राष्ट्रमाता जिजाऊसाहेब यांना लाखोंची मानवंदना

राष्ट्रमाता जिजाऊसाहेब यांना लाखोंची मानवंदना
राष्ट्रमाता जिजाऊसाहेब यांना लाखोंची मानवंदना

सिंदखेडराजा, जि. बुलडाणा : राष्ट्रमाता जिजाऊसाहेब जयंतीनिमित्त मातृतीर्थ सिंदखेडराजा येथे शुक्रवारी (ता.१२) लाखोंचा जनसमुदाय उसळला होता. सूर्योदयी जिल्हा व नगर प्रशासनातर्फे जिजाऊ जन्मस्थळी पहाटे लखुजीराजे जाधव यांच्या राजवाड्यात ही महापूजा करण्यात आली.

नगर प्रशासनातर्फे नगराध्यक्ष; तसेच जिल्हा प्रशासन यांच्या वतीने जिल्हा परिषद अध्यक्ष उमाताई तायडे यांनी महापूजा केली. त्यानंतर राज्यसह देशाच्या कानाकोपऱ्यांतून आलेल्या जिजाऊभक्तांनी अभिवादन केले. राजवाडा परिसऱ, तसेच जिजाऊसृष्टी परिसरात असलेल्या पुतळ्याला अभिवादन करताना जिजाऊ यांच्या नामघोषणांनी परिसर दुमदुमत होता. जयंतीदिनी अभिवादन करण्यासाठी विविध मान्यवरांनी हजेरी लावली होती. जिजाऊसृष्टी परिसरात दिवसभर प्रबोधन कार्यक्रम झाले.

पुस्तकांची प्रचंड विक्री  सोहळ्यासाठी येणारा प्रत्येक जण या ठिकाणी असलेल्या प्रदर्शनस्थळी जिजाऊ, शिवाजी महाराज, संभाजी महाराज, तसेच सामाजिक प्रबोधन करणारी पुस्तके खरेदी करीत होते. या ठिकाणी लाखोंची उलाढाल झाली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com