agriculture news in marathi, Rajama Growers in rate crises, satara, Maharashtra | Agrowon

दराअभावी 'राजमा' उत्पादक अडचणीत
टीम अॅग्रोवन
शनिवार, 4 नोव्हेंबर 2017

वाठार स्टेशन, जि. सातारा  ः आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मानांकन मिळालेला कोरेगावचा राजमा (घेवडा) दराअभावी घरात पडून ठेवावे लागत असल्याने येथील शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.

वाठार स्टेशन, जि. सातारा  ः आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मानांकन मिळालेला कोरेगावचा राजमा (घेवडा) दराअभावी घरात पडून ठेवावे लागत असल्याने येथील शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.

जिल्ह्यातील उत्तर कोरेगावमध्ये खरीप हंगामातील शेतकऱ्यांना पैसा मिळवून देणारे पीक म्हणून घेवड्याचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात घेतले जाते. या घेवड्यास जीआय मानांकन मिळाले आहे. जिल्ह्यात कोरेगाव, माण व खटावच्या काही ठराविक भागातच या घेवड्याचे पीक घेतले जाते. घेवडा हा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत राजमा या नावाने विकला जातो.
घेवड्याचे उत्पन्न आणि त्याला मिळत असलेला दर यावर येथील शेतकऱ्यांची आर्थिक उलाढाल ठरते.

यंदा घेवडा पेरणीनंतर पावसाचे प्रमाण कमी असले तरी दडी मारलेल्या माॅन्सूनने अधून-मधून थोडी फार हजेरी लावल्याने समाधानकारक उत्पन्न मिळाले आहे. मात्र, दराअभावी घेवड्याचे पीक अजूनही घरातच पडून असल्याने "चणे आहेत तर दात नाहीत'' अशी अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे. ८० रुपये दराने पेरणीसाठी घेतलेला घेवडा १५ ते ३० रुपयांपर्यंत विकला जात असल्याने शेतकऱ्यांचे भांडवलसुद्धा निघणे कठीण झाले आहे.

रोखे व्यवहार बंद झाल्यामुळे घेवड्याची खरेदी होत नसल्याने त्याचा परिणाम घेवड्याच्या दरावर झालेला दिसून येत आहे. या स्थितीत घेवडा उत्पादक आर्थिक अडचणीत सापडला आहे.
- बाळासाहेब देशमुख, 
शेतकरी, तळिये

 

इतर ताज्या घडामोडी
मार्चअखेरपर्यंत टप्प्याटप्याने... मंदीतील ब्रॉयलर्सचा बाजार मार्चअखेरपर्यंत...
पुण्यात लसूण, फ्लॉवर, मटार वधारलापुणे ः वाढता उन्हाळ्यामुळे शेतीमालाचे उत्पादन...
चीनमध्ये डेअरी उत्पादनांच्या मागणीमध्ये...चीनमध्ये डेअरी उत्पादनांच्या मागणीमध्ये प्रति...
राहुल गडपाले ‘सकाळ’चे चीफ कन्टेंट क्‍...पुणे : सकाळ माध्यम समूहाच्या संपादक संचालकपदी...
सत्तावीस कारखान्यांकडून १ कोटी २१ लाख... नगर  ः नगर, नाशिक जिल्ह्यांत सुरू असलेल्या...
पुणे जिल्ह्यातील १०० मंडळांमध्ये... पुणे  ः हवामान अंदाजाबाबत अचूक माहिती...
लाचखोर तालुका कृषी अधिकारी 'लाचलुचपत'...अकोला : जलसंधारणाच्या केलेल्या कामांची देयके...
परभणी जिल्ह्यातील चार लघू तलाव कोरडे परभणी ः पाणीसाठा संपुष्टात आल्यामुळे...
स्वखर्चाने शेततळे करणाऱ्यांना मिळेना...औरंगाबाद : शेतीला पाण्याची सोय व्हावी म्हणून...
कोल्हापुरात गुळाचे पाडव्यानिमित्त सौदे कोल्हापूर : येथील बाजार समितीत पाडव्यानिमित्त...
साखरेप्रमाणे कापसासाठी धाेरण ठरवावे :...पुणे : साखरेप्रमाणेच कापसासाठी दरावर लक्ष कें....
राज्यात आज अन्नत्याग आंदोलनमाळकोळी, नांदेड ः आजवर आत्महत्या केलेल्या...
'ईव्हीएम'ऐवजी आता मतपत्रिकांचा वापर...नवी दिल्ली : आगामी निवडणुकांमध्ये इलेक्‍...
राज-पवार भेटीने चर्चेला उधाणमुंबई : दिल्ली येथे कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी...
परभणीत ढोबळी मिरची १२०० ते १८०० रुपये... परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला...
औरंगाबाद येथे मोसंबी २००० ते ४५०० रुपये औरंगाबाद  : येथील बाजार समितीमध्ये शनिवारी...
कृषी सल्लामार्च महिन्यात उन्हाळी भुईमूग पिकाची पेरणी करू...
पशू सल्लागोठ्यातील अस्वच्छतेमुळे बऱ्याचदा दुधाळ जनावरांना...
सांगलीतील द्राक्ष, बेदाणा उत्पादक ढगाळ... सांगली : गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ...
जळगावमधील शेतकऱ्यांचा परदेश अभ्यास दौरा... जळगाव : परदेशातील शेतीचे तंत्रज्ञान, शेती,...