agriculture news in marathi, raju shetty gives hint of agitation for sugarcane rate, nagar, maharashtra | Agrowon

उसाला दर दिला नाही,तर मोठा लढा उभारू : खासदार राजू शेट्टी
टीम अॅग्रोवन
शनिवार, 29 सप्टेंबर 2018

नगर  : नगर जिल्ह्यातील शेतकरी, ऊस उत्पादकांची पिळवणूक अजिबात सहन करणार नाही. यंदाच्या हंगामात उसाला दर दिला नाही, तर मोठा लढा उभारणार असून, कोल्हापूरसारखी ताकद नगरला उभी करणार आहे, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी सांगितले.

नगर  : नगर जिल्ह्यातील शेतकरी, ऊस उत्पादकांची पिळवणूक अजिबात सहन करणार नाही. यंदाच्या हंगामात उसाला दर दिला नाही, तर मोठा लढा उभारणार असून, कोल्हापूरसारखी ताकद नगरला उभी करणार आहे, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी सांगितले.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे शुक्रवारी (ता. २८) इंदोरी फाटा (ता. अकोले, जि. नगर) येथे शेतकरी परिषदेचे आयोजन करण्यात आले. ज्येष्ठ नेते दशरथ सावंत या वेळी अध्यक्षस्थानी होते. संघटनेचे प्रदेशाध्यक्ष पोपळे, युवा प्रदेशाध्यक्ष हंसराज वडघुले, महिला आघाडी अध्यक्षा रसिका ढगे, रवी मोरे, शरद मरकड, मराठवाडा अध्यक्ष माणिक कदम आदींसह पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.

खासदार शेट्टी म्हणाले, की नगर जिल्ह्यात आशिया खंडातील पहिला सहकारी साखर कारखाना सुरू झाला ही अभिमानाची बाब आहे. या कारखान्याने उसाला सर्वांत आधी आणि जास्त दर द्यायला पाहिजे; पण तसे होत नाही. नगरचे साखर कारखानदार शेतकऱ्यांची पिळवणूक करत आहेत. आता तसे अजिबात होऊ देणार नाही. कोल्हापूरला २७ आॅक्टोबरला ऊस परिषद होत आहे. त्यात दर जाहीर होईपर्यंत नगरमधील शेतकऱ्यांनी कारखान्याला ऊस देऊ नये. नगर जिल्ह्यात संघटनेची कोल्हापूरसारखी ताकद उभी करणार आहे. दुधाचे अनुदान जमा केले नाही तर पुन्हा लढा उभारणार आहे. नगरच्या कारखानदारांनी सभासदांच्या पैशांतून संस्था उभ्या केल्या. पण नंतर त्या स्वतःच्या नावे करून सभासदांची फसवणूक केल्याचा आरोप खासदार शेट्टी यांनी केला.

टॅग्स

इतर ताज्या घडामोडी
फळबाग लागवड योजनेवर ग्रामसेवकांचा...चिपळूण, जि. रत्नागिरी ः महाराष्ट्र ग्रामसेवक...
‘रिसॅट-२ बी'चे उपग्रहाचे यशस्वी...श्रीहरीकोट : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो...
‘कृष्णामाई’चा कर्नाटकातील काठ तहानला;...कोल्हापूर : कृष्णा नदीवर अवलंबून असणाऱ्या कर्नाटक...
जळगावात लिंबू २२०० ते ५००० रुपये...जळगाव  : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
देशभरात ७२४ महिला उमेदवारांचे भवितव्य...नवी दिल्ली : देशात नुकत्याच झालेल्या लोकसभा...
गारपिटीनंतर द्राक्ष बागेची अधिक काळजी...द्राक्ष बागेमध्ये वाढीच्या विविध अवस्थेमध्ये...
अमरावती : नाफेडने अचानक केली तूरखरेदी...अमरावती : ऑनलाइन नोंदणी केलेल्या दहा टक्‍के...
बुलडाणा जिल्ह्यात भीषण पाणीटंचाईबुलडाणा ः गेल्या काही वर्षांत पहिल्यांदाच...
दुष्काळात संत्रा बागेला टँकरच्या...अकोला ः दुष्काळी परिस्थितीने शेतकऱ्याला चौफेर...
खानदेशात सौर कृषिपंप योजनेतून लवकरच पंप...जळगाव ः सौर कृषिपंपासाठी खानदेशातून ८ हजार ९५०...
मिरज, तासगावसह सिंधुदुर्गात पाऊससिंधुदुर्ग, सांगली : विजांच्या कडकडाटांसह...
मराठवाड्यात नवीन खासदारांबाबत उत्कंठानांदेड : मराठवाड्यातील आठ लोकसभा मतदारसंघांतील...
कोल्हापूर, सांगलीत निकालाची उत्सुकता...सांगली : लोकसभा निवडणुकीची मतमोजणी गुरुवारी (ता....
सोलापूर, माढ्याच्या निकालाकडे देशाचे...सोलापूर : अत्यंत प्रतिष्ठेच्या ठरलेल्या...
परभणी जिल्ह्यातील ग्रामीण भागात ७५...परभणी : जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पाणीटंचाईचे...
यसनी तोडून पुढे या : रमेश घोलपसोलापूर  : "परिस्थितीने बांधलेल्या यसनी तोडत...
पुणे विभागासाठी साडेपाच कोटींवर वृक्ष...पुणे  ः पर्यावरणाचे संतुलन अबाधित...
सोयाबीन उत्पादकांना पीकविम्याची रक्कम...मुंबई  : शासनाच्या विशेषतः कृषी विभागाच्या...
आमदार निधीतून दुष्काळग्रस्त भागासाठी...मुंबई  ः दुष्काळग्रस्त भागातील जनतेला आमदार...
साडेचौदा टन केशर, बदामी आंबा...मुंबई : वातावरण नियंत्रित करून फळाचे...