agriculture news in marathi, Raju Shetti criticize state government on loan waiver scheme | Agrowon

सरकारच्या कर्जमाफीचे लाभार्थीच सापडत नाहीत : राजू शेट्टी
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 1 फेब्रुवारी 2018

मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी राज्य सरकारने कर्जमाफीची घोषणा केली. मात्र या घोषणेचे लाभार्थीच सापडत नसल्याचे सांगत राज्य सरकारने कर्ममाफीच्या लाभार्थ्यांची यादी जाहीर करावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी राज्य सरकारकडे केली. 

मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी राज्य सरकारने कर्जमाफीची घोषणा केली. मात्र या घोषणेचे लाभार्थीच सापडत नसल्याचे सांगत राज्य सरकारने कर्ममाफीच्या लाभार्थ्यांची यादी जाहीर करावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी राज्य सरकारकडे केली. 

मंत्रालयात आलेल्या खासदार राजू शेट्टी यांनी पत्रकारांशी बोलताना ही मागणी केली. आघाडी सरकारच्या काळात जसा कर्जमाफीच्या योजनेत घोळ झाला. त्या पद्धतीने भाजप सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीत घोळ झाले असण्याची शक्यता आहे. त्यामुळेच एकाबाजूला राज्य सरकार अमुक लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ झाल्याचे सांगते. मात्र प्रत्यक्षात कोणाला लाभ झाला याची माहिती घ्यायला गेले तर लाभार्थीच सापडत नाही. हे मी राजकीय हेतूने नाही, तर वस्तुस्थिती असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.

याशिवाय शेतकऱ्यांच्या खात्यातही खरेच पैसे जमा झालेत का, याचीही माहिती तपासून पाहायला हवी, असे मतही त्यांनी या वेळी व्यक्त केले. या वेळी दोंडाईचा येथील सोलर प्रकल्पासाठी पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी केलेली जमीन खरेदी चुकीची असल्याचे सांगत एकदा नोटिफायड झालेल्या जमिनीची खरेदी–विक्री तर सोडाच खातेफोडही करता येऊ शकत नाही, असे स्पष्ट केले. तसेच रावल यांना यात किती लाभ मिळाला याची चौकशीही होण्याची गरज त्यांनी या वेळी व्यक्त केली.

दरम्यान, खासदार शेट्टी यांनी शेतकरी धर्मा पाटील यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. या मागणीचे निवेदन त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिले. 

आमदार अनिल गोटे यांचा घरचा आहेर...
शेतकरी धर्मा पाटील यांच्या मृत्यूनंतरही भाजपचे आमदार अनिल गोटे यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारला घरचा आहेर दिला आहे. दोंडाईचा प्रकल्पासाठी भूमाफियांनी कशारीतीने भूसंपादन केले आणि त्यांना कसा राजकीय आश्रय मिळाला याअनुषंगाने त्यांनी एक सविस्तर पत्र मुख्यमंत्री फडणवीस यांनी पाठविले आहे. त्यामुळे या प्रकल्पाच्या भूसंपादनावरून पुन्हा एकदा चर्चांचा बाजार गरम झाला आहे.

इतर ताज्या घडामोडी
शेतकऱ्याने तयार केली डिझेलवरची बाईकसांगली : वाढत्या पेट्रोलच्या सुटकेसाठी...
शेतकऱ्यांना फसविणारे विक्रेते,...सोलापूर : शेतकरी केंद्रबिंदू मानून...
धुळे जिल्ह्यात पूर्वहंगामी कापूस...धुळे : जिल्ह्यात पूर्वहंगामी कापूस लागवडीची...
जळगाव जिल्ह्यात खरिपासाठी मुबलक खतेजळगाव : जिल्ह्यात आगामी खरिपासाठी शेतकऱ्यांची...
सोलापुरात गाजर, काकडीचे दर वधारले,...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
कारखान्यांनी थकीत `एफआरपी' त्वरीत...सोलापूर : जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी थकवलेले...
हमीभाव खरेदी बंद होताच तुरीचे दर झाले...नागपूर ः शासनाची हमीभाव खरेदी बंद होताच तुरीचे दर...
नगरला गव्हाला १६४१ ते १८५० रुपये...नगर : नगर बाजार समितीत गव्हाची आवक बऱ्यापैकी होत...
नाशिकला आंबा, खरबूज, कलिंगड तेजीतनाशिक : वाढत्या उन्हाबरोबरच नाशिक बाजार समितीत...
कासवाच्या लिंगनिर्धारणामागील जनुकीय...गेल्या ५० वर्षांपासून अंडी उबण्याच्या...
सातारा जिल्ह्यात पाणीटंचाई वाढलीसातारा  : जिल्ह्यात पाणीटंचाईच्या झळा वाढू...
अग्रणी नदी पुन्हा अतिक्रमणाच्या विळख्यातसांगली : तासगाव, कवठेमहांकाळ तालुक्‍यांतील अग्रणी...
पुण्यातील डाळिंब, पेरू, चिकू बागांना...पुणे  : जिल्ह्यातील मृग बहारातील डाळिंब,...
इंदापुरातील नीराकाठची पिके जळण्याच्या...वालचंदनगर, जि. पुणे  ः इंदापूर तालुक्‍यातील...
नगर जिल्ह्यात ‘कृषी’च्या कामांवरच ‘...नगर  ः जलयुक्त शिवार अभियानाची कामे...
विषबाधा बळीप्रकरणी पावणेदोन कोटींची मदतअकोला : कीटकनाशक फवारणी करताना विषबाधा होऊन मृत...
हिंगोलीतील १०३ गावांची ‘जलयुक्त शिवार’...हिंगोली : जलयुक्त शिवार अभियानाच्या चौथ्या...
विधान परिषदेच्या ६ जागांसाठी उत्साहात...मुंबई ः स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधान...
सैन्य दलात अधिकारी होण्याची संधीमुंबई : भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलात...
कर्नाटक: कामगारांच्या पत्राशेडमध्ये...विजयपूर : नुकतेच कर्नाटकात विधानसभेची निवडणुका...