‘दुधाला हमीभाव म्हणजे बोलाचाच भात, बोलाचीच कढी’

‘दुधाला हमीभाव म्हणजे बोलाचाच भात, बोलाचीच कढी’
‘दुधाला हमीभाव म्हणजे बोलाचाच भात, बोलाचीच कढी’

औरंगाबाद : मुख्यमंत्र्यांनी दूध हमीभाव कायदा केल्याचे जाहीर केले. मात्र कमी दराने खरेदी करणाऱ्या एकाही दूध संघ, संस्थांवर कारवाई करण्याचे धारिष्ट्य दाखवले नाही. मुख्यमंत्री फडवणीस यांची ही भूमिका म्हणजे बोलाचाच भात अन बोलाचीच कढी असल्याची टीका खासदार राजू शेट्टी यांनी शुक्रवारी (ता. ४) औरंगाबादेत आयोजित पत्रकार परिषदेत केली.

कोणत्याही आंदोलनात स्वाभिमानाने पुढाकार घेतला, की स्वाभिमानी हायजॅक करते असा आरोप केला जातो. त्यामुळे राज्यभर सुरू असलेले दूध उत्पादकांच्या आंदोलनाचे सध्या बारकाईने निरीक्षण करत असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यात दुधाला समान भाव देण्याची घोषणा हवेतच विरल्याचेही खासदार शेट्टी म्हणाले. राज्याच्या कृषिमंत्र्यांची शेतीविषयक भूमिका विचारल्यानंतर राज्यात कृषी खातेच आहे की नाही माहीत नाही असे शेट्टी म्हणाले. या वेळी जय किसान आंदोलनाचे अविट शहा, वि. एम. सिंग यांच्यासह कार्यकर्ते पदाधिकारी यांची उपस्थिती होती.

शेतीप्रश्नावर होणार विशेष सभा शेतीप्रश्नावर लोकसभेत विशेष सभा बोलविणार असून, दरम्यान दोन विधेयके मांडणार असल्याचे शेट्टी म्हणाले. त्यामध्ये स्वामिनाथन आयोग व संपूर्ण कर्जमुक्ती याचा प्रामुख्याने समावेश असणार आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com