पुणे जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात पावसाचा जोर वाढला

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

पुणे : जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाचा जोर वाढला आहे. बुधवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये या भागातील अनेक ठिकाणी ४० मिलिमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली; तर लोणावळा येथे सर्वाधिक ९८ मिलिमीटर पाऊस पडल्याचे कृषी विभागातर्फे सांगण्यात आले.

जिल्ह्याच्या पश्‍चिम भागातील जुन्नर, अांबेगाव, खेड, मावळ, मुळशी, वेल्हे तालुक्यात मंगळवारी दिवसभर पावसाच्या सरीवर सरी येत होत्या. तर मावळ, भोर, मुळशीमध्ये पावसाचा जोर अधिक होता. पश्‍चिम भागात पावसाने हजरी लावली असली तरी पूर्व भागातील शिरूर, दौंड, इंदापूर, बारामती, पुरंदर तालुक्यात ढगाळ हवामानासह पावसाची उघडीप असल्याचे दिसून आले. पावसाने हजेरी लावलेल्या भागात पेरण्यांच्या कामाला आणखी वेग येणार आहे.  

जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही पावसाचा जोर वाढल्याचे दिसून आले. मुळा, मुठा आणि निरा नदीच्या खोऱ्यात चांगला पाऊस झाला. तर कुकडी आणि भीमेच्या उपखोऱ्यातही पाऊस सुरू आहे. पावसामुळे धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ होणार आहे. बुधवारी सकाळी ८ वाजेपर्यंत टेमघर परिसरात ५९ मिलिमीटर, वरसगाव ४१, पानेशत ३७, पवना २४, मुळशी ७६, कलमोडी २४, वडीवळे ४२, गुंजवणी २९, निरा देवघर २३, पिंपळगाव जोगे २०, तर डिंभे धरण क्षेत्रात १२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

आकडेवारी दृष्टिक्षेपात जिल्ह्यात बुधवारी (ता. ४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये पडलेला पाऊस (मिलिमीटरमध्ये - स्रोत कृषी विभाग) : पौड ४३, घोटावडे २१, माले ७६, मुठे ५९, पिरंगुट २४, भोलावडे ६५, नसरापूर ३५, निगुडघर २३, काले २४, कार्ला ४८, खडकाळा २५, लोणावळा ९८, वेल्हा ४२, पानशेत ३७, विंझर ४४, अंभवडे ३४, राजूर ४८, डिंगाेरे ४२, कुडे ३२, पाईट २१, आंबेगाव २०, मंचर ३६.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com