agriculture news in marathi, Rainy weather in 85 mandals in Marathwada | Agrowon

मराठवाड्यात ८५ मंडळांत पावसाचे धूमशान
टीम अॅग्रोवन
बुधवार, 22 ऑगस्ट 2018

औरंगाबाद : मराठवाड्यातील ८५ मंडळांत पावसाने मंगळवारी (ता. २१) सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत पुन्हा एकदा धूमशान केले. परभणी, हिंगोली व नांदेड जिल्ह्यात पावसाचा जोर सर्वाधिक होता; तर मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत सरासरी ४२.५५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. गत काही दिवसांत झालेल्या पावसामुळे मराठवाड्यात पडणाऱ्या एकूण पावसाच्या तुलनेत पडलेल्या पावसाचा टक्‍का सुधारण्यास मदत झाली आहे.

औरंगाबाद : मराठवाड्यातील ८५ मंडळांत पावसाने मंगळवारी (ता. २१) सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत पुन्हा एकदा धूमशान केले. परभणी, हिंगोली व नांदेड जिल्ह्यात पावसाचा जोर सर्वाधिक होता; तर मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत सरासरी ४२.५५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. गत काही दिवसांत झालेल्या पावसामुळे मराठवाड्यात पडणाऱ्या एकूण पावसाच्या तुलनेत पडलेल्या पावसाचा टक्‍का सुधारण्यास मदत झाली आहे.

मराठवाड्यात १५ ते १७ ऑगस्टदरम्यान लावलेल्या दमदार ते जोरदार हजेरीनंतर पावसाने थोडी उसंत घेतली होती. त्यानंतर पुन्हा एकदा सोमवारी (ता. २०) दुपारपासून पाऊस मराठवाड्यात सक्रिय झाला आहे. औरंगाबाद जिल्ह्यात सरासरी ३५ मिलिमीटर पाऊस झाला. जिल्ह्यातील तीन मंडळांत ६५ मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला.

जालना जिल्ह्यात सरासरी ३१.७५ मिलिमीटर पाऊस झाला; तर सर्वाधिक पाऊस झालेल्या जिल्ह्यातील मंठा तालुक्‍यातील तळणी मंडळात ६५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. परभणी जिल्ह्यात सरासरी ५१.९९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. जिल्ह्यातील सात मंडळांत ६५ मिलिमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली. पालम तालुक्‍यात सर्वाधिक सरासरी ६२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

हिंगोली जिल्ह्यात सरासरी ६१.९६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्‍यात सर्वाधिक सरासरी ८४ मिलिमीटर पाऊस झाला; तर तालुक्‍यातील १३ मंडळांत ६५ मिलिमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली.

नांदेड जिल्ह्यात पावसाचा जोर सर्वाधिक राहिला. जिल्ह्यातील ८० मंडळांपैकी तब्बल ६० मंडळात ६५ ते १३०  मिलिमीटर पावसाची नोंद झाली. जिल्ह्यातील उमरी, कंधार, हिमायतनगर तालुक्‍यात सरासरी शंभर मिलिमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली. तर मुदखेड, भोकर तालुक्‍यात सरासरी ९० मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला. बीड जिल्ह्यात सरासरी सरासरी २७.७१ मिलिमीटर पाऊस झाला. सर्वाधिक सरासरी ४७.२० मिलिमीटर पाऊस झालेल्या परळी तालुक्‍यातील पिंपळगाव गाडे मंडळात ७३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

लातूर जिल्ह्यात सरासरी २८.४५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्‍यात सर्वाधिक सरासरी ४६ मिलिमीटर पाऊस झाला. उस्मानाबाद जिल्ह्यात सरासरी २२.२८ मिलिमीटर पाऊस झाला. जिल्ह्यातील लोहारा तालुक्‍यात सर्वाधिक ३६.६७ मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याची माहिती विभागीय आयुक्‍तालयाच्या सूत्रांनी दिली.

६४ हजार हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान
नांदेड जिल्ह्यातील किनवट व माहूर तालुक्‍यातील ६४७८० हेक्‍टरवरील जिरायती पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

इतर ताज्या घडामोडी
सागरी नत्र साखळीतील महत्त्वाच्या...सागरी पाण्यातील अमोनिया ऑक्सिडेशन करणारे...
पुणे जिल्ह्यात ३७ लाख ३३ हजार टन ऊस...पुणे ः पुणे जिल्ह्यातील १७ साखर कारखान्यांचा गळीत...
नांदेड विभागात २८ लाख क्विंटल साखरेचे...नांदेड ः नांदेड येथील प्रादेशिक साखर सहसंचालक...
जतला पाणी देण्यास कर्नाटकचे मुख्यमंत्री...जत, जि. सांगली ः तुबची बबलेश्वर (कर्नाटक)...
राज्यात टोमॅटो प्रतिक्विंटल ३०० ते १२००...सोलापुरात सर्वाधिक दर ८०० रुपये सोलापूर ः...
दुष्काळात बॅंकांची सक्तीची वसुली थांबवा...बुलडाणा ः सध्या जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती आहे...
सव्वाआठ रुपये दर मिळाला तरच पपईची विक्रीजळगाव  : खानदेशात पपई उत्पादकांना सव्वाआठ...
केळी दरांची अंमलबजावणी होईनाजळगाव : खानदेशात केळीच्या दरांबाबत दबाव...
मराठा आरक्षण : ज्येष्ठ विधिज्ञ हरीश...मुंबई : राज्य सरकारने मराठा समाजाला शिक्षण आणि...
जिनिंग मालकाने शेतकऱ्याला घ्यायला लावली...वर्धा : एका हातात पाण्याचा ग्लास आणि दुसऱ्या...
स्वतंत्र भारत पक्षाकडून ‘आपले सरकार’चा...नगर : राज्यात आणि देशात शेतकऱ्यांची लूट करणारे...
ढगाळ वातावरण, भुरीच्या धोक्याकडे लक्ष...बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या वादळाचा परिणाम...
पीकविम्याच्या हप्त्याची वेळ अत्यंत...हवामानातील विविध घटकांमुळे पिकांचे अनेक वेळा...
खानदेशात रब्बीचे ७९ टक्के क्षेत्र नापेरजळगाव :खानदेशात रब्बी पिकांमध्ये मका, गव्हाची...
फरदड कपाशीचे उत्पादन टाळावे ः कुलगुरू...नांदेड ः आगामी खरीप हंगामामध्ये कपाशीवर गुलाबी...
पायाभूत सुविधांअभावी रेशीम उत्पादक...बीड : रेशीम कोष उत्पादन वाढीसाठी महारेशीम अभियान...
‘एफआरपी’ थकविलेल्या कारखान्यांना दणकाकोल्हापूर : हंगाम सुरू होऊन दीड महिन्याचा कालावधी...
अकोल्यात ‘अात्मा’ शेतकरी सल्लागार...अकोला ः शेतकऱ्यांपर्यंत आधुनिक तंत्रज्ञान पोचवण्‍...
भंडारा जिल्ह्यातील भूजल पातळी खोलभंडारा : जिल्ह्यात सामान्य पर्जन्यमानाच्या...
साताऱ्यात गवार प्रतिदहा किलो ३०० ते ४५०...सातारा ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी...