agriculture news in marathi, raju shetty gives hint to sugar factory for frp, solapur, maharashtra | Agrowon

‘एफआरपी’ जमा न केल्यास सहकारमंत्र्यांच्या घरावर मोर्चा काढू : खासदार शेट्टी
टीम अॅग्रोवन
बुधवार, 12 सप्टेंबर 2018

सोलापूर   ः ‘एफआरपी’ थकविणाऱ्या साखर कारखान्यांवर कारवाई करण्याऐवजी त्यांच्यावरील कारवाईस स्थगिती देणारे आणि हंगाम संपून चार-पाच महिने उलटूनही एफआरपी देण्यासाठी मुदतवाढ देणारे सहकारमंत्री सुभाष देशमुख शेतकऱ्यांच्या बाजूने आहेत की कारखानदारांच्या, असा प्रश्‍न करीत आता तारीख पे तारीख चालणार नाही. येत्या शनिवारपर्यंत (ता. १५) ‘एफआरपी’चे थकलेले सगळे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करा; अन्यथा गुरुवारी (ता. २०) सहकारमंत्र्यांच्या घरावर मोर्चा काढू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, खासदार राजू शेट्टी यांनी दिला.

सोलापूर   ः ‘एफआरपी’ थकविणाऱ्या साखर कारखान्यांवर कारवाई करण्याऐवजी त्यांच्यावरील कारवाईस स्थगिती देणारे आणि हंगाम संपून चार-पाच महिने उलटूनही एफआरपी देण्यासाठी मुदतवाढ देणारे सहकारमंत्री सुभाष देशमुख शेतकऱ्यांच्या बाजूने आहेत की कारखानदारांच्या, असा प्रश्‍न करीत आता तारीख पे तारीख चालणार नाही. येत्या शनिवारपर्यंत (ता. १५) ‘एफआरपी’चे थकलेले सगळे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करा; अन्यथा गुरुवारी (ता. २०) सहकारमंत्र्यांच्या घरावर मोर्चा काढू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, खासदार राजू शेट्टी यांनी दिला. सहकारमंत्र्यांच्या कारखान्याकडेच थकबाकी आहे; मग न्याय कोणाला मागणार, असा प्रश्‍नही त्यांनी उपस्थित केला.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने ज्येष्ठ नेते (स्व.) वसंतराव आपटे यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त मंगळवारी (ता. ११) आयोजित शेतकरी मेळाव्यात खासदार शेट्टी बोलत होते. या वेळी आपटे यांच्या स्मृतिदिनानिमित्त महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी आयोजित निबंध स्पर्धेचे पारितोषिक वितरण आणि ‘काळी आई’ या लघुचित्रपटाचे सादरीकरण झाले. ‘स्वाभिमानी’चे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर, विद्यार्थी परिषदेचे प्रदेशाध्यक्ष अमोल हिप्परगे, ज्येष्ठ नेते सिद्रामप्पा अब्दुलपूरकर, बाजार समितीचे संचालक बाळासाहेब शेळके, वसंत पाटील, जिल्हाध्यक्ष महामूद पटेल, समाधान फाटे, विनय आपटे, महेश आपटे, सरचिटणीस विजय रणदिवे, उमाशंकर पाटील आदी उपस्थित होते.

श्री. शेट्टी म्हणाले, की सहकारमंत्री हे एक जबाबदार मंत्री आहेत, ते स्वतः कारखानदार आहेत. त्यांच्याच कारखान्याकडे थकबाकी आहे. मी स्वतः त्यांना भेटलो, तेव्हा सर्व कारखान्यांना पाच सप्टेंबरची मुदत त्यांनी घेतली. आता पुन्हा १५ सप्टेंबरची मुदत त्यांनी कारखानदारांना दिली आहे. १४ दिवसांच्या आत एफआरपीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा व्हायला हवी. पण इथे सर्वच कारखान्यांनी या नियमांचे थेट उल्लंघन केले आहे. फौजदारी स्वरूपाचा हा गुन्हा आहे; पण कारवाई होत नाही, ही जबाबदारी कोणाची? उलट कारवाईच्या नोटिसा दिलेल्या कारखान्यांवरील कारवाईस मंत्री महोदय स्थगिती देतात. पण आता तारीख पे तारीख बस्स झाली. १५ सप्टेंबर ही आमची शेवटची संधी असेल, त्या तारखेपर्यंत पैसे जमा झाले नाहीत, तर थेट मंत्र्यांच्या घरावर मोर्चा काढून पैसे वसूल करू.

