एप्रिल महिन्यात राज्यातील तापमान ४० अंश सेल्शिअसच्या वर गेलेले असताना, वाढत्या इंधन दराचे चटकेही
ताज्या घडामोडी
शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करण्याची गरज अाहे. या मागणीसाठी अाम्ही किसान न्याय पदयात्रा काढत अाहोत. या यात्रेच्या माध्यमातून कर्जमाफीसाठी सरकारवर दबाव अाणण्याचा अामचा प्रयत्न असेल.
- सचिन पायलट, प्रमुख नेते, राजस्थान काँग्रेस
नवी दिल्ली ः शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी राजस्थानमध्ये कॉंग्रेसने ‘किसान न्याय पदयात्रा’ मंगळवारपासून (ता.३) सुरू केली.
या पदयात्रेला बारन येथून सुरवात होऊन तिचा समारोप मुख्यमंत्री वसुंधराराजे यांचा मतदारसंघ असलेल्या झालावाड येथे होणार अाहे. या यात्रेचा प्रवास शंभर किलोमीटरचा असेल, असे कॉंग्रेसच्या वतीने सांगण्यात अाले अाहे.
शेतकऱ्यांना तत्काळ संपूर्ण कर्जमुक्ती द्यावी, या मागणीसाठी ही यात्रा काढली जात असल्याचे राजस्थान कॉंग्रेसचे प्रमुख सचिन पायलट यांनी स्पष्ट केले.
राजस्थान सरकारने शेतकऱ्यांचे ५० हजार रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्याची नुकतीच घोषणा केली अाहे. या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसने राज्य सरकारकडे संपूर्ण कर्जमुक्तीची मागणी केली अाहे.
वसुंधराराजे यांचे सरकार शेतकरी कर्जमाफीचे राजकीय श्रेय घेत अाहे. मात्र, अाम्ही शेतकरीप्रश्नी राजकारण करणार नाही. अाम्ही केवळ शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी सरकारवर दबाव अाणण्याचा प्रयत्न करत अाहोत, असे श्री. पायलट यांनी म्हटले अाहे.
शेतकरी अात्महत्याप्रश्नी त्यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केला अाहे. ज्या शेतकऱ्यांना अापले जीवन संपविले; त्यांच्या कुटुंबीयांची मुख्यमंत्री वसुंधराराजे अाणि त्यांच्या कोणत्याही मंत्र्यांने भेट घेतलेली नाही, असा अारोप त्यांनी केला. राज्य सरकार शेतकऱ्यांची फसवणूक करत अाहे, असाही हल्लाबोल त्यांनी केला.
- 1 of 146
- ››