agriculture news in marathi, Rainy assembly session to be held in Nagpur | Agrowon

पावसाळी अधिवेशन नागपुरात; लगबग सुरू
सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 16 मे 2018

मुंबई ः विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन मुंबईत होणार की नागपुरात, हा तिढा सुटला असून हे अधिवेशन नागपुरात होण्याचे जवळपास निश्‍चित झाले आहे. येत्या चार जुलैपासून हे अधिवेशन सुरू होणार असून, तीन आठवडे इतके कामकाज होणार आहे. यासाठी विधिमंडळाचे, तसेच मंत्रिमंडळ आस्थापनावरील अधिकारी- कर्मचारी यांची लगबग सुरू आहे. त्यामुळे पावसाळी अधिवेशन नागपूर येथे होणार असल्याचे निश्‍चित झाले आहे.

मुंबई ः विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन मुंबईत होणार की नागपुरात, हा तिढा सुटला असून हे अधिवेशन नागपुरात होण्याचे जवळपास निश्‍चित झाले आहे. येत्या चार जुलैपासून हे अधिवेशन सुरू होणार असून, तीन आठवडे इतके कामकाज होणार आहे. यासाठी विधिमंडळाचे, तसेच मंत्रिमंडळ आस्थापनावरील अधिकारी- कर्मचारी यांची लगबग सुरू आहे. त्यामुळे पावसाळी अधिवेशन नागपूर येथे होणार असल्याचे निश्‍चित झाले आहे.

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन बहुतांश मुंबईतच पार पाडले जाते. मात्र, यंदाचे अधिवेशन नागपुरात घेण्याविषयी सत्ताधारी पक्षाकडून वारंवार विधाने केली जात आहेत. यातच विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली तरीही ते नेमके कोठे पार पाडले जावे याबाबत ठोस निर्णय होत नव्हता. नागपूर येथे पावसाळी अधिवेशन घेतले जावे, याबाबत सत्ताधारी शिवसेना राजी नाही, त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा यास विरोध होता. मात्र, अलीकडे ठाकरे यांचा विरोध मावळला आहे, त्यामुळे पावसाळी अधिवेशन नागपुरातच पार पाडले जाईल, हा ठाम विश्‍वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निकटवर्तीयांकडून व्यक्‍त केला जात आहे. त्यातच विधिमंडळाचे अधिकारी, कर्मचारी हे प्रवासाचे आरक्षण, विमान तिकिटे याची चौकशी करीत आहेत. विधिमंडळ अधिकाऱ्यांना नागपूर येथे पाठवून प्राथमिक पाहणी करण्यास सांगितले आहे.

इतर बातम्या
संत एकनाथ महाराज समाधी दर्शनासाठी...पैठण, जि. औरंगाबाद : पैठण येथील शांतीब्रह्म श्री...
खानदेशात टॅंकरचा आकडा शंभरी पारजळगाव  : खानदेशात पाणीटंचाई तीव्र होत आहे....
जंगलातून होणाऱ्या नत्र प्रदूषणाचे...अमेरिकन वनसेवेतील शास्त्रज्ञांनी जंगलातून...
वनस्पती अवशेषापासून स्वस्त, शाश्वत हवाई...पिकांचे अवशेष आणि झाडांची लाकडे यांच्यापासून...
नागपुरात लघुसिंचनचे बारा तलाव कोरडेहिंगणा, नागपूर : जिल्हा परिषद लघुसिंचन विभागाच्या...
खानदेशात बाजरी मळणीवरजळगाव : खानदेशात बाजरी पीक मळणीवर आले आहे. आगामी...
गिरणाच्या पाण्यासाठी आज रास्ता रोकोजळगाव : दुष्काळी परिस्थितीमुळे गिरणा पट्ट्यातील...
थकीत चुकाऱ्यांसाठी स्वाभिमानी आक्रमकबुलडाणा : जिल्ह्यात शेतकऱ्यांनी तूर, मूग, उडदाची...
सोलापूरसाठी उजनीतून पाणी सोडलेसोलापूर : उजनी धरणातून भीमा नदीपात्रात सोलापूर...
सोलापूर जिल्ह्यात टँकरचा आकडा सव्वाशेवरसोलापूर  : जिल्ह्यात उन्हाच्या वाढत्या...
लासुर्णेमध्ये जिल्हा बॅंकेसमाेर...वालचंदनगर, जि. पुणे ः लासुर्णे (ता. इंदापूर)...
अकोला, बुलडाण्यात अर्ज दाखल करण्यासाठी...अकोला : लोकसभा निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल...
सांगली जिल्ह्यात ऊस गाळप हंगाम अंतिम...सांगली ः साखर कारखान्यांच्या गळीत हंगामातील...
देहूगाव-लोहगाव गटातून शिवसेनेच्या शैला...पुणे : सदस्याचे जातपडताळणी प्रमाणपत्र फेटाळल्याने...
परभणी जिल्ह्यात मनरेगाअंतर्गत १४६...परभणी ः महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार...
जळगाव, धुळे, नंदुरबारमध्ये रंगणार...जळगाव ः खानदेशात रावेर वगळता नंदुरबार, धुळे व...
शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती : '...मुंबई ः शेतीच्या शाश्वत सुधारणेला गती देण्यासाठी...
शेतकरी कंपन्यांमार्फत रेशीम धागा...परभणी ः ‘‘शेतकरी उत्‍पादक कंपन्‍या स्‍थापन करून...
गरिबांना वार्षिक ७२ हजारांच्या हमीचे...नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेसने...
नांदेड जिल्ह्यात तूर उत्पादकता...नांदेड  ः नांदेड जिल्ह्यात २०१८-१९ मधील खरीप...