agriculture news in marathi, Rainfall in the west part of Sangamner, and hailstorm hail | Agrowon

संगमनेरच्या पश्‍चिम भागाला पाऊस, गारपिटीचा तडाखा
टीम अॅग्रोवन
बुधवार, 21 नोव्हेंबर 2018

संगमनेर, जि. नगर ः तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात जवळे कडलग आणि राजापूर परिसरात सोमवारी गारपिटीसह झालेल्या मुसळधार पावसाने द्राक्ष व डाळिंबाच्या बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. वादळी वाऱ्यामुळे मक्‍याचे पीक भुईसपाट झाले. काही ठिकाणी विजेचे खांब, कडुनिंब व बाभळीची झाडे कोसळली. शहरातही काही वेळ रिमझिम आणि केवळ दीड ते दोन किलोमीटर अंतरावरील गोल्डन सिटी परिसरात जोरदार पाऊस व गारपीट झाली.

संगमनेर, जि. नगर ः तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात जवळे कडलग आणि राजापूर परिसरात सोमवारी गारपिटीसह झालेल्या मुसळधार पावसाने द्राक्ष व डाळिंबाच्या बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. वादळी वाऱ्यामुळे मक्‍याचे पीक भुईसपाट झाले. काही ठिकाणी विजेचे खांब, कडुनिंब व बाभळीची झाडे कोसळली. शहरातही काही वेळ रिमझिम आणि केवळ दीड ते दोन किलोमीटर अंतरावरील गोल्डन सिटी परिसरात जोरदार पाऊस व गारपीट झाली.

तालुक्‍याच्या पश्‍चिम भागातील द्राक्ष व डाळिंबाचे आगर समजल्या जाणाऱ्या मजवळ कडलग येथे सुमारे एक तास वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. काही ठिकाणी गारपीट झाल्याने फुलोऱ्यावर आलेल्या द्राक्ष व डाळिंब बागांचे मोठे नुकसान झाले.

राजापूर येथे वादळी वाऱ्यामुळे विजेचे पाच खांब कोसळले. रस्त्याच्या कडेची मोठी झाडे कोसळून वाहतूक विस्कळित झाली. चाऱ्यासाठी घेतलेली मक्‍याची पिके भुईसपाट झाली. आर्थिक नुकसानीचा आकडा समजू शकला नाही. गारपिटीमुळे द्राक्ष व डाळिंबाची फूलगळ झाल्याने, घड व वेलींना गारांमुळे जखमा होऊन बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होण्याची, तसेच कोवळ्या घडांची कूज होण्याची भीती व्यक्त होत आहे. दरम्यान, नुकसान झाले असले, तरी दुष्काळाच्या झळा जाणवणाऱ्या काही पिकांचे एक भरणेही झाले.

शेवगाव तालुक्‍यातील दहिगावने येथे सोमवारी दुपारनंतर अचानक पावसाने हजेरी लावली. शेतातील कापूस भिजला, तर साठवलेला कांदा झाकताना धावपळ झाली. सकाळपासूनच वातावरणात उष्मा होता. वारा एकदम शांत झाला होता. आभाळ भरून आले होते; पण पाऊस येईल याची कोणालाच खात्री नसल्याने सर्व जण निश्‍चित होते.

पाऊस उघडल्यानंतर शेतकऱ्यांनी द्राक्षांच्या वेली हलवून, वेल व घडांवरील पाणी झटकून टाकावे, तसेच डाळिंबाच्या बागेतही झाडांवरील पाणी काढण्याचा प्रयत्न करावा. असा सल्ला कृषी सल्लागार प्रमोद देशमुख यांनी दिला आहे.

इतर ताज्या घडामोडी
एचटी सीड ‘एसआयटी’ची पोलिसांच्या...नागपूर  ः राज्य शासनाने स्थापन केलेल्या एच....
इतिहासकालीन जलसंधारण अन् त्यामागचे...दरवर्षी पिढ्यानपिढ्या पावसाचे पाणी वेगवेगळे उपाय...
अभ्यासक्रमात हवा भूसूक्ष्मजीवशास्त्राचा...महाराष्ट्रात चार कृषी विद्यापीठे असून, तिथे १२...
ठिबकचे अनुदान वाटपासाठी अधिकाऱ्यांची...पुणे ः शासनाकडून ठिंबक सिंचनासाठी तरतूद केलेली...
होळीमुळे द्राक्ष काढणी मंदावलीनाशिक : द्राक्षपट्ट्यात द्राक्ष काढणीसाठी आदिवासी...
एकरकमी एफआरपीबाबत साखर कारखान्यांचे मौनसातारा ः जिल्ह्यातील बहुतांशी कारखान्यांचा ऊस...
‘बळिराजा'चे सोळा उमेदवार जाहीरकोल्हापूर : देशात शिक्षण, आरोग्य, रोजगार तसेच...
साताऱ्यात हिरवी मिरची ४०० ते ५०० रुपये...सातारा ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...
धुळ्यात भाजपमध्ये अंतर्गत धुसफुसजळगाव ः लोकसभा निवडणुकीत भाजपचे जळगाव व...
नाशिकमध्ये युतीचे उमेदवार ठरेनानाशिक: लोकसभेच्या निवडणुकीसाठी नाशिक व दिंडोरी...
पुणे जिल्ह्यातील सात साखर कारखान्यांचा...पुणे ः पुणे जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा ऊस गाळप...
उष्णतेचे कारण देऊन पपईच्या दरात अडवणूकनंदुरबार : जिल्ह्यातील पपई उत्पादकांना अपेक्षित...
नांदेड जिल्ह्यात साडेअकराशे हेक्टरवर...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात गुरुवार (ता. १४) पर्यंत...
नगर जिल्हाधिकाऱ्यांच्या तपासणी मोहिमेची...नगर : जनावरांच्या छावण्या सुरू केल्या. मात्र,...
वऱ्हाडात हळद काढणीला सुरवातअकोला : वऱ्हाडात दुष्काळी परिस्थिती, तसेच पाणी...
परभणीतील पशुवैद्यक विद्यार्थ्यांचे भीक...परभणी ः पशुसंवर्धन विभागांतर्गंत पशुधन सहायकांना...
नाशिक जिल्ह्यात बिबट्यांचा धुमाकूळनाशिक : नाशिक शहर व जिल्ह्यात बिबट्याच्या...
सोलापूर कृषी विज्ञान केंद्राला...सोलापूर : भारतीय कृषी व संशोधन परिषदेअंतर्गत...
नगर जिल्ह्यात सव्वा कोटी टन उसाचे गाळपनगर ः जिल्ह्यातील २३ सहकारी व खासगी साखर...
सोलापूर जिल्हा दूध संघाचे पैसे...सोलापूर : दूध अनामत रक्कम, पशुखाद्य व गायी...