दूध दरप्रश्‍नी राज्य सरकार दोषी : राज ठाकरे

राज ठाकरे
राज ठाकरे

पुणे  ः दूधदराचा प्रश्न गंभीर होत आहे. त्यावर राज्य शासन कोणताही निर्णय घेत नाही. परराज्यातील अमूल दूध संघासारखे इतरही संघ राज्यात घुसखोरी करीत आहेत. याकडे राज्य शासन जाणूनबुजून दुर्लक्ष करीत आहे. दूधप्रश्नी राज्य सरकार पूर्णतः दोषी आहे, असे मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केले.

मराठवाडा दौऱ्यावर जात असताना पुण्यातील पत्रकार संघ येथे बुधवारी (ता.१८) पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. त्या वेळी श्री. ठाकरे बोलत होते. श्री. ठाकरे म्हणाले, की राज्यात दुधाचा प्रश्न उपस्थित राहणार होता, हे आधीच शासनाला माहिती होते. त्यासाठी आधीच पाऊले उचलून दूध संघांची बैठक घेऊन प्रश्न सोडविण्याची गरज होती; परंतु राज्य शासनाकडून तसे झाले नाही. उलट शासनाकडून व्यवस्था मोडून काढण्याचे काम सुरू झाले. आज शेतकरी अडचणीत आले आहेत. त्यांना मदतीची गरज आहे. शासनाने त्यावर ठोस निर्णय घेण्याची गरज आहे.

वैद्यकीय शाखेच्या विद्यार्थ्यांना लागणारे दाखले, नीट, कंत्राटी कामगार, रस्त्यातील खड्डे असे विविध प्रश्न निर्माण होत आहेत. राज्य शासनाने त्यावर लक्ष देण्याची गरज आहे; परंतु राज्य शासनाकडून तसे काही होताना दिसत नाही. कारण राज्य केंद्र सरकार चालवत असून, हे सांगकामे आहेत. गेल्या पंधरा दिवसांपासून विधिमंडळ अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात कोणताही निर्णय होत नाही. रोज फक्त गदारोळ करून अधिवेशनाचे कामकाज बंद केले जाते. त्यामुळे मूळ विषयावर कोणीच बोलताना दिसत नाही, अशी टिका त्यांनी केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com