agriculture news in Marathi, raisin rates increased, Sangli, Maharashtra | Agrowon

बेदाण्याच्या दरात वाढ
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 6 एप्रिल 2018

सांगली : ः गतवर्षीच्या तुलनेत यंदा बेदाणानिर्मितीला पोषक वातावरण मिळाल्याने बहुतांश शेतकऱ्यांना गुणवत्तेचा बेदाणा तयार करणे शक्‍य झाले आहे. सध्या चांगल्या प्रतीच्या बेदाण्याच्या दरात वाढ झाली असून, प्रतिकिलोस १५० ते २२५ रुपये असा दर मिळत आहे. 

सांगली : ः गतवर्षीच्या तुलनेत यंदा बेदाणानिर्मितीला पोषक वातावरण मिळाल्याने बहुतांश शेतकऱ्यांना गुणवत्तेचा बेदाणा तयार करणे शक्‍य झाले आहे. सध्या चांगल्या प्रतीच्या बेदाण्याच्या दरात वाढ झाली असून, प्रतिकिलोस १५० ते २२५ रुपये असा दर मिळत आहे. 

यंदा बेदाण्याच्या उत्पादनात सुमारे २० टक्‍क्‍यांहून अधिक घट झाली असली, तरी दरात वाढ होण्याची शक्‍यता असल्याची माहिती बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांनी दिली. द्राक्षाच्या छाटण्या सप्टेंबरमध्ये झाल्यास हंगामाच्या प्रारंभी बेदाणा बाजारपेठेत येतो; परंतु यंदा अनुकूल हवामानात सातत्य नसल्याने द्राक्ष बागायतदारांनी छाटणीचा कार्यक्रम पंधरा ते वीस दिवसांनी पुढे ढकलला. 

गतवर्षीपेक्षा यंदाच्या हंगामात बेदाणानिर्मितीसाठी पोषक वातावरण असल्याने दर्जेदार बेदाणानिर्मिती झाली आहे. सांगली जिल्ह्यात बेदाणा हंगाम सुरू झाला आहे. बेदाणानिर्मितीस गती आली आहे.

गेल्यावर्षीचा बेदाणा शिल्लक नाही, त्यामुळे नव्या बेदाण्याची मागणी वाढली आहे. गेल्या हंगामाच्या सुरवातीला बेदाण्याला ८० ते १६० रुपये किलो इतका दर मिळत होता, त्यानंतर हळूहळू त्यात वाढ होत गेली. २०१४ मध्ये बेदाण्याच्या दरात अशीच वाढ झाली होती. त्यानंतर गेल्या तीन वर्षांपासून बेदाण्याच्या दरात वाढ झाली नव्हती. यामुळे बेदाणा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला होता. मात्र, यंदाच्या हंगामात बेदाण्याला अपेक्षित दर मिळू लागला आहे. 

हंगामाच्या सुरवातीलाच १६० रुपये प्रतिकिलो असा दर मिळाला. त्यानंतर बेदाण्याच्या दरात हळूहळू वाढ होत गेली. यामुळे बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळाला आहे. 

इतर बातम्या
पाणीपुरवठ्यासाठी शिवसेनेचा रास्ता रोकोअकोला : जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाणीपुरवठा...
प्रकाशाच्या प्रदूषणाचा परागीकरणावरील...परागीकरण यशस्वी होण्यामागे संपूर्ण अंधार किंवा...
मराठवाड्यातील १७ लाख लोक टँकरवर अवलंबूनऔरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीटंचाई भीषणतेच्या...
खानदेशात पाणीटंचाईच्या तीव्रतेत वाढ जळगाव : हिवाळ्याचे दिवस अंतिम टप्प्यात असतानाच...
सांगलीत वाढली दुष्काळाची दाहकतासांगली : जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता वाढत आहे....
जळगाव जिल्हा परिषदेत अध्यक्षा एकाकीजळगाव : जिल्हा परिषदेत प्रशासन सदस्य,...
दरेसरसम साठवण तलावाचे काम सुरू करानांदेड : दरेसरसम (ता. हिमायतनगर) येथील साठवण...
`म्हैसाळ`च्या आवर्तनात आता शून्य गळतीसांगली : म्हैसाळ योजनेच्या येणाऱ्या आवर्तनात...
`सोलापुरात टंचाई कृती आराखड्याची...सोलापूर  : टंचाई परिस्थितीवर मात करण्यासाठी...
समुद्राच्या उधाणामुळे पीक नुकसान ...मुंबई  : समुद्र किनाऱ्यावरील शेतीचे तसेच...
‘मग्रारोहयो’त २८ नव्या कामांचा समावेशनागपूर : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण...
सोलापुर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील २३...सोलापूर : गेल्या दोन-तीन वर्षांत जिल्हा...
साखर कारखान्यांचे बॉयलर लवकर थंडावणारपुणे  : दुष्काळी स्थितीमुळे साखर...
नंदुरबार बाजार समितीत ओल्या लाल मिरचीची...जळगाव  ः खानदेशात एकीकडे थंडीने केळीला मोठा...
ॲग्रोवन स्मार्ट ॲवॉर्डसाठी शेतकऱ्यांचा...पुणे : संकटांपुढे हार न मानता प्रतिकूल...
पुणे जिल्ह्यात तीन लाख जमीन...पुणे   ः जमिनीतील विविध घटकांची माहिती...
पुणे जिल्हा परिषदेत दर रविवारी ‘...पुणे  : स्वयंसहायता समूहाच्या (बचत गट)...
गोदावरी कालव्यांचे लोकसहभागातून...कोपरगाव, जि. नगर ः शंभर वर्षांहुन अधिक आयुर्मांन...
सातारा जिल्ह्यात रब्बीत अवघे नऊ टक्के...सातारा  ः रब्बी हंगामात पीक कर्जाकडे...
महालक्ष्मी सरस प्रदर्शनामुळे  ग्रामीण...मुंबई   ः ॲमेझॉन, फ्लिपकार्टच्या...