agriculture news in marathi, Raju Shetty criticizes Central government on farmers issue | Agrowon

शेतमालाला भाव न देणारे उत्पन्न दुप्पट कसे करतील?
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 24 मे 2018

भंडारा : शेतमालाला भाव नसल्याने अधिक उत्पादकतेनंतरही शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढले नाही. दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या थापा मारीत आहेत, अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटेनेचे नेते व खासदार राजू शेट्टी यांनी केले.

भंडारा : शेतमालाला भाव नसल्याने अधिक उत्पादकतेनंतरही शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढले नाही. दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या थापा मारीत आहेत, अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटेनेचे नेते व खासदार राजू शेट्टी यांनी केले.

साकोली येथील होमगार्ड परेड ग्राउंडवर शेतकरी संघटनेच्या एल्गार सभेत ते बोलत होते. व्यासपीठावर शेतकरी संघटनेचे नेते चंद्रकांत वानखडे, गजानन अमदाबादकर, उत्तम पोपळे, प्रशांत पवार, ॲड. जांभुळे, सुशीला मोराडे, माजी आमदार सेवक वाघाये, सदाशिव वलथरे, अविनाश ब्राह्मणकर, मदन रामटेके, जिल्हा परिषद सदस्य होमराज कापगते, अशोक कापगते, प्रभाकर सपाटे, प्रदीप मासूरकर, देवानंद पवार, विनोद पटोले उपस्थित होते.

या वेळी खासदार शेट्टी म्हणाले, की मोदींनी ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखवीत सत्तेवर आले आणि आता शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांची पिळवणूक करीत आहेत. नोटबंदी करून लोकांना रांगेत उभे केले. विदेशातील काळा पैसा आणण्याचे सां.िगतले; ते न करता उलट भारतातील पैसा पळविणाऱ्यांवरदेखील काहीच कारवाई केली नाही. नीरव मोदी व विजय माल्ल्यासारखे कर्जबुडवे हे त्याचे आदर्श उदाहरण आहे. पाकिस्तातून मागील वर्षी कांदा आणि या वर्षी साखर आयात केली. हे भारतीय शेतकरी संपविण्याचे कारस्थान असल्याचा आरोपही खासदार शेट्टी यांनी केला. जिल्हा परिषद सदस्य अशोक कापगते यांनी सूत्रसंचालन केले. शेतकरी संघटनेचे अंतराम खोटेले यांनी आभार मानले. 

इतर ताज्या घडामोडी
अवर्षणाचा पिकावरील ताण कमी करण्यासाठी...कोरडवाहू शेतीत पीक उत्पादनाच्या दृष्टीने “ओल तसे...
कोल्हापुरात केळी लागवड कमी होण्याची शक्...कोल्हापूर : पुरेशा पाण्याअभावी जिल्ह्यात केळीच्या...
नगरमधील आठ तालुके अद्यापही रब्बी...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये रब्बीची आतापर्यंत अवघी नऊ...
जनावरांच्या आहारातील क्षारमिश्रणाचे...जनावरांच्या हाडांच्या वाढीसाठी दूध उत्पादनासाठी,...
परभणी जिल्ह्यात हुमणीच्या नुकसानीचा कहरपरभणी ः परभणी जिल्ह्यात उद्‍भवलेल्या दुष्काळी...
बाजार समिती कर्मचारी शासन आस्थापनावर...पुणे  ः राज्यातील बाजार समित्यांमधील...
पुणे विभागात चारापिकांची एक लाख...पुणे   ः जनावरांसाठी चाऱ्याची अडचण येऊ नये...
साताऱ्यात उसावर ‘हुमणी’चा प्रादुर्भावसातारा  ः जिल्ह्यातील विविध पिकांवर ‘हुमणी’...
नगर जिल्ह्यात ३५ हजार हेक्‍टरवरील उसावर...नगर  ः नगर जिल्ह्यात यंदा उसावर ‘हुमणी’चा...
‘पंदेकृवि’तील शिवारफेरीला शेतकऱ्यांचा...अकोला  ः डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी...
महसूल राज्यमंत्र्यांनी घेतला महागावमधील...महागाव, जि. यवतमाळ  ः दुष्काळग्रस्त भागात...
महाराष्ट्रातील जनताच पंतप्रधान मोदी...शिर्डी, जि. नगर   ः घरकुलाचा लाभ देण्यासाठी...
सरकारने कर्जमाफीत घोटाळा केला : उध्दव...नगर  ः राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी...
पुण्यात भाजीपाल्याच्या मागणीत वाढ; दरही...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
नाशिक जिल्ह्यात सर्वपक्षीय पाणी बचाव...नाशिक  : मराठवाड्यातील जायकवाडी धरणात नाशिक...
इंदापूर बाजार समितीत शेतीमाल तारण योजना...इंदापूर, जि. पुणे  ः महाराष्ट्र राज्य कृषी...
नगर जिल्ह्यात एप्रिलपासून चाराटंचाई...नगर  ः जिल्ह्यात यंदा पाऊस नसल्याचे...
शेतीतील सुधारणांसाठी कृषी विद्यापीठांची...अकोला   ः बदललेल्या परिस्थितीत शेतीतही मोठी...
नगर जिल्हा परिषदेत सरकार विरोधात...नगर  ः जिल्हा परिषदेच्या मालकीच्या...
शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत ‘राष्ट्रवादी...अकोला  ः तूर, सोयाबीन, हरभरा या पिकांचा विमा...