पहिली उचल विनाकपात ३४०० द्या : राजू शेट्टी

स्वाभिमानीची ऊस परिषद
स्वाभिमानीची ऊस परिषद

जयसिंगपूर, जि. कोल्हापूर : यंदाच्या हंगामात गाळपास येणाऱ्या उसाला पहिली उचल विनाकपात ३४०० रुपये द्यावी. अपेक्षित दर मिळणार नाहीत तोपर्यंत कारखान्यांची धुराडी पेटू देणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी शनिवारी (ता.२८) येथे दिला.  स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या १६ व्या ऊस परिषदेत ते बोलत होते. परिषदेच्या अध्यक्षस्थानी अजितबाबा शिंदे होते. विक्रमसिंग मैदानावर झालेल्या या परिषदेत खा. शेट्टी यांनी केंद्र व राज्य सरकारच्या ऊसविषयक भूमिकेवर टीका केली.  श्री. शेट्टी म्हणाले, ‘‘गेल्या हंगामातील एफआरपी अनेक कारखान्यांनी दिली नाही, त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अन्यथा अशा कारखान्यांविरोधात तीव्र आंदोलन करू. केंद्र व राज्य सरकारने प्रतिकूल निर्णय घेतले याचा फटका ऊस उत्पादकांना बसत आहे. एकीकडे ऊस उत्पादक विविध समस्यांनी ग्रस्त असतानाच भागविकास निधी व अन्य निधीतून उत्पादकांच्या खिशातून कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला आमचा विरोध आहे. राज्याबाहेर ऊस घालण्यास बंदी म्हणजे आमच्या व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आहे, असे निर्णय मागे न घेतल्यास सरकारला तीव्र असंतोषास सामोरे जावे लागेल.’’  या वेळी खा. शेट्टी यांनी गेल्या हंगामातील साखर उद्योग, केंद्र सरकारच्या भूमिकेमुळे या उद्योगात होत असलेली प्रतिकूलस्थिती याविषयी सविस्तर भाष्य केले. ऊसतोडणी महामंडळास शासनाने निधी उपलब्ध करून द्यावा. या महामंडळामार्फतच तोडणी मजुरांचा पुरवठा व्हावा, अशा मागण्या त्यांनी केल्या. वस्त्रोद्योग महामंडळाचे माजी अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या विरोधात आक्रमक टीका केली. या वेळी भगवान काटे, सावकर मदनाईक, आदींसह वक्त्यांची भाषणे झाली. या वेळी संघटनेचे राज्यभरातील प्रतिनिधीसह कार्यकर्ते उपस्थित होते खोत यांच्यावर प्रखर टीका राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यावर सर्वच वक्त्यांनी प्रखर टीका केली. ‘ऊसदर जाहीर करायला हा काय रतन खत्रीचा मटक्याचा आकडा आहे,’ या वाक्यावरून परिषदेत मोठा संताप व्यक्त करण्यात आला.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com