माेदी सरकारसाठी पाकपेक्षाही शेतकरी माेठा शत्रू : राजू शेट्टी
ज्ञानेश उगले
शुक्रवार, 29 सप्टेंबर 2017

शेतकरी सन्मान योजना नसून ही शेतकरी अपमान योजना असल्याचे वक्तव्य त्यांनी केले. मोदींनी अच्छे दिनचे खोटे आश्वासन देत तीन वर्षांपूर्वी फुललेले कमळ आता चुरगाळून टाकण्याची वेळ आली आहे. 
- राजू शेट्टी, खासदार

 

निफाड, जि. नाशिक : पाकिस्तानात आज टोमॅटो तीनशे रुपयांवर पोचला आहे. अशा परिस्थितीत भारताकडून टोमॅटो आयात करायचे नाही, असा निर्णय त्यांनी घेतला आहे. मात्र, कांद्याचे भाव घसरले की भाजप सरकार पाकिस्तानातून कांदा मागवून शेतकऱ्यांचे भाव पाडते. यावरून पाकिस्तानपेक्षा माेठा शत्रू शेतकरी असल्याची भावना मोदी सरकारची असल्याची टीका खासदार राजू शेट्टी यांनी केली. त्यामुळे संघर्ष करण्याची वेळ आल्याचे आवाहन त्यांनी शेतकऱ्यांना केले. 

निफाडमधील कोठुरे येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे हल्लाबोल सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खासदार राजू शेट्टी बोलत होते. व्यासपीठावर प्रदेशाध्यक्ष डॉ. प्रकाश पोपळे, युवा प्रदेशाध्यक्ष हंसराज वडघुले, जिल्हाध्यक्ष गोविंद पगार, रविकांत तुपकर यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

खासदार शेट्टी म्हणाले, की कर्जमाफीचे किचकट अर्ज शेतकऱ्यांच्या माथी मारून सरकारने शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण केला. शेतकरी सन्मान योजना नसून ही शेतकरी अपमान योजना असल्याचे वक्तव्य त्यांनी केले. मोदींनी अच्छे दिनचे खोटे आश्वासन देत तीन वर्षांपूर्वी फुललेले कमळ आता चुरगाळून टाकण्याची वेळ आली आहे. 

निफाड कारखाना शेतकऱ्यांच्या ताब्यात द्या. आर्थिक मदत करा. पुन्हा हा कारखाना पुनर्जन्म घेईल. ‘मन की बात’मधून मोदी उत्पादन वाढवायला सांगतात. दुसरीकडे शेतीमाल आयात करतात. हा मोदी सरकारचा खोटारडेपणा शेतकऱ्यांसमोर आलाय. मोदींना हलविण्याची ताकद फक्त शेतकऱ्यांमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी हंसराज वडघुले, गोविंद पगार, रविकांत तुपकर यांनीही सरकारवर कडाडून टीका केली. 

नगरसूलचे शेतकरी कृष्णा डोंगरे यांनी कांद्याला भाव नसल्यामुळे पाच एकर कांदे जाळले होते. त्यानंतरही कुठलीही सुधारणा झालेली नव्हती. त्यांनी गौण खनिज चोरी करण्याची परवानगी मागितली होती. अशा परिस्थितीत भाव नसल्याने वैतागलेल्या शेतकऱ्याने या सभेत अर्धनग्न होत सरकारच्या विरोधात फलकबाजी करत आपला निषेध नोंदवला.

इतर अॅग्रो विशेष
खुल्या शेतीतील गुलाब लागवड तंत्रज्ञान गुलाबाच्या फुलांचा उपयोग...
ज्ञानाचा प्रकाशदिवाळी... प्रकाशाचा, उत्साहाचा सण! सारी दुखं...
साडेआठ लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ४...मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
जिभाऊ... बापू तुमले दिवाईन्या सुभेच्छा...जळगाव ः जिभाऊ... बापू तुमले दिवाईन्या सुभेच्छा...
पोषक तत्त्वांनीयुक्त खजूर, अक्रोड, काजूपोषक तत्त्वे आणि आरोग्याच्या दृष्टीने अक्रोड अाणि...
रब्बी हंगामासाठी कांदा जाती अन्‌...महाराष्ट्रात रब्बी कांदा पिकाचे क्षेत्र मोठ्या...
बाजरी चारा पीक लगवड तंत्रज्ञान बाजरी हे पीक पालेदार, रसाळ, गोड व मऊ असते....
जळगाव जिल्ह्यात दादर ज्वारी तरारली जळगाव  ः खानदेशात यंदा परतीच्या पावसामुळे...
कांद्यावर डिसेंबरपर्यंत 'स्टॉक लिमिट'नवी दिल्ली : नफेखोरपणा, साठेबाजी, वाढते दर आणि...
सांगली जिल्ह्यात भाजपच्या वारुला ब्रेकसांगली ः लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत...
कर्जमाफी योजनेस प्रारंभ...राज्य सरकारची...मुंबई : कर्जमाफी देण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या...
वाढत्या लोकसंख्येसाठी व्हर्टिकल फार्म...भारतासारख्या उच्च लोकसंख्या असलेल्या देशांसाठी...
निशिगंध लागवड तंत्रज्ञान निशिगंधाची फुले अत्यंत सुवासिक व आकर्षक असतात....
बरसीम पीक लागवड बरसीम हे मेथीघासाप्रमाणे बहुगुणी वैरणीचे पीक आहे...
‘जीवनसंगिनी’ची प्रकाशवाटनैसर्गिक आपत्तींचा कहर आणि अनिश्चित बाजार अशा...
बीजी ३ च्या विनापरवाना विक्रीवर...मुंबई : तणनाशक सहनशील (हर्बिसाईड टाॅलरंट)...
रब्बी पिकांचे पाणी व्यवस्थापन महत्त्वाचेरब्बी हंगामामध्ये घेतल्या जाणाऱ्या पिकांसाठी...
राज्यात कापूस खरेदी २५ पासूननागपूर : राज्यात बुधवार (ता. २५) पासून पणन...
नेताओं की दिवाली, किसानों का दिवालादोन दिवसांपूर्वी मला अमरावती जिल्ह्यातील शेतकरी...
ऊसावरील कीडींचे एकात्मिक व्यवस्थापन तपशील : पूर्व मशागत     कीड...