Agriculture News in Marathi, Rajasthan farmer, Unrest, | Agrowon

राजस्थानमधील शेतकरी अांदोलनाच्या पवित्र्यात
वृत्तसंस्था
मंगळवार, 22 ऑगस्ट 2017

आम्ही ३१ ऑगस्टपर्यंतची मुदत दिली आहे. अन्यथा, राज्यव्यापी आंदोलन करण्याशिवाय आमच्याकडे पर्याय नसल्याचे किसान पंचायतचे अध्यक्ष रामपाल जाट यांनी सांगितले.

जयपूर, राजस्थान : स्वामिनाथन अायोगाच्या शिफारशी अाणि शेतकरी अायोग २००४ ची अंमलबजावणी करावी, शेतकरी सुरक्षा कायदा लागू करावा अादी मागण्यांसाठी राज्यस्थानमधील शेतकरी अांदोलनाच्या पवित्र्यात अाहेत.

येत्या ३१ ऑगस्टपर्यंत शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांची पूर्तता राज्य सरकारने न केल्यास राज्यव्यापी आंदोलन करण्याचा इशारा येथील शेतकऱ्यांनी दिला आहे. यासाठी किसान महापंचायतीच्या नेतृत्वात २४ हून अधिक शेतकरी संघटना एकत्र अाल्या अाहेत. याआधी राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्या आश्वासनानंतर शेतकऱ्यांनी १३ ऑगस्टपर्यंत अांदोलन स्थगित केले होते.

शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या दीडपट किंमत मिळावी. तसेच दरवर्षी शेतीमाल खरेदी करण्यासाठी भाव ठरवून द्यावेत अादी मागण्या शेतकऱ्यांनी केल्या अाहेत. त्यासाठी आम्ही ३१ ऑगस्टपर्यंतची मुदत दिली आहे. अन्यथा, राज्यव्यापी आंदोलन करण्याशिवाय आमच्याकडे पर्याय नसल्याचे किसान पंचायतचे अध्यक्ष रामपाल जाट यांनी सांगितले. तसेच या राज्यव्यापी आंदोलनाला राज्यातील २४ हून अधिक शेतकरी संघटनांचा पाठिंबा असल्याचे त्यांनी म्हटले अाहे.

राज्यात १५ ते २१ डिसेंबरदरम्यान टप्प्याटप्प्याने आंदोलन करण्यास राज्यातील शेतकऱ्यांनी अनुकूलता दर्शविली आहे. यामध्ये दूध, भाजीपाला, धान्य आणि इतर शेतीमालाचा पुरवठा थांबविण्यात येणार अाहे. २३ डिसेंबर रोजी राज्यातील ४५ हजार गावांतील प्रतिनिधी आपली एकता दाखविणार असल्याचे रामपाल जाट यांनी सांगितले.

यासाठी जिल्हा, तालुका आणि गाव पातळीवर सप्टेंबरपासून बैठका, जनजागृती आणि रॅली काढण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

इतर ताज्या घडामोडी
किमान तापमानात वाढ, उन्हाळी हंगामास...महाराष्ट्रावर १०१४ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब...
पुणे विभागात हरभऱ्याची ४९ टक्केच पेरणीपुणे : पावसाळ्यात कमी पावसामुळे जमिनीत पुरेशी ओल...
शाळांमधील ४९८ खोल्या धोकादायकपुणे : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने...
मराठवाड्यात रब्बी पिकांची वाढ खुंटलीऔरंगाबाद : पाण्याचा ताण, तापमानातील चढउतार यामुळे...
अमरावतीत तूर, कापसाला मिळेना भावअमरावती : चीनकडून भारतीय सोयाबीनला वाढती...
गुलाब उत्पादकांच्या कष्टाला मिळाले फळ नाशिक : दुष्काळी परिस्थिती, कमी असलेला भाव,...
लोकसभेसाठी माढ्यातून तुल्यबळ उमेदवारकऱ्हाड : लोकसभेसाठी माढा मतदारसंघात भारतीय जनता...
उपोषणासाठी बाजार समित्यांच्या...नाशिक : नियमनमुक्तीमुळे बाजार समित्यांचे...
परभणीतील शेतकऱ्यांचे कोल्हापुरात आंदोलनकोल्हापूर : परभणी जिल्ह्यातील नुकसानग्रस्त...
युवकांच्या सहकारी संस्था स्थापणार :...कऱ्हाड : राज्यातील सहकारी संस्थांचे सभासद हे ६०...
बाजार समित्यांमधील...नाशिक : तेलंगण, तमिळनाडू व कर्नाटकच्या धर्तीवर...
पुलवामातील हल्ल्यात बुलढाणा जिल्ह्याचे...बुलडाणा : पुलवामा येथे झालेल्या अतिरेकी ...
हल्ल्या मागे जे आहेत त्यांना शिक्षा...नवी दिल्ली : जम्मू-काश्‍मीरच्या पुलवामा...
आम्ही विसरणार नाही.. माफही करणार नाही...नवी दिल्ली- जम्मू-काश्‍मीरच्या पुलवामा जिल्ह्यात...
काश्‍मीरमधील शेतकऱ्याला थकबाकीची रक्कम...पुणे : काश्‍मीरमधील शेतकऱ्याला सफरचंदाचे पैसे...
बिबट्याच्या दहशतीखाली चोरट्यांकडून...आंबेठाण, जि. पुणे : शिंदे गाव (ता. खेड) येथे दोन...
‘डिंभे’चे पाणी जोड बोगद्याद्वारे ‘...मुंबई : डिंभे डाव्या तीर कालव्यातील गळती...
विदर्भात आज गारपीट, हलक्या पावसाचा अंदाजपुणे : पोषक हवामानामुळे आज (ता. १४) विदर्भात...
कापसासाठी ‘एमसीएक्‍स’कडून गोदामांची...मुंबई : कापूस उत्पादक शेतकऱ्यांना समृद्ध...
कर्ज देण्याच्या नावाखाली ७३ शेतकऱ्यांची...गोंदिया : कर्ज देण्याच्या नावाखाली ७३...