agriculture news in marathi, rains are beneficial for paddy nursery, pune, maharashtra | Agrowon

पुणे जिल्ह्यात पावसामुळे भात रोपवाटिकांना दिलासा
टीम अॅग्रोवन
शनिवार, 23 जून 2018

पावसाअभावी भात रोपवाटिकेतील रोपे सुकत होती. गुरुवारी झालेल्या पावसामुळे भात रोपांना दिलासा मिळाला आहे. येत्या चार ते पाच दिवसांत आणखी चांगला पाऊस झाल्यास भात लागवडीस सुरवात होईल.
- तारांचद जेधे, शेतकरी, भोर, जि. पुणे.

पुणे : गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे भात उत्पादक चिंतेत होते. गुरुवारी (ता. २१) दुपारनंतर पुणे शहरासह जिल्ह्यातील पश्‍चिम पट्ट्यात झालेल्या पावसामुळे भात रोपवाटिकांना दिलासा मिळाला आहे. येत्या आठवडाभरात दमदार पाऊस झाल्यास भात रोपांच्या लागवडी वेळेवर होण्याची चिन्हे आहेत.

मागील दहा ते पंधरा दिवसांपासून पावसाचा खंड पडला. त्यामुळे शेतकरी चांगलेच चिंतेत होते. अनेक ठिकाणी पेरण्याही खोळंबल्या होत्या. गेल्या पंधरवड्यात पश्‍चिमेकडील भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, हवेली आणि उत्तरेकडील खेड, जुन्नर, आंबेगाव तालुक्‍यांतील शेतकऱ्यांनी भात लागवडीसाठी रोपवाटिका टाकल्या होत्या. सध्या ही रोपे उगवून वर आली असून, अनेक ठिकाणी ती वाढीच्या अवस्थेत आहे. परंतु, पावसाने हुलकावणी दिल्यामुळे या रोपवाटिकेतील रोपे पाण्याअभावी सुकू लागली होती. त्यामुळे शेतकरी पावसाची प्रतीक्षा करीत होते. वेळेवर पाऊस नाही झाला तर पुन्हा भात रोपवाटिका तयार कराव्या लागतील काय याची चिंता त्यांना होती.

गुरुवारी सकाळपासून जिल्ह्यातील अनेक भागांत उकाडा वाढला होता. दुपारनंतर अचानक ऊन सावल्याचा खेळ सुरू होऊन काही भागांत पावसाच्या हलक्‍या सरी बरसत होत्या. मात्र, तीन वाजेच्या सुमारास पुणे शहरासह, पिपंरी-चिंचवड, उपनगरे, भोर, वेल्हा, मावळ, मुळशीच्या काही भागांत मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झाला. या पावसाने पिकांसह भात रोपवाटिकांना दिलासा मिळाला. सायंकाळी अनेक ठिकाणी पावसाची रिपरिप सुरू होती.

जिल्ह्यातील खडकवासला, वरसगाव, टेमघर, पवनासह काही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात हलका पाऊस झाला. येत्या काही दिवसांत या क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्यास ओढे नाले भरून वाहू लागतील. त्यामुळे धरणातील पाणीपातळीत वाढ होण्याची शक्‍यता आहे.
 

इतर ताज्या घडामोडी
किमान तापमानात वाढ, उन्हाळी हंगामास...महाराष्ट्रावर १०१४ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब...
पुणे विभागात हरभऱ्याची ४९ टक्केच पेरणीपुणे : पावसाळ्यात कमी पावसामुळे जमिनीत पुरेशी ओल...
शाळांमधील ४९८ खोल्या धोकादायकपुणे : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने...
मराठवाड्यात रब्बी पिकांची वाढ खुंटलीऔरंगाबाद : पाण्याचा ताण, तापमानातील चढउतार यामुळे...
अमरावतीत तूर, कापसाला मिळेना भावअमरावती : चीनकडून भारतीय सोयाबीनला वाढती...
गुलाब उत्पादकांच्या कष्टाला मिळाले फळ नाशिक : दुष्काळी परिस्थिती, कमी असलेला भाव,...
लोकसभेसाठी माढ्यातून तुल्यबळ उमेदवारकऱ्हाड : लोकसभेसाठी माढा मतदारसंघात भारतीय जनता...
उपोषणासाठी बाजार समित्यांच्या...नाशिक : नियमनमुक्तीमुळे बाजार समित्यांचे...
परभणीतील शेतकऱ्यांचे कोल्हापुरात आंदोलनकोल्हापूर : परभणी जिल्ह्यातील नुकसानग्रस्त...
युवकांच्या सहकारी संस्था स्थापणार :...कऱ्हाड : राज्यातील सहकारी संस्थांचे सभासद हे ६०...
बाजार समित्यांमधील...नाशिक : तेलंगण, तमिळनाडू व कर्नाटकच्या धर्तीवर...
पुलवामातील हल्ल्यात बुलढाणा जिल्ह्याचे...बुलडाणा : पुलवामा येथे झालेल्या अतिरेकी ...
हल्ल्या मागे जे आहेत त्यांना शिक्षा...नवी दिल्ली : जम्मू-काश्‍मीरच्या पुलवामा...
आम्ही विसरणार नाही.. माफही करणार नाही...नवी दिल्ली- जम्मू-काश्‍मीरच्या पुलवामा जिल्ह्यात...
काश्‍मीरमधील शेतकऱ्याला थकबाकीची रक्कम...पुणे : काश्‍मीरमधील शेतकऱ्याला सफरचंदाचे पैसे...
बिबट्याच्या दहशतीखाली चोरट्यांकडून...आंबेठाण, जि. पुणे : शिंदे गाव (ता. खेड) येथे दोन...
‘डिंभे’चे पाणी जोड बोगद्याद्वारे ‘...मुंबई : डिंभे डाव्या तीर कालव्यातील गळती...
विदर्भात आज गारपीट, हलक्या पावसाचा अंदाजपुणे : पोषक हवामानामुळे आज (ता. १४) विदर्भात...
कापसासाठी ‘एमसीएक्‍स’कडून गोदामांची...मुंबई : कापूस उत्पादक शेतकऱ्यांना समृद्ध...
कर्ज देण्याच्या नावाखाली ७३ शेतकऱ्यांची...गोंदिया : कर्ज देण्याच्या नावाखाली ७३...