महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाच्या अध्यक्षपदी राजेंद्र पवार

द्राक्ष शेतीसमोरील प्रश्‍न अभ्यासपूर्ण पद्धतीने सोडविण्याची भूमिका राज्य द्राक्ष बागायतदार संघाने नेहमीच घेतली आहे. बदलत्या काळात शेतीसमोर नवी आव्हाने उभी राहिली आहेत. त्यासाठी जागतिक तंत्रज्ञानाशी जोडून अधिकाधिक काम करावे लागणार आहे. येत्या काळात संघाच्या माध्यमातून शेतकऱ्यांची एकत्रित ताकद वाढविण्याबरोबरच प्रगत राष्ट्रातील आधुनिक तंत्रज्ञान जास्तीत जास्त प्रमाणात आपल्याकडे आणण्यावर आमचा भर राहणार आहे. -राजेंद्र पवार, नवनिर्वाचित अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ, पुणे
राजेंद्र पवार
राजेंद्र पवार

पुणे  : महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाच्या अध्यक्षपदी राजेंद्र पवार, उपाध्यक्षपदी शिवाजी पवार व खजिनदारपदी कैलास भोसले यांची बिनविरोध निवड झाली आहे. संघाच्या पुणे येथे नुकत्याच झालेल्या वार्षिक अधिवेशनात नूतन कार्यकारिणीची निवड झाली. मागील कार्यकारिणीचा कालावधी संपल्यानंतर ही निवड करण्यात आली.

द्राक्ष शेती व बागायतदार संघात अनेक वर्षांपासून कार्यरत असलेले राजेंद्र पवार यांची राज्य कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी निवड झाली. कार्यकारिणीचे संचालक म्हणून अरविंद कांचन, प्रताप काटे, विनायक दंडवते, दत्तात्रय ठिकेकर, विनायक पाटील, चंद्रशेखर पाटील, शिवलिंग संख, किशोर बाबर, हणमंत चव्हाण, दीपक पाटील, राजगोंडा पाटील, सुरेश एकुंडे, दत्तकुमार साखरे, चनगोंडा हविनाळे, शिवानंद माळी, राजेंद्र देशमुख, राजकुमार शेळके, प्रशांत देशमुख, शंकर येणगुरे, माणिकराव पाटील, राजेंद्र सोनवणे, भाऊसाहेब भालेराव, श्‍याम शिरसाठ, रवींद्र निमसे, यतीन कदम, बाळासाहेब गडाख, मधुकर क्षीरसागर यांची निवड झाली.

याशिवाय पुणे विभागाच्या अध्यक्षपदी रामभाऊ धावणे, नाशिक विभागाच्या अध्यक्षपदी रवींद्र बोराडे, सांगली विभागाच्या अध्यक्षपदी चंद्रकांत लांडगे, सोलापूर विभागाच्या अध्यक्षपदी आशिष काळे यांची निवड झाली. या वेळी संघाचे माजी अध्यक्ष सुभाष आर्वे, अशोक गायकवाड, ऑल इंडिया ग्रेप फार्मर्स फेडरेशनचे अध्यक्ष सोपान कांचन, ऑल इंडिया ग्रेप एक्‍स्पोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष जगन्नाथ खापरे आदी उपस्थित होते.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com