मदतीअभावी राज्यातील सूतगिरण्यांना घरघर : शिवदारे

सुतगिरणी
सुतगिरणी

सोलापूर ः कापसाचे वाढलेले दर, सरकारचे कुचकामी धोरणामुळे सूतगिरण्यांना घरघर लागली आहे, असा आरोप महाराष्ट्र राज्य स्पिनिंग मिल फेडरेशन मुंबईचे संचालक आणि सोलापूरच्या वळसंग येथील स्वामी समर्थ सूतगिरणीचे चेअरमन राजशेखर शिवदारे यांनी येथे पत्रकारांशी बोलताना केला.  राज्यातील सहकारी सूतगिरण्यांसमोरील अडचणींबाबत तसेच सद्यस्थितीबाबतची माहिती त्यांनी पत्रकारांना दिली. श्री. शिवदारे म्हणाले, की सरकारचे ध्येयधोरण गेल्या तीन-चार वर्षांपासून सहकाराला मारक ठरत आहे. अनंत अडचणी असूनही केवळ ७०० कामगारांच्या हितासाठी आपण आपली स्वामी समर्थ सूतगिरणी चालू ठेवली आहे.       जागतिक मंदी, कापसाचे वाढलेले भरमसाठ दर, सुताच्या भावात न झालेली वाढ, सुतास नसलेला उठाव तसेच इतर राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रात ३ रुपयाने जास्त असलेला वीजदर या प्रमुख कारणांमुळे राज्यातील गिरण्यांना प्रति किलो २० ते २५ रुपये नुकसान होत असल्यामुळे २५ हजार चात्याच्या एका सूतगिरणीस प्रतिमहा अंदाजे ५० ते ६० लाखांचे नुकसान होत आहे.  या दररोजच्या तोट्यामुळे राज्यातील सहकारी सूतगिरण्यांचे स्वभांडवल कमी होऊन मागील दोन वर्षांपासून गिरण्या अडचणीतून मार्गक्रमण असल्याचेही शिवदारे यांनी सांगितले. राज्य सरकारला विविध स्वरूपात वार्षिक २५० ते ३०० कोटींचा महसूल मिळतो. या सूतगिरण्या बंद झाल्या तर कामगार बेकार होऊन त्याचे व त्याच्या कुटुंबावर उपासमारीची पाळी येणार आहे. या समस्येबाबत सकारात्मक भूमिका घेऊन आर्थिक मदत करण्याबाबत शासनाकडे सहकारी सूतगिरण्यांच्या शिखर संस्थेमार्फत निवेदन देऊन पाठपुरावा करण्यात येत होता. परंतु शासनाने प्रतिसाद दिला नाही, सहकार व पणनमंत्रीही त्यासाठी सक्षमपणे काम करत नसल्यामुळे ही स्थिती उद्‌भवत आहे, असाही आरोप त्यांनी केला. शिवदारे यांचे मुद्दे 

  • सरकारचा सूतगिरण्यांच्या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद नाही
  • सरकारने कमी व्याजदरात भागभांडवल उपलब्ध करून द्यावे 
  • वीजदर कमी करावा अन्यथा गिरण्या बंद करण्याची परवानगी द्यावी. राज्य शासनाची सुमारे २ हजार कोटींची गुंतवणूक, पण ती वाया जाण्याची भीती.
  • सूतगिरणी उद्योगात वार्षिक उलाढाल २५०० कोटी आहे, याकडे गांभीर्याने लक्ष हवे
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com