agriculture news in marathi, raju shetty demand for parliamentary session on farmers issue, mumbai, maharashtra | Agrowon

`केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी विशेष अधिवेशन घ्यावे`
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 8 जून 2018

मुंबई  ः राज्यातीलच नव्हे तर देशातील शेतकऱ्यांवर अतिशय बिकट परिस्थिती ओढवली आहे. मोदी सरकारने घोषणा करूनही शेतकऱ्यांच्या शेतीमालाला दीडपट हमीभाव दिलेला नाही. दूध आणि भाजीपाल्याचे दरही घसरत आहेत, या सर्व प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी विशेष अधिवेशन घ्यावे, अशी मागणी केल्याची माहिती खासदार राजू शेट्टी यांनी दिली. काही खासगी विधेयके आपण मांडणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

मुंबई  ः राज्यातीलच नव्हे तर देशातील शेतकऱ्यांवर अतिशय बिकट परिस्थिती ओढवली आहे. मोदी सरकारने घोषणा करूनही शेतकऱ्यांच्या शेतीमालाला दीडपट हमीभाव दिलेला नाही. दूध आणि भाजीपाल्याचे दरही घसरत आहेत, या सर्व प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी विशेष अधिवेशन घ्यावे, अशी मागणी केल्याची माहिती खासदार राजू शेट्टी यांनी दिली. काही खासगी विधेयके आपण मांडणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

पत्रकार परिषदेत खासदार शेट्टी यांनी ही माहिती दिली. राज्यात शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने सुरू असलेल्या आंदोलनाला आपला पाठिंबा आहे. शेतकरी हितासाठी होणाऱ्या सर्व आंदोलनांना आमचा पाठिंबा असेल; मात्र या आंदोलनात आम्ही सहभागी नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

फडणवीस सरकारने दिलेली कर्जमाफी ही फसवी असून, त्याचा शेतकऱ्यांना फायदा झालेला नाही. गेल्या वर्षी शेतकऱ्यांनी ४२ हजार कोटी रुपयांचे कर्ज उचलले होते. मात्र, या वेळी केवळ २२ हजार कोटी रुपयांच्या कर्जाची उचल झाली आहे. ती कर्जमाफी मिळाली म्हणून नव्हे; तर शेतकऱ्यांना बॅंकांनी कर्ज नाकारले म्हणून, असा आरोप शेट्टी यांनी केला. शेतकऱ्यांच्या खात्यावर अजूनही कर्ज थकीत दिसते आहे. त्यामुळे बॅंका त्यांना कर्ज नाकारत आहेत, तर शेतकऱ्यांना ना हरकत प्रमाणपत्रे मिळत नाहीत त्यामुळे बॅंकांनी व्याज आकारणी सुरू केली असून, हे अन्यायकारक असल्याचे श्री. शेट्टी यांनी सांगितले. 

विरोधी पक्षांची एकजूट होत असल्याने मोदी सरकारचे धाबे दणाणले आहे. त्यामुळेच आता भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांना ‘मातोश्री’चे दरवाजे दिसले, असा टोलाही त्यांनी लगावला. हे सरकार अन्यायकारक असून, ते घालवण्यासाठी आपण विरोधी आघाडीत सामील झालो आहोत. मात्र, केवळ सत्तांतर हा आपला हेतू नसून, शेतकऱ्यांचे हित हाच उद्देश असल्याचे शेट्टी यांनी स्पष्ट केले.  

पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी रासायनिक खतांवर बंदी आणण्याबाबत केलेल्या वक्तव्याची खिल्ली उडवून शेट्टी म्हणाले, की हे शक्य नाही; कारण असे झाल्यास शेतीतील उत्पादकता घटून शेतीमालाचे भाव प्रचंड वाढतील, जे ग्राहकांना परवडणारे नसतील.

इतर ताज्या घडामोडी
संत्रा पिकाबाबतच्या उपाययोजनांचा अहवाल...नागपूर  ः संत्रा उत्पादकांचे आर्थिक हित...
सूक्ष्म सिंचन विस्तारातील अडचणी, पर्याय...औरंगाबाद   : औरंगाबाद येथे आयोजित...
‘ई- टेंडरिंग’ रेशीम उत्पादकांच्या मुळावरपुणे  ः राज्यात पाणीटंचाईमुळे सर्वत्र...
आंदोलनामुळे शेतकऱ्यांना मिळाले ७४...पुणे  : साखर आयुक्तालयासमोर गेल्या तीन...
रोहित पवार यांनी वाढवला नगर जिल्ह्यात... नगर : कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात मरगळ...
लोणार तालुक्यात कडाक्याच्या थंडीमुळे...बुलडाणा : जिल्ह्यात द्राक्ष शेती टिकवून ठेवण्यात...
कृषी सल्ला (कोकण विभाग)भात रोप अवस्था : उन्हाळी भात रोपवाटिकेस...
थंडीच्या काळात केळी बागांची काळजीकेळीच्या पानांवर कमी तापमानाचे दुष्परिणाम २ ते ४...
पहाटे, रात्री थंडीचे प्रमाण अधिक राहीलमहाराष्ट्राच्या सह्याद्री पर्वत रांगावर १०१४...
पाणंद रस्त्यांची निविदा प्रक्रिया सुरू अकोला : शासनाच्या पाणंद रस्ते योजनेतून...
`साखर उद्योगातील संघटित गुन्हेगारी...मुंबई : गेल्या वर्षीच्या हंगामातील ७०-३०...
शासकीय दूध डेअरीत अमोनियाची गळतीअकोला : येथील मूर्तिजापूर मार्गावर असलेल्या...
कृषी योजनेतील विहिरींनाही दुष्काळाचा...धुळे : अत्यल्प पावसामुळे खानदेशात विहिरींनी...
नागपुरात `जलयुक्‍त`चा निधी आटलानागपूर : फडणवीस सरकारची महत्त्वाकांशी योजना...
मराठवाड्याची ७६२ कोटींची अतिरिक्‍त...औरंगाबाद ः शासनाने कळविलेल्या आर्थिक मर्यादेच्या...
नत्राच्या कार्यक्षम वापरासाठी सेन्सरचा...कृषी क्षेत्रातून होणाऱ्या नत्रांच्या प्रदूषणाची...
कृषिक प्रदर्शनातील प्रात्यक्षिके पाहून...बारामती, जि. पुणे ः कृषिक प्रदर्शनाच्या दुसऱ्या...
जाती-धर्माच्या भिंती तोडणे हीच स्व....इस्लामपूर, जि. सांगली : लोकनेते राजारामबापू पाटील...
पशुधन संख्येनुसार चारा उपलब्ध करून द्यापरभणी ः परभणी जिल्ह्यात गेल्या काही वर्षांत पशुधन...
ज्वारी, हरभरा, करडईच्या पेरणी...परभणी ः जिल्ह्यात यंदा ज्वारी, हरभरा, करडई या तीन...