agriculture news in marathi, Rainfall with windy winds in the area of ​​Saykheda | Agrowon

सायखेडा परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 4 ऑक्टोबर 2018

सायखेडा, जि. नाशिक : अनेक दिवसांपासून चातक पक्ष्याप्रमाणे वाट पाहत असलेल्या शेतकऱ्यांना सोमवारी (ता. १)अचानक आलेल्या पावसाने काहीसा दिलासा दिला; मात्र वादळामुळे अनेक शेकऱ्यांच्या द्राक्षबागा उखडल्या. सायखेडा येथील कांदा शेड उडून व्यापाऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाले.

तीन महिन्यांपासून दडी मारलेल्या पावसाने सोमवारी सायखेडा परिसरात हजेरी लावल्याने शेतकरी वर्गात काहीसे समाधान पसरले आहे. संध्याकाळी सहा वाजेनंतर सायखेडा परिसरात काही ठिकाणी जोरदार, तर काही ठिकाणी तुरळक पावसाच्या सरी कोसळल्या.  सायखेडा परिसरातील शिंगवे करंजगाव सोनगाव चाटोरी आदी परिसरात पावसाने हजेरी लावली.

सायखेडा, जि. नाशिक : अनेक दिवसांपासून चातक पक्ष्याप्रमाणे वाट पाहत असलेल्या शेतकऱ्यांना सोमवारी (ता. १)अचानक आलेल्या पावसाने काहीसा दिलासा दिला; मात्र वादळामुळे अनेक शेकऱ्यांच्या द्राक्षबागा उखडल्या. सायखेडा येथील कांदा शेड उडून व्यापाऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाले.

तीन महिन्यांपासून दडी मारलेल्या पावसाने सोमवारी सायखेडा परिसरात हजेरी लावल्याने शेतकरी वर्गात काहीसे समाधान पसरले आहे. संध्याकाळी सहा वाजेनंतर सायखेडा परिसरात काही ठिकाणी जोरदार, तर काही ठिकाणी तुरळक पावसाच्या सरी कोसळल्या.  सायखेडा परिसरातील शिंगवे करंजगाव सोनगाव चाटोरी आदी परिसरात पावसाने हजेरी लावली.

दरम्यान, वादळी वाऱ्यामुळे सोनगाव-करंजगाव रस्त्यावर शिंगवे (ता. निफाड) शिवारात असणाऱ्या सायखेडा येथील कांदा व्यापारी महेश भुतडा यांच्या शेडचे छत कोसळून मोठे नुकसान झाले. शेडमधील २ हजार क्विटंल कांदा भिजला. त्यामुळे त्यांचे अंदाजे १० लाख रुपयांचे नुकसान झाले. शिंगवे येथील सुभाष कोरडे यांची द्राक्ष बाग उखडल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले.

चांदवड तालुक्यात गारपीट
सोमवारी (ता.१) आणि मंगळवारी (ता.२) चांदवड तालुक्यात देवरगाव परिसरात वादळी वारा आणि त्यानंतर गारांचा पाऊस झाला. या पावसाने छाटणी झालेल्या द्राक्षबागांसह, टोमॅटो व फुलशेतीचे नुकसान झाले असल्याचे द्राक्ष उत्पादकांनी सांगितले.

परतीच्या पावसाने चांदवड भागातील काही गावांना झोडपले. यामध्ये देवरगाव, भोयेगाव या गावांच्या परिसरात गारांचा पाऊस झाला. सुमारे अर्धा तास गारपीट झाली. या परिसरात द्राक्षबागा मोठ्या प्रमाणात आहेत. पालवी फुटण्याच्या स्टेजला असलेल्या द्राक्षबागांना मोठा फटका बसला. तसेच, या भागामध्ये टोमॅटो आणि झेंडूच्या फुलांची शेतीही मोठ्या प्रमाणावर केली जाते. त्याचेही नुकसान झाले. झेंडूची झाडे आडवी पडली आहेत. टोमॅटो पिकाचेही अतोनात नुकसान झाले.

इतर बातम्या
पुणे विभागात पाणीटंचाईची तीव्रता वाढलीपुणे : पावसाळा संपताच उन्हाचा चटका वाढल्याने पुणे...
नांदेड जिल्ह्यात मुगाची उत्पादकता...नांदेड ः यंदा नांदेड जिल्ह्यातील १४ तालुक्यांतील...
निर्यात वाढविण्यासाठी कृषी विभाग...परभणी ः शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर...
दुष्काळी तालुक्यांतून अकोले, कोपरगावला...नगर : अकोले तालुक्‍यात पाऊस पडण्याच्या प्रमाणात...
सोयाबीनने मोडले शेतकऱ्यांचे कंबरडेअमरावती  ः दिवाळीच्या मोसमात दोन पैसे...
संतप्त शेतकऱ्यांनी हवामान विभागाला...पुणे : हवामान विभागाचा अंदाज चुकीचा...
शेतीमालाच्या साठवणुकीसाठी उभारणार गोदामेकऱ्हाड, जि. सातारा ः शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला...
हापूसचा ‘अल्फोन्सो जीआय’ वादातपुणे   : केंद्र सरकारने हापूस आंब्याला ‘...
तिसगाव उपबाजारात चाऱ्यासाठी उसाला...तिसगाव, जि. नगर  : पाथर्डी तालुक्‍यात...
साखर निर्यातीसाठी कारखान्यांनी पुढे...मुंबई   : अडचणीतील साखर उद्योगाला...
जलयुक्त शिवार, शेततळ्यांमुळे संरक्षित...अमरावती   : जिल्ह्यात शेततळी, जलयुक्त शिवार...
दक्षिण कोकणात बुधवारपासून शक्यतापुणे  : कमाल तापमानात चढ-उतार होत असला तरी...
बांगलादेशातील रेशीम उद्योग...प्राचीन काळी भारतीय उपखंडामधील रेशमी कापड हे जगभर...
पंजाब, हरियानात पिकांचे अवशेष जाळण्यावर...गुडगाव : पिकांचे अवशेष जाळण्यावर असलेली बंदी...
शबरीमला मंदिर प्रवेशप्रकरणी केरळमध्ये...तिरुअनंतपुरम, केरळ : शबरीमला मंदिरात सर्व...
नैसर्गिक समतोलासह खाद्यसुरक्षेसाठी...२०५० मध्ये जगाची लोकसंख्या १० अब्जांपर्यंत पोचेल...
भातशेती वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपडनगर ः ‘पोळ्यापासून पाऊस नाही. पोळ्याला गेला तरी...
म्हैसाळ उपसाचे मागणीअभावी काही पंप बंदसांगली ः म्हैसाळ उपसा सिंचन आठवडाभरापूर्वी पंप...
सातारी आल्याच्या बाजारभावात सुधारणासातारा ः आले पिकाच्या दरात सुधारणा झाली आहे....
कमी पाऊस झाल्याने मनरेगा’च्या मजुर...नगर : पावसाने हात आखडता घेतल्याने खरीप हंगाम वाया...