Agriculture news in marathi, Rainy rains in most parts of the district | Agrowon

सोलापूर जिल्ह्यातील बहुतांश भागांत पावसाची रिमझिम
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 13 जुलै 2018
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने गुरुवारी (ता. १२) पुन्हा हजेरी लावली. पहाटेपासून दुपारपर्यंत त्याची रिमझिम सुरू होती; पण त्यात अधिक जोर नव्हता. त्यानंतरही दिवसभर कधी ढगाळ, कधी पाऊस तर कधी ऊन असे वातावरण होते.
 
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने गुरुवारी (ता. १२) पुन्हा हजेरी लावली. पहाटेपासून दुपारपर्यंत त्याची रिमझिम सुरू होती; पण त्यात अधिक जोर नव्हता. त्यानंतरही दिवसभर कधी ढगाळ, कधी पाऊस तर कधी ऊन असे वातावरण होते.
 
गेल्या दोन-तीन दिवसांपासून नुसतेच ढगाळ वातावरण राहते. पण पाऊस काही पडत नाही. गुरुवारीही पहाटेपासूनच वातावरणात एकदम बदल झाला आहे. आभाळ ढगांनी दाठून गेले होते. सकाळी सहाच्या सुमारास रिमझिम पावसाला सुरवात झाली. दुपारी एक वाजेपर्यंत थांबून-थांबून पावसाची रिमझिम सुरू होती. दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, मोहोळ, पंढरपूर भागात असे वातावरण कायम होते.
पावसाळा सुरू होऊन दीड महिना उलटला तरीदेखील अजूनही जिल्ह्यात पावसाचा जोर नाही. जूनच्या पहिल्या पंधरवड्यात झालेल्या हलक्या पावसावर खरिपाच्या पेरण्या उरकल्या आहेत. आता उगवलेल्या पिकांना पावसाची गरज आहे. मात्र पाऊस लांबत चालल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. यंदा आतापर्यंत ५४ हजार हेक्‍टरवर (६०) पेरण्या झाल्या आहेत. 
 
उजनी धरणाच्या पातळीत वाढ     
पुणे जिल्ह्यातील धरणक्षेत्रात पाऊस झाल्याने सोलापूर जिल्ह्यासाठी वरदान असलेल्या उजनी धरणाच्या साठ्यात हळूहळू वाढ होत आहे. त्यामुळे जिल्ह्याला काहीसा दिलासा मिळाला आहे. दौंडकडून उजनी धरणात ४२८२ क्‍युसेक इतके पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे गुरुवारी (ता. १२) धरणाची पाणीपातळी ४८९.९५० मीटरपर्यंत होती. गेल्या काही दिवसांतील पातळीचा विचार करता जवळपास दोन ते अडीच टक्क्यांनी पाणीपातळीत वाढ झाली आहे.

इतर ताज्या घडामोडी
खानदेशात मध्यम पाऊस; नंदुरबारला हुलकावणीजळगाव : खानदेशात शुक्रवारी (ता.२१) मध्यरात्री व...
पुणे जिल्ह्यात ढगाळ हवामानपुणे  : जिल्ह्यात आठवड्याच्या सुरवातीला...
खानापूर घाटमाथ्यावर तीव्र पाणीटंचाई सांगली  : घाटमाथ्यावर पावसाने ओढ दिली आहे....
नगर जिल्ह्यात साडेसहा लाख हेक्‍टरवर...नगर  ः जिल्ह्यात रब्बी हंगामात सहा लाख ५२...
कौशल्यावर आधारित उपक्रम ‘रयत’मध्ये सुरू...सातारा  ः केवळ पुस्तकी नव्हे तर कौशल्यावर...
नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचा अकोला...अकोला  ः नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या...
सांगली जिल्ह्यात पाणीप्रश्‍न पेटण्याची...सांगली  : पावसाने दिलेली उघडीप आणि पावसाळा...
अकोला, बुलडाण्यात सर्वदूर पाऊसअकोला   ः वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा या...
सावधान... अल्झायमर आला उंबरठ्यावर ! कोल्हापूर : मंगळवार पेठेतल्या विठ्ठल मंदिरात रोज...
परभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ६०० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला...
भातावरील तुडतुडे प्रादुर्भावाकडे...सध्या खरीप हंगामातील भात पीक बहुतेक ठिकाणी...
कमी तीव्रतेच्या वणव्यांचाही मातीच्या...कमी तीव्रतेचे वणवे किंवा मर्यादित प्रमाणात...
ढगाळ वातावरणाने खानदेशात सोयाबीन मळणीला...जळगाव : खानदेशातील धुळे, नंदुरबार व जळगाव...
माळेगावकरांचा औद्योगिक वसाहतीच्या...नाशिक : माळेगाव औद्योगिक वसाहतीच्या टप्पा क्रमांक...
परभणीत व्यापाऱ्यांचे असहकार आंदोलन सुरूचपरभणी ः परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत...
सांगली जिल्ह्यात द्राक्ष क्षेत्रात वाढसांगली  ः दर्जेदार द्राक्ष उत्पादनासाठी...
धुळे, जळगाव जिल्ह्यांतील पैसेवारी चुकीचीजळगाव   ः धुळे व जळगाव जिल्ह्यांत हवा तसा...
नैसर्गिक आपत्तीत यवतमाळमधील ६२ हजार...यवतमाळ   ः जिल्ह्यात या वर्षी आलेल्या...
पुणे जिल्‍ह्यात पावसाच्या हलक्या ते...पुणे : पावसाच्या मोठ्या खंडानंतर जिल्ह्याच्या...
नगर जिल्ह्यावर दुष्काळाचे सावटनगर  ः जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी फक्त ६५.५५...