राजारामबापू दूध संघाला डेअरी उत्कृष्टता पुरस्कार
सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 30 सप्टेंबर 2017
इस्लामपूर, जि. सांगली ः राजारामबापू पाटील सहकारी दूध संघाला गुजरात येथील नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड (एनडीडीबी) यांच्यातर्फे देशपातळीवरील डेअरी उत्कृष्टता पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. 
 
इस्लामपूर, जि. सांगली ः राजारामबापू पाटील सहकारी दूध संघाला गुजरात येथील नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड (एनडीडीबी) यांच्यातर्फे देशपातळीवरील डेअरी उत्कृष्टता पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. 
 
महाराष्ट्रात असा पुरस्कार मिळणारा ‘राजारामबापू'' एकमेव दूध संघ ठरला आहे. केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह, गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी, कृषी कल्याण राज्यमंत्री पुरुषोत्तम रुपाला, आरोग्य मंत्री शंकर चौधरी, उद्योगमंत्री रोहितभाई पटेल आणि एनडीडीबीचे अध्यक्ष दिलीप रथ यांच्या हस्ते दूध संघाचे अध्यक्ष विनायकराव पाटील व कार्यकारी संचालक सुरेश पाटील यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
 
सन्मानचिन्ह, एक लाख रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. बोरगाव (ता. वाळवा) येथील अहिल्यादेवी महिला दूध संस्थेच्या उत्पादक कमल ज्ञानू गावडे यांनाही उत्कृष्ट महिला दूध उत्पादक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. ११ हजार रुपये रोख व सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. 
 
या बाबत माहिती देताना विनायकराव पाटील म्हणाले, की देशपातळीवरील मध्यम डेअरी एक ते पाच लाख लिटर प्रतिदिन संकलन विभागात राजारामबापू दूध संघाची निवड झाली. संबंधित संस्थेने संघ पातळीवर होणाऱ्या सर्वच कामांची तपासणी करून निवड केली. दुधाची प्रत्येक टप्प्यावर गुणवत्ता तपासून ते ग्राहकांपर्यंत पोचण्याची प्रक्रिया पाहण्यात आली.
 
उत्पादकांना दिला जाणारा परतावा, सेवानिविष्टा हेदेखील तपासले गेले. लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या ध्येयधोरणानुसार व आमदार जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक मंडळाने वेळोवेळी घेतलेले निर्णय यामुळे हा पुरस्कार मिळाला आहे. यावेळी कार्यकारी संचालक सुरेश पटेल, उपाध्यक्ष जगन्नाथ पाटील, संचालक बाळासाहेब पाटील उपस्थित होते. 

इतर ताज्या घडामोडी
नगर जिल्ह्यात सर्वाधिक शेतकऱ्यांना...नगर  : राज्यात कर्जमाफी मिळणारे सर्वाधिक...
राज्य सरकारचे धोरण शेतकरी हिताचे ः जानकरउस्मानाबाद  : राज्य सरकारचे धोरण...
शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्याचा सरकारचा...नाशिक : राज्यातील शेतकऱ्यांना ऐन दिवाळीत...
सणाच्या दिवशी शेतकऱ्यांचे ठेचा भाकर...बुलडाणा : एेन सण काळात स्वाभिमानी शेतकरी...
शेतीपूरक व्यवसायाच्या आराखड्याचे काम...पुणे : शेतकऱ्यांना कर्जमाफी केली असली तरी,...
औरंगाबाद येथे कर्जमाफी प्रमाणपत्राचे... औरंगाबाद  : औरंगाबाद जिल्हाधिकारी...
देशातील सर्वांत मोठी कर्जमाफी ः... सातारा  : शेती आणि शेतकऱ्यांना चांगले दिवस...
शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कर्जमाफी... हिंगोली : अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा...
कर्जमाफीमुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड ः... नांदेड : राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज...
शासन शेतीमाल प्रक्रिया उद्योगांवर भर... जळगाव  ः शेती व शेतकऱ्यांच्या विकासासाठी...
असंतोष विभागण्यासाठीच कर्जमाफीचे...मुंबई : सरकारने कर्जमाफीसाठी ज्या अटी- शर्ती लागू...
संत गजानन महाराज संस्थान करतेय...शेगाव, जि. बुलडाणा : शिस्त, सेवा अाणि समाज...
परभणीतील शेतकऱ्यांना कर्जमाफी... परभणी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
राज्यातील बहुतांशी भागांत उकाडा वाढलापुणे : परतीचा पाऊस राज्यातून गेल्याने बहुतांशी...
कर्जमाफीचा निर्णय ऐतिहासिक ः सदाभाऊ खोत कोल्हापूर : शेतकरी पुन्हा कर्जबाजारी होऊ नयेत...
कर्जमाफी शेतकऱ्यांना ताकद देणारी ः... बुलडाणा : राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज...
अपयश लपविण्यासाठी भाजपकडून खोटी...मुंबई: दुसऱ्या टप्प्यातील ३७०० ग्रामपंचायतींच्या...
औरंगाबादेत २९ ऑक्‍टोबरला 'मराठा महासभा' औरंगाबाद : मराठा समाजातर्फे राज्यभर 57 मोर्चे...
नागपुरात सोयाबीन प्रतिक्‍विंटल २७५०...नागपूर ः बाजारात सोयाबीनच्या दरात होणाऱ्या किरकोळ...
केवळ अमळनेरलाच कडधान्य खरेदी केंद्र सुरू जळगाव  ः जिल्ह्यात मंगळवारपर्यंत (ता. १७)...