agriculture news in marathi, Raju Shetty demands recovery base 9.5 percent and more 200 rupees on it | Agrowon

रिकव्हरीचा बेस साडेनऊ करून त्यात २०० रुपये वाढ करा : शेट्टी
टीम अॅग्रोवन
रविवार, 28 ऑक्टोबर 2018

जयसिंगपूर, जि. कोल्हापूर :  यंदाच्या हंगामात रिकव्हरीचा बेस दहा ऐवजी साडे नऊ करून त्यात २०० रुपये वाढ करा आणि एक रकमी एफआरपी द्या. मागणी मान्य होईपर्यंत हंगाम सुरू करू देणार नाही असा इशारा राजू शेट्टी यांनी ऊस परिषदेत दिला.

जयसिंगपूर येथे शनिवारी (ता.२७)  झालेल्या स्वाभिमानीच्या सतराव्या ऊस परिषदेत त्यांनी केंद्र व राज्य शासनाच्या साखरविषयक धोरणावर जोरदार टीका केली.

जयसिंगपूर, जि. कोल्हापूर :  यंदाच्या हंगामात रिकव्हरीचा बेस दहा ऐवजी साडे नऊ करून त्यात २०० रुपये वाढ करा आणि एक रकमी एफआरपी द्या. मागणी मान्य होईपर्यंत हंगाम सुरू करू देणार नाही असा इशारा राजू शेट्टी यांनी ऊस परिषदेत दिला.

जयसिंगपूर येथे शनिवारी (ता.२७)  झालेल्या स्वाभिमानीच्या सतराव्या ऊस परिषदेत त्यांनी केंद्र व राज्य शासनाच्या साखरविषयक धोरणावर जोरदार टीका केली.

ते म्हणाले, की सरकारच्या म्हणण्यानुसार यंदा एफआरपीमध्ये २०० रुपयांनी वाढ केली आहे. पण, वस्तूस्थिती वेगळी आहे. एफआरपीचा रिकव्हरी बेस हा ९.३० टक्‍क्‍यावरून केंद्र सरकारने १० टक्के केला आहे. त्यामुळे उलट शेतकऱ्यांना टनामागे जादा रक्कम भरावी लागणार आहे. त्यातच डिझेलचे दर वाढले आहेत. खताच्या किंमतीसुद्धा १०० ते ३०० रुपयांनी वाढल्या आहेत. एकंदरीत उसाच्या उत्पादन खर्चात टनामागे ४० ते ४५ रुपयांनी वाढ झाली आहे. २०० रुपये एफआरपीमध्ये वाढ केली असली तरी, त्यातील टनामागे १८६ रुपये शेतकऱ्यांकडून काढून घेणार आहे. म्हणजे ही निव्वळ फसवणूक आहे.

 ज्या साखर कारखान्यांनी अद्याप २०१७-१८ सालची एफआरपी दिलेली नाही, त्या साखर कारखान्याच्या संचालकांवर कोर्टाच्या आदेशानुसार त्वरित फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांना तुरुंगात टाकावे. राज्य बँकेकडून कर्ज स्वरूपातील उचल ९० टक्के करण्यात यावी, अशी मागणी श्री शेट्टी यांनी यावेळी केली.

यावेळी रविकांत तुपकर, सावकार मादनाईक, भगवान काटे, जालिंदर पाटील, आदींची भाषणे झाली. यावेळी संघटनेचे राज्यभरातील कार्यकर्ते उपस्थित होते.

परिषदेतील संमत झालेले ठराव

  • उत्पादन खर्चाच्या दीड पट हमीभाव विधेयक व संपूर्ण कर्जमाफी मिळावी
  • गेल्या वर्षीची एफआरपी ज्यांनी दिली नाही त्या साखर कारखान्याच्या संचालकावर गुन्हे दाखल करावेत
  • सरकार दूधाला देत असलेले प्रति लिटर ५ रुपयांचे अनुदान कायम ठेवावे

इतर अॅग्रो विशेष
शेतीतील दारिद्र्याचे भीषण वास्तवभारताने खुली व्यवस्था स्वीकारल्याला २०१६ मध्ये २५...
आश्वासक हरभरा; अस्वस्थ उत्पादकराज्यात हरभरा काढणीस महिनाभर आधीपासूनच सुरवात...
इतिहासातील जलसंधारण संकल्पना अन्...मागच्या भागात आपण इतिहासातील सागरी किल्ल्यांवरील...
खानदेशात बाजरी मळणीवरजळगाव : खानदेशात बाजरी पीक मळणीवर आले आहे. आगामी...
शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती : '...मुंबई ः शेतीच्या शाश्वत सुधारणेला गती देण्यासाठी...
सांगली : कडब्याचे दर पोचले साडेचार हजार...सांगली  ः यंदा दुष्काळी स्थिती तीव्र आहे....
सांगली जिल्ह्यात पाण्याअभावी रखडली खरड...सांगली  ः जिल्ह्यातील द्राक्ष हंगाम अंतिम...
ऊस, कापूस पट्ट्यात कष्टाने पिकविली हळद शेतीचा फारसा अनुभव नाही. पण आवड, जिद्द,...
कृषी विद्यापीठांचे वाण वापरण्यात...वाशीम जिल्ह्यातील शिरपूर जैन (ता. मालेगाव) येथील...
राज्यात अद्यापही २४ टक्के ‘एफआरपी’ बाकीपुणे : ऊस खरेदीपोटी राज्यातील शेतकऱ्यांना...
उत्तर प्रदेशात ऊसबिलावरून धुमशाननवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत कोणता मुद्दा...
शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी युवकाचा ‘...नाशिक : राज्यात नापिकी, दुष्काळ, बाजारभाव...
उन्हाचा ताप वाढण्याची शक्यतापुणे : राज्यात उन्हाचा चटका अाणि उकाडा...
जेजुरी गडावर देवाची रंगपंचमीजेजुरी, जि. पुणे : जेजुरी गडावर पारंपरिक...
शेतकरी मंडळामुळे मिळाला ९० लाखांचा...वेंगुर्ले, जि. सिंधुदुर्ग : बॅंकेच्या चुकीमुळे...
कोंबडा झाकला तरी...मा  गील सात वर्षांत कृषी आणि सलग्न क्षेत्रातील...
शेतकऱ्यांची दैनावस्था दूर करणारा...गेल्या अनेक वर्षांत शेती आणि शेतकऱ्यांची जी...
तुरळक ठिकाणी पावसाची शक्यतापुणे : राज्यात उन्हाचा चटका वाढल्याने अनेक ठिकाणी...
शिल्लक साखरेचा दबाव पुढील हंगामावर?कोल्हापूर : केंद्राने सुरू केलेल्या कोटा...
‘सॉर्टेड सिमेन’चा प्रयोग यशस्वीनगर : गोदावरी खोरे नामदेवराव परजणे पाटील तालुका...