या वेळी श्री. तुपकर, अमोल हिप्परगे यांची भाषणे झाली. प्रास्ताविकात जिल्हाध्यक्ष पटेल यांनी कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका सांगितली. अतिश पाटोळे यांनी सूत्रसंचालन केले. विजय रणदिवे यांनी आभार मानले.
 
खासदार शेट्टी म्हणाले...

  • सहकारमंत्र्यांच्या सोलापुरातच सर्वाधिक १२५ कोटींची थकबाकी.
  • कारखानदारांनी साखरेची विक्री योग्य वेळी न केल्याने अडचण.
  • एफआरपी दोन टप्प्यांत देण्याचा निर्णय, पण आमचा विरोध.
  • हुमणीचा प्रश्‍न सध्या बिकट, पण कृषी विभाग, कृषी विद्यापीठे शांतच.
  • साडेनऊ टक्‍क्‍यांऐवजी दहा टक्‍क्‍यांवर आधारित एफआरपी देणार, पण निर्णय फसवा.

इतर ताज्या घडामोडी
राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण...जळगाव : जळगाव आणि धुळे जिल्ह्यांतून जाणाऱ्या...
अंजनीसह पाच गावांची पाण्याविना आबाळसांगली ः तासगाव तालुक्‍याचा पूर्वभागात भीषण...
सोलापुरात दुष्काळ जाहीर करण्याची मागणीसोलापूर : सोलापूर जिल्ह्यात अद्यापही दमदार पाऊस...
गोंदिया जिल्ह्यात गणेशोत्सवाद्वारे शेती...गोंदिया :गणेशोत्सवाच्या माध्यमातून कृषी...
सातारा जिल्ह्यात स्ट्रॉबेरी लागवडीस...सातारा   ः राज्यभरात गोडव्यासाठी प्रसिद्ध...
सोलापूर जिल्ह्यावर दुष्काळ अन हुमणीचे...सोलापूर   ः जिल्ह्यात यंदाच्या हंगामात...
पीकविमा योजनेतून कंपन्यांचे भले ः विखे...पुणे   ः शेतकऱ्यांच्या पिकांना संरक्षण...
कृषी सल्ला : ऊस, कापूस, सोयाबीन, मका,...ऊस हुमणी किडीच्या नियंत्रणासाठी, फिप्रोनील (०.३...
अार्थिक व्यवस्थापनात राज्य सरकार अपयशी...मुंबई  : काँग्रेसच्या कार्यकाळात राज्याची...
कृषी सल्ला : भात, नागली, आंबा, नारळ,...भात  अवस्था ः पोटरी ते लोंबी बाहेर...
अकोल्यात मूग प्रतिक्विंटल ३८०० ते ५३००...अकोला ः या हंगामात लागवड झालेल्या मुगाची काढणी...
सोयाबीन, मूग, उडदासाठी १९ खरेदी केंद्रे...नगर ः शेतकऱ्यांचा शेतमाल हमीदराने खरेदी करता यावा...
शेतीमाल तारण योजनेत शेतकरी उत्पादक...कोल्हापूर : राज्यात शेतीमाल तारण योजना बाजार...
जळगावात आले २५०० ते ६००० रुपये...जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सिंदखेडराजा दुष्काळग्रस्त जाहीर कराअकोला : जिल्ह्यात या मोसमात तेल्हारा व अकोट या...
खान्देशातील धरणांत अल्प पाणीसाठा जळगाव : खान्‍देशातील तापी व पांझरा नदीवरील...
कोल्हापूरात धरणे भरली; नद्यांची...कोल्हापूर : केवळ पंधरा दिवसांतच जिल्ह्यातील...
जळगाव जिल्हा परिषदेत विरोधक शांत;...जळगाव : पोषण आहार, शिक्षक बदल्या यावरून जिल्हा...
नगर जिल्ह्याच्या काही भागांत पावसाचे...नगर ः गेल्या अनेक दिवसांपासून गायब झालेला आणि...
भंडारा जिल्ह्यातील धान उत्पादनात घटीची...भंडारा : गेल्या वीस दिवसांपासून धानपट्ट्यात...