agriculture news in marathi, raju shetty gives ultimatum to government for frp, sangli, maharashtra | Agrowon

एफआरपी तुकड्यात घेणार नाही : खासदार राजू शेट्टी
टीम अॅग्रोवन
बुधवार, 23 जानेवारी 2019

राज्य शासनाने गायीच्या दुधाला अनुदान देण्याची घोषणा केली. मात्र, गेल्या तीन महिन्यांपासून दुधाचे अनुदान मिळालेच नाही. हे सरकार केवळ घोषणबाजी करणारे सरकार आहे.
- राजू शेट्टी, खासदार

सांगली : राज्यातील साखर कारखाने सुरू होऊन ८० दिवस झाले, तरीही साखर कारखान्यांनी एक रकमी एफआरपी अद्यापही दिलेली नाही. कारखान्यांनी एफआरपीचे तुकडे केले आहेत. एफआरपी तुकड्यात घेतली जाणार नाही. एकरकमी एफआरपीसाठी सोमवारी (ता. २८) पुणे येथील साखर आयुक्त कार्यालयावर हल्लाबोल मोर्चा काढणार आहे. तिथे आम्हाला अडवतील, तिथूनच आंदोलन करू, आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला तर २०१३ सारखा उद्रेक होईल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी दिला.

सांगली येथे मंगळवारी (ता. २२) आयोजित पत्रकार परिषदेत खासदार शेट्टी बोलत होते. ते म्हणाले, की उसाला एकरकमी एफआरपी मिळावी, यासाठी गेले पंधरा दिवसांपासून आंदोलन करीत आहोत. राज्यातील साखर कारखान्यांनी ५ हजार ५०० कोटींची एफआरपी थकवलेली आहे. उत्तर प्रदेशात ९ हजार कोटींची थकबाकी आहे. अशीच स्थिती देशातील आहे. एफआरपीबाबत केंद्र सरकारने धोरणात्मक निर्णय घेणे अपेक्षित होते. पण तसा धोरणात्मक निर्णय शासनाने घेतलेला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र आणि गोवा राज्यांतील कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्या वेळी धोरणात्मक निर्णयामुळे ९९ टक्के शेतकऱ्यांना संपूर्ण एफआरपी दिली आहे, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे खोटं बोला पण रेटून बोला अशी स्थिती पंतप्रधानांची आहे.

ते पुढे म्हणाले, की उत्तरप्रदेशमधील २०१७-१८ मधील साखर कारखान्यांची दोन हजार कोटींची थकबाकी होती, त्या वेळी साखर कारखान्यांच्या दोन कार्यकारी संचालकांना नोटीस देऊन अटक केली होती. मात्र, राज्यात सहकारमंत्रीच थकबाकीदार आहेत. त्यांच्यावर कारवाई कोण करणार असा प्रश्न या वेळी त्यांनी उपस्थित केला. आमचा केंद्र, राज्य आणि साखर कारखान्यांवर विश्वास राहिलेला नाही. राज्यात सुमारे १८० साखर कारखाने सुरू आहेत. त्यापैकी ११ साखर कारखान्यांनी एकरकमी एफआरपी दिली आहे. उर्वरित साखर कारखान्यांनी अद्यापही एकरकमी एफआरपी दिलेली नाही, त्यामुळे आम्ही पुण्यात राज्यातील शेतकऱ्यांना एकत्र बरोबर घेऊन हल्लाबोल मोर्चा काढणार आहे. ही आरपारची लढाई आहे.
 

इतर अॅग्रो विशेष
समजून घ्या पाण्याचे महत्त्वपाण्याची समस्या शाश्वत पद्धतीने सोडवण्यासाठी...
जनावरांची तडफड, लोकांचा पाण्यासाठी टाहोसोलापूर ः राज्य शासनाने दुष्काळ जाहीर करून जवळपास...
‘गुणनियंत्रण’विरोधात विखेंचेही पत्र पुणे : राज्याच्या कृषी खात्यातील गुण नियंत्रण...
राज्य बॅंकेकडून साखरेच्या मूल्यांकनात...कोल्हापूर : केंद्राने खुल्या साखरेचे किमान विक्री...
राज्यात उद्या हलक्या पावसाची शक्यतापुणे: वेगाने बदलणारे वातावरण, वाऱ्यांच्या...
प्रेरणा प्रकल्पातून ९० हजार शेतकऱ्यांचे...मुंबई : राज्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त १४...
कांद्याच्या ढिगाऱ्यात बुजवून घेत...नाशिक  : कमी पाऊस, दुष्काळी परिस्थिती व...
एका संदेशाने आयुष्य केले बळकटटाकळी ढोकेश्वर, जि. नगर  ः काही तासांपूर्वी...
'दावणीलाही नाही आणि छावणीत नाही; जनावरे...सोलापूर :  मागील सरकारच्या काळात छावणीत...
वनहक्काच्या ४३ हजारांहून अधिक...मुंबई : राज्यात मागील अवघ्या तीन महिन्यांत...
खानदेशात मका दरात वाढजळगाव ः खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मक्...
पशूपालन अन्‌ गूळनिर्मितीतून शेती केली...राशिवडे (ता. राधानगरी, जि. कोल्हापूर) येथील...
दुष्काळातही भाजीपाला शेतीतून मिळविले...लातूर जिल्ह्यातील उमरगा (यल्लादेवी) येथील माळी...
रयत राजाची अन् राजा रयतेचाहिंदवी स्वराज्य संस्थापक, रयतेचा लोककल्याणकारी...
थकीत एफआरपीचा तिढासा  खरेच्या किमान विक्री मूल्यात प्रतिक्विंटल २००...
भारतीय लष्कराने घेतला बदला; पुलवामा...जम्मू : पुलवामात सीआरपीएफ जवानांवरील हल्ल्यानंतर...
आदिवासींचं श्रद्धास्थान असलेल्या कचारगड...कचारगड, जि. गोंदिया : मध्य भारतातील सर्व आदिवासी...
मराठवाड्यात दीड महिन्यात ७७...औरंगाबाद : मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्यांचे सत्र...
चार वर्षांत संत्रा उत्पादकांची दखलच...नागपूर : कोट्यवधी रुपयांची उलाढाल असलेल्या आणि...
सांगली जिल्ह्यातील सहा कारखाने...सांगली  ः सहा कारखान्यांनी एकरकमी एफआरपी...