गुलाबी बोंड अळीचे सामूहिकरीत्या एकीकृत कीड व्यवस्थापन करा

तेल्हारा तालुक्यातील बोंड अळीग्रस्त गावात अळी नियंत्रणासाठी कामगंध सापळे लावताना तज्ज्ञ.
तेल्हारा तालुक्यातील बोंड अळीग्रस्त गावात अळी नियंत्रणासाठी कामगंध सापळे लावताना तज्ज्ञ.

अकोला : जिल्ह्यात तेल्हारा तालुक्यातील दहीगाव, थार, कोठा येथे प्री-मॉन्सून लागवड केलेल्या शेतकऱ्यांच्या कापूस पिकावर फुलोरावस्थेतच गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव दिसून अाला असून, या कीडीचा प्रादुर्भाव इतर भागांत वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. कापूस पिकावरील गुलाबी बोंड अळीचे सामूहीकरीत्या एकीकृत कीडव्यवस्थापन करावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र निकम यांनी केले अाहे. तेल्हारा तालुक्यात गुलाबी बोंड अळी अाढळून अाल्यानंतर कृषी अधिकारी व विद्यापीठाच्या तज्ज्ञांनी पाहणी केली.   यामध्ये दहिगाव, थार व कोटा या तीन गावांमध्ये एकत्रित ३.२० हेक्टर क्षेत्रावर फुले व पाते अवस्थेत असलेल्या पूर्व हंगामी कपाशी पिकावर गुलाबी बोंड अळीचा दोन ते तीन टक्के प्रादुर्भाव दिसून आला. प्रादुर्भाव हा आर्थिक नुकसान पातळीपेक्षा कमी आहे. या गावांमध्ये शेतकऱ्यांच्या सभा घेऊन कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांमार्फत उपाययोजना सुचविण्यात आल्या आहेत.  प्रादुर्भाव आढळलेल्या तीनही शेतकऱ्यांच्या शेतावर कामगंध सापळे बसवण्यात आले आहेत. त्याच्या कार्यपद्धतीविषयी, तसेच प्रादुर्भाव वाढल्यास रासायनिक कीटकनाशकांच्या फवारणी बाबत मार्गदर्शन करण्यात आले. वरील तीन गावांतील तीन शेतकऱ्यांच्या शेतातील वगळता जिल्ह्यात अन्यत्र सध्या प्रादुर्भाव आढळून आलेला नाही.  शेतकऱ्यांनी कापूस पिकाची नियमित निरीक्षण करीत सामूहीकरीत्या उपाययोजना केल्यास प्रादुर्भाव रोखता येईल. यासाठी शेतकऱ्यांनी कापूस पिकाचे नियमित निरीक्षण ठेवावे, पिकामध्ये एकरी किमान दोन कामगंध सापळे व व्यवस्थापनासाठी एकरी आठ कामगंध सापळे लावावेत. या सापळ्यांमध्ये अडकलेले नर पतंग वेळोवेळी काढून कीटकनाशक मिश्रित पाण्यात टाकून नष्ट करावेत. कापूस पिकात अाढळलेल्या डोमकळ्यात प्रादुर्भावग्रस्त पात्या, फुले व बोंडे हाताने ताेडून त्यातील अळी नष्ट करावी. पिकावर पाच टक्के निंबोळी अर्काची फवारणी तातडीने प्रतिबंधक उपाययोजना म्हणून फवारावी,  बोंड अळीच्या व्यवस्थापनासाठी ट्रायकोग्रामा हेक्टरी एक ते दीड लाख अंडी शेतामध्ये लावावीत. कीडीने नुकसानीची पातळी अोलांडल्यास  क्विनॉलफॉस २०  मिली, किंवा थायोडीकार्ब (७५ टक्के डब्ल्यूपी) २० ग्रॅम प्रती १० लिटर पाण्यामध्ये मिसळून नॅपसॅक पंपानेे फवारणी करावी, असेही श्री. निकम यांनी सांगितले       अाहे.    

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com