सिंदखेडराजा येथे उद्या जिजाऊ जन्मोत्सव सोहळा

सिंदखेडराजा येथे उद्या जिजाऊ जन्मोत्सव सोहळा
सिंदखेडराजा येथे उद्या जिजाऊ जन्मोत्सव सोहळा

बुलडाणा : मातृतीर्थ सिंदखेडराजा येथे शुक्रवारी (ता. 12) राष्ट्रमाता मॉं जिजाऊ जन्मोत्सवाचा सोहळा होणार असून, याची तयारी अंतिम टप्प्यात पोचली आहे. या वर्षी जिजाऊ जन्मोत्सव सोहळ्याला साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले, छत्रपती इंजिनिअर बाबाजीराजे भोसले (तंजावर, तामिळनाडू) आणि कोल्हापूरचे खासदार छत्रपती युवराज संभाजीराजे भोसले उपस्थित राहणार आहेत.

जिजाऊ जन्मोत्सवाच्या सोहळ्यासाठी सिंदखेडराजा येथील जन्मस्थळी विविध कार्यक्रम होणार आहेत. शुक्रवारी सूर्योदयी राजवाड्यावर महापूजा केली जाईल. या वेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा उमाताई तायडे यांच्या हस्ते व आमदार शशिकांत खेडेकर यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण केले जाईल.

जिजाऊ सृष्टीवर कार्यक्रम सिंदखेडराजा येथे मराठा सेवा संघातर्फे 1994 पासून या सोहळ्याचे आयोजन केले जात आहे. सिंदखेडराजा शहरातील जिजाऊ सृष्टीवर लाखो जिजाऊ भक्तांच्या उपस्थितीत या वर्षीचा सोहळा होणार आहे. सिंदखेड राजा येथे 3 जानेवारीपासून जिजाऊ सृष्टीवर सावित्री-जिजाऊ दशरात्रोत्सव सुरू आहे. शुक्रवारी (ता. 12) दशरात्रोत्सवाचा समारोप होईल. गुरुवारी (ता. 11) जन्मोत्सवाच्या पूर्वसंध्येला सायंकाळी लखुजीराजे जाधव यांच्या राजवाड्यावर दीपोत्सव होणार आहे. राजवाडा परिसरात दीप लावले जाणार आहेत. 420 मशालींचा समावेश असलेली मशाल यात्रासुद्धा काढली जाईल. 12 जानेवारीला दुपारी 3 ते 6 या कालावधीमध्ये जिजाऊ सृष्टीवरील शिवधर्म पीठावर मुख्य कार्यक्रम होईल.

कार्यक्रमास छत्रपती उदयनराजे भोसले, छत्रपती इंजिनिअर बाबाजीराजे भोसले आणि छत्रपती युवराज संभाजीराजे भोसले यांच्यासह नाना पटोले, छत्रपती फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष स्वप्नील खेडेकर (न्यूयॉर्क), मराठा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष इंजिनिअर विजय घोगरे, महासचिव इंजिनिअर मधुकर मेहकरे यांची उपस्थिती राहील. सायंकाळी या कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष ऍड. पुरुषोत्तम खेडेकर यांचे समारोपीय भाषण होईल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com