agriculture news in marathi, Raju Shetty criticizes govt on milk issue | Agrowon

अब आया उंट पहाड के निछे; राजू शेट्टींचा महसूलमंत्र्यांवर हल्लाबोल 
तात्या लांडगे : सकाळ वृत्तसेवा 
मंगळवार, 17 जुलै 2018

सोलापूर : शेतकऱ्यांच्या दूध दराच्या प्रश्‍नावर सरकारने तोडगा काढण्याऐवजी आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला. परंतु, शेतकऱ्यांची ताकद या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला समजली. मुंबई काय पाकिस्तानमध्ये आहे काय, असे म्हणणारेच आता दूध दराबाबत तोडगा काढण्याची भाषा करत असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी सकाळशी बोलताना सांगितले. 'अब आया उंट पहाड के निछे,' असे म्हणत त्यांनी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर टिका केली. 

सोलापूर : शेतकऱ्यांच्या दूध दराच्या प्रश्‍नावर सरकारने तोडगा काढण्याऐवजी आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला. परंतु, शेतकऱ्यांची ताकद या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला समजली. मुंबई काय पाकिस्तानमध्ये आहे काय, असे म्हणणारेच आता दूध दराबाबत तोडगा काढण्याची भाषा करत असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी सकाळशी बोलताना सांगितले. 'अब आया उंट पहाड के निछे,' असे म्हणत त्यांनी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर टिका केली. 

मुंबईला तीन दिवस पुरेल इतका दूधसाठा केल्याचे सांगणारे दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांना आता कशी दुधाची टंचाई भासू लागली. साठा केलेले दहा लाख लीटर दूध कोण प्याले, शेतकऱ्यांची ताकद समजली का, शेतकरी त्यांच्या हक्‍कासाठी रस्त्यावर उतरला की काय होते, याची जाणीव झाली ना, असे सवाल खासदार शेट्टी यांनी मंत्री जानकर यांना केले. खासगी दूध संघांवर नियंत्रण नसल्याने ते शेतकऱ्यांना प्रतिलीटर 15 ते 21 रुपये दर देतात तर सहकारी संघांना शासनाने आदेश देऊनही 17 रुपये दर दिला जातोय. दूध भुकटीसाठी लिटरला तीन रुपये व निर्यातीसाठी पुन्हा 50 रुपयांचे अनुदान दिले जाते. त्यापेक्षा एक किलो भुकटीसाठी सरकारने 75 ते 80 रुपयांचे अनुदान द्यावे, जेणेकरुन खासगी अथवा सहकारी दूध संघ शेतकऱ्यांना प्रतिलीटर किमान 25 रुपये दर देतील. याशिवाय सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रतिलीटर पाच रुपयांचे अनुदान जमा करण्याचा निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन मागे घेणार नसल्याचा पुनरुच्चार खासदार शेट्टी यांनी यावेळी केला. 

मागील कित्येक वर्षांपासून खासगी व सहकारी दूध संघचालक राज्यातील शेतकऱ्यांना लुटत आहेत. सरकारला त्याची माहिती असूनही नुसती नोटीस देण्यापलिकडे त्यांनी काहीच केले नाही. त्यामुळे कलई शेतकऱ्यांची आणि मलई मात्र संघचालक खात आहेत, अशी स्थिती निर्माण झाल्याचे खासदार राजू शेट्टी यांनी सकाळ शी बोलताना सांगितले.

इतर बातम्या
'पुलवामा'चा सूत्रधार काश्‍मीरमध्येच?नवी दिल्ली : पुलवामामधील दहशतवादी हल्ल्याचा...
आदिवासींचं श्रद्धास्थान असलेल्या कचारगड...कचारगड, जि. गोंदिया : मध्य भारतातील सर्व आदिवासी...
केम प्रकल्पाला लागली भ्रष्टाचाराची वाळवीअमरावती : अंमलबजावणीपेक्षा गैरव्यवहार व...
मराठवाड्यात दीड महिन्यात ७७...औरंगाबाद : मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्यांचे सत्र...
‘पेंच’ लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना १३...नागपूर : मध्य प्रदेशातील चौराई प्रकल्पामुळे पेंच...
‘एसटी’साठी जागा आठ हजार अन्‌ अर्ज ४१...सोलापूर : राज्य परिवहन महामंडळात चालक व...
दररोजचा दोनशे टन द्राक्षपुरवठा ठप्पपिंपळगाव बसवंत, जि. नाशिक : जम्मू-काश्‍...
'देशात आयात होणाऱ्या सोयाबीनवर बंदी...पुणे : देशांतर्गत दर वाढत असल्याने...
बांबू उत्पादन, गुंतवणूक संधीसाठी...मुंबई : देशातील बांबू लागवडीला चालना देण्याबरोबरच...
चार वर्षांत संत्रा उत्पादकांची दखलच...नागपूर : कोट्यवधी रुपयांची उलाढाल असलेल्या आणि...
व्यवस्थेनेच शेतकऱ्यांना ओरबडले : राजू...कोल्हापूर ः ‘देशात अनेक राजवटी आल्या; पण या...
सांगली जिल्ह्यातील सहा कारखाने...सांगली  ः सहा कारखान्यांनी एकरकमी एफआरपी...
चारा छावण्या सुरू न केल्यास आंदोलन :...नगर : दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन राज्य सरकाने...
साखरेच्या टेंडरना प्रतिसाद नाही; दर...कोल्हापूर : साखरेच्या विक्री मूल्यात...
कांदा अनुदानाचे ११४ कोटी ‘पणन’ला वर्गसोलापूर : राज्यातील एक लाख ६० हजार शेतकऱ्यांसाठी...
देशातील हळद उत्पादनात वाढीची शक्यतासांगली ः यंदा देशातील महाराष्ट्र वगळता हळद...
आंबा मोहर सल्ल्यासाठी तज्ज्ञ बांधावर जालना : हवामानाचा बदलता अंदाज पाहता फळ संशोधन...
मापाडींच्या प्रश्नांबाबत सरकार...सोलापूर  : राज्यातील बाजार समित्यातील हमाल-...
तीन वर्षांपूर्वीचा हरभरा बियाणे घोळाचा...अकोला ः २०१६-१७ च्या रब्बी हंगामात शेतकऱ्यांना...
किमान तापमानात चढ-उतार शक्य;...पुणे : उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचे...