...
सातारा, सोलापूर, परभणीत ऊसदरासाठी आंदोलनपुणे ः गेल्या गळीत हंगामातील थकबाकी द्यावी तसेच...
निर्यातीच्या केळीला १८०० रुपये दरजळगाव ः राज्यात निर्यातीच्या केळीला यंदा उच्चांकी...
नागपूर, गोंदिया गारठलेपुणे : उत्तरेकडील वाऱ्यांच्या प्रभावामुळे राज्यात...
ऊसदराबाबत हवे दीर्घकालीन धोरणऊसदराचा प्रश्न मिटत नाही तोपर्यंत आम्ही कोणताही...
दक्षिण महाराष्टात ऊसतोडी सुरूकोल्हापूर : ऊसदराचा तिढा शनिवारी (ता. ११) दुपारी...
यंदा दिवाळीतच झाली उलंगवाडी...!दसरा अाला की शेतशिवारं पिकांनी बहरून जायची, पण...
मराठवाड्यात चाराटंचाई उंबरठ्यावर औरंगाबाद : एकीकडे पाणीटंचाईचे वादळ मराठवाड्यावर...