agriculture news in marathi, Rainfall from Tuesday will increase | Agrowon

मंगळवारपासून पावसाचा जोर वाढणार; मॉन्सून जैसे थे...
टीम अॅग्रोवन
रविवार, 3 जून 2018

पुणे : राज्यात पूर्वमाेसमी पावसाला सुरवात झाली आहे. सकाळच्या उकाड्यानंतर दुपारी दाटून येणाऱ्या ढगांसह जोरदार पाऊस पडत आहे. मंगळवारपासून (ता. ५) कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून, बुधवारी (ता. ६) मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. 

पुणे : राज्यात पूर्वमाेसमी पावसाला सुरवात झाली आहे. सकाळच्या उकाड्यानंतर दुपारी दाटून येणाऱ्या ढगांसह जोरदार पाऊस पडत आहे. मंगळवारपासून (ता. ५) कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून, बुधवारी (ता. ६) मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. 

गुरुवारपासून (ता. ३१) सुरू झालेल्या पावसाने अनेक ठिकाणी दाणादाण उडवून दिली आहे. सकाळी लवकर उन्हाचा चटका वाढत असून, उकाड्यामुळे धामाच्या धारा वाहू लागत आहेत. दुपारनंतर ढग गोळा होऊन जोरदार वाऱ्यासह पाऊस पडत आहे. शनिवारी (ता. २) पुणे शहरासह जिल्ह्याच्या विविध भागांत पाऊस पडला; तर जालना, औरंगाबाद जिल्ह्यांत अनेक ठिकाणी वादळी पावसाने हजेरी लावली. बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर, मंगळूरपीर या भागांतही दुपारनंतर पूर्वमोसमीच्या सरी पडल्या.  
वाढलेले तापमान आणि अरबी समुद्र व बंगालच्या उपसागरावरून होत असलेल्या बाष्पाच्या पुरवठ्यामुळे राज्यात ढगांची दाटी होत आहे. राज्यात साेमवारपर्यंत तुरळक ठिकाणी विजा, मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता आहे. मंगळवारपासून (ता. ५) पावसाचा जोर वाढणार असून, बुधवारी (ता. ६) मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा इशारा आहे. तर, कोकण आणि मराठवाड्यातही जोरदार पावसाचा अंदाज आहे. ६ ते ८ जून दरम्यान मॉन्सून दाखल होण्याची शक्यता असून, कोेकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.  

मॉन्सून जैसे थे...
नैॡत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) ३० जून रोजी कर्नाटकपर्यंत धडक दिली आहे. त्यानंतर या भागात मॉन्सूनने कोणतीही प्रगती केलेली नाही. तर ईशान्य भारतातील मिझोराम आणि नागालॅंड या राज्यांत शुक्रवारी (ता. १) मॉन्सून दाखल झाला असून, रविवारी ईशान्येकडील आणखी काही राज्यांत मॉन्सूनची प्रगती शक्य आहे. मंगळवारपर्यंत विषुववृत्ताकडून येणाऱ्या वाऱ्यांचा प्रवाह तीव्र होऊन कर्नाटकमध्ये पावसाचा जोर वाढून, मॉन्सूनची प्रगती होण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

इतर अॅग्रो विशेष
जत तालुक्यात द्राक्ष, डाळिंब बागा...सांगली : जत तालुक्यात पश्‍चिम भाग वगळता...
प्रकल्प व्यवस्थापकावर कारवाईचे आदेशपुणे : एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन...
सहवेदना :आज अन्नत्याग आंदोलनयवतमाळ: शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रति...
उन्हाची काहिली वाढलीपुणे: राज्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाची...
राजकीय उपद्रव्य मूल्य घटल्याने...मुंबई: मर्यादित जनाधार आणि राजकीय उपद्रव मूल्य...
सोलापूर जिल्ह्यातील सर्व गावांची...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील सर्वच ११४५...
विदेश अभ्यास दौऱ्याच्या शेतकरी यादीत...पुणे : विदेश अभ्यास दौऱ्यासाठी निवड केलेल्या...
क्रांती कारखाना हुमणीचे भुंगेरे खरेदी...कुंडल, जि. सांगली : एकात्मिक हुमणी कीड नियंत्रण...
तेजस्विनीच्या साथीने बचतीतून...तेजस्विनी लोकसंचालित साधन केंद्राच्या...
परवानाधारक व्यापाऱ्यांनीच केळीची खरेदी...जळगाव : चोपडा बाजार समिती दरवर्षी १४...
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर...पणजी : देशाचे माजी संरक्षणमंत्री व गोव्याचे...
आडातच नाही तर पोहऱ्यात येणार कोठून? दुष्काळ पडल्याने पाण्यासाठी बोअर घेण्याची अक्षरशा...
कृषी पर्यवेक्षकांना पदोन्नती मिळाली, पण...पुणे : राज्यातील कृषी पर्यवेक्षकांना शासनाने मंडळ...
दुष्काळी मराठवाड्यात मार्चमध्येच ‘केसर'...केज, जि. बीड ः फळांचा राजा आंबा बाजारात...
मिरची पीक अंतिम टप्प्यातनंदुरबार (प्रतिनिधी) ः खानदेशातील मिरचीचे आगार...
सुधारित जोडओळ पद्धतीमुळे कपाशीतून...सोगोडा (जि. बुलढाणा) येथील विजय पातळे या कपाशी...
परभणी ठरले देशात उष्णपुणे : राज्यात अनेक ठिकाणी तापमान ३७ अंशांच्या...
द्राक्ष उत्पादकांची फसवणूक थांबणार कधी?नाशिक: नाशिक जिल्ह्यातील मुख्य अर्थकारण...
यवतमाळच्या अनिकेतने तयार केला फवारणीचा...यवतमाळ ः फवारणीमुळे होणाऱ्या विषबाधा सर्वदूर...
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर...पणजी : गेल्या एक वर्षापासून अधिक काळ...