agriculture news in marathi, raju shetty discuss with sugar commisionar about frp, pune, maharashtra | Agrowon

खोटी आकडेवारी दाखवून गाळप परवाने घेतले : खासदार राजू शेट्टी
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 13 नोव्हेंबर 2018

पुणे   : शेतकऱ्यांना `एफआरपी` दिल्याचे भासवून खोट्या आकडेवारीच्या आधारे यंदाच्या हंगामात काही साखर कारखान्यांनी गाळप परवाने मिळवल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, खासदार राजू शेट्टी यांनी सोमवारी (ता.१२) साखर आयुक्तांशी चर्चेदरम्यान केला. यामुळे एका कारखान्याचा गाळप परवाना तडकाफडकी निलंबित करण्यात आला.

पुणे   : शेतकऱ्यांना `एफआरपी` दिल्याचे भासवून खोट्या आकडेवारीच्या आधारे यंदाच्या हंगामात काही साखर कारखान्यांनी गाळप परवाने मिळवल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, खासदार राजू शेट्टी यांनी सोमवारी (ता.१२) साखर आयुक्तांशी चर्चेदरम्यान केला. यामुळे एका कारखान्याचा गाळप परवाना तडकाफडकी निलंबित करण्यात आला.

आधीच्या हंगामातील एफआरपी शेतकऱ्यांना दिल्याशिवाय कायद्यानुसार साखर कारखान्यांना नव्या हंगामासाठी गाळप परवाना देता येत नाही. `एफआरपी` आणि `आरएसएफ` थकविलेल्या कारखान्यांना गाळप परवाने न देण्याची भूमिका साखर आयुक्त संभाजी कडूपाटील यांनी काही दिवसांपूर्वीच स्पष्ट केली होती. मात्र, आयुक्तालयाला चकवून काही कारखान्यांनी गाळप परवाने मिळवल्याचे खासदार शेट्टी यांनी निदर्शनास आणून दिले. 

उस्मानाबाद येथील भैरवनाथ शुगर वर्क्सने २०१७-१८ मधील हंगामातील `एफआरपी` अदा न करताच गाळप सुरू केल्याची तक्रार ‘स्वाभिमानी’चे मराठवाडा विभागातील नेते गोरख चांगदेव भोरे यांनी केली आयुक्तांकडे केली. या वेळी खासदार शेट्टी म्हणाले, की राज्यातील शेतकऱ्यांची फसवणूक करून खोट्या माहितीच्या आधारे काही कारखान्यांनी गाळप परवाने घेतले आहेत. शासनाची दिशाभूल करून परवाने घेणाऱ्या कारखान्यांवर फौजदारी कारवाई करावी. `एफआरपी` थकविणाऱ्या कोणत्याही कारखान्यांना आयुक्तालयाने परवाना दिलेला नाही. मात्र, काही कारखान्यांबाबत शंका असल्यास चौकशी केली जाईल, असे आयुक्तांनी स्पष्ट केले. विशेष म्हणजे भैरवनाथ शुगरचा गाळप परवाना आयुक्तांनी तडकाफडकी निलंबित केला.

भैरवनाथ शुगरने शेतकरी सभासदांना पूर्णतः `एफआरपी` दिली नसल्याचे सकृतदर्शनी दिसते आहे. त्यामुळे आयुक्तालयाने या प्रकरणाची चौकशी करण्याच्या सूचना नांदेडच्या साखर सहसंचालक व उस्मानाबादच्या विशेष लेखा परीक्षक (साखर) यांना दिल्या आहेत. ही चौकशी पूर्ण होईपर्यंत २०१८-१९ साठीचा गाळप हंगाम परवाना तात्पुरता निलंबित करण्यात आला आहे, असे साखर आयुक्तांनी स्पष्ट केले. या वेळी ‘स्वाभिमानी’चे नेते योगेश पांडे, रवींद्र इंगळे, अॅड. रामराजे देशमुख तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.

इतर ताज्या घडामोडी
फळबाग लागवड योजनेवर ग्रामसेवकांचा...चिपळूण, जि. रत्नागिरी ः महाराष्ट्र ग्रामसेवक...
‘रिसॅट-२ बी'चे उपग्रहाचे यशस्वी...श्रीहरीकोट : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो...
‘कृष्णामाई’चा कर्नाटकातील काठ तहानला;...कोल्हापूर : कृष्णा नदीवर अवलंबून असणाऱ्या कर्नाटक...
जळगावात लिंबू २२०० ते ५००० रुपये...जळगाव  : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
देशभरात ७२४ महिला उमेदवारांचे भवितव्य...नवी दिल्ली : देशात नुकत्याच झालेल्या लोकसभा...
गारपिटीनंतर द्राक्ष बागेची अधिक काळजी...द्राक्ष बागेमध्ये वाढीच्या विविध अवस्थेमध्ये...
अमरावती : नाफेडने अचानक केली तूरखरेदी...अमरावती : ऑनलाइन नोंदणी केलेल्या दहा टक्‍के...
बुलडाणा जिल्ह्यात भीषण पाणीटंचाईबुलडाणा ः गेल्या काही वर्षांत पहिल्यांदाच...
दुष्काळात संत्रा बागेला टँकरच्या...अकोला ः दुष्काळी परिस्थितीने शेतकऱ्याला चौफेर...
खानदेशात सौर कृषिपंप योजनेतून लवकरच पंप...जळगाव ः सौर कृषिपंपासाठी खानदेशातून ८ हजार ९५०...
मिरज, तासगावसह सिंधुदुर्गात पाऊससिंधुदुर्ग, सांगली : विजांच्या कडकडाटांसह...
मराठवाड्यात नवीन खासदारांबाबत उत्कंठानांदेड : मराठवाड्यातील आठ लोकसभा मतदारसंघांतील...
कोल्हापूर, सांगलीत निकालाची उत्सुकता...सांगली : लोकसभा निवडणुकीची मतमोजणी गुरुवारी (ता....
सोलापूर, माढ्याच्या निकालाकडे देशाचे...सोलापूर : अत्यंत प्रतिष्ठेच्या ठरलेल्या...
परभणी जिल्ह्यातील ग्रामीण भागात ७५...परभणी : जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पाणीटंचाईचे...
यसनी तोडून पुढे या : रमेश घोलपसोलापूर  : "परिस्थितीने बांधलेल्या यसनी तोडत...
पुणे विभागासाठी साडेपाच कोटींवर वृक्ष...पुणे  ः पर्यावरणाचे संतुलन अबाधित...
सोयाबीन उत्पादकांना पीकविम्याची रक्कम...मुंबई  : शासनाच्या विशेषतः कृषी विभागाच्या...
आमदार निधीतून दुष्काळग्रस्त भागासाठी...मुंबई  ः दुष्काळग्रस्त भागातील जनतेला आमदार...
साडेचौदा टन केशर, बदामी आंबा...मुंबई : वातावरण नियंत्रित करून फळाचे...