agriculture news in marathi, Raju Shetty honours the swabhinami man | Agrowon

‘त्या’ कार्यकर्त्याचा राजू शेट्टींकडून सन्मान
टीम अॅग्रोवन
बुधवार, 28 फेब्रुवारी 2018

सोलापूर : कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या गाडीवर माढ्यामध्ये शनिवारी (ता. २४) स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्याने दगडफेक करून सदाभाऊंवर रोष दाखवला होता. त्या कार्यकर्त्याच्या ‘कामगिरी’चा सन्मान करत त्याच्या पाठीवर खासदार राजू शेट्टी यांनी कौतुकाची थाप दिली. त्यामुळे या दोन्ही नेत्यातील संघर्ष आणखी टोकाला जाणार असल्याची चिन्हे दिसत आहेत.

सोलापूर : कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या गाडीवर माढ्यामध्ये शनिवारी (ता. २४) स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्याने दगडफेक करून सदाभाऊंवर रोष दाखवला होता. त्या कार्यकर्त्याच्या ‘कामगिरी’चा सन्मान करत त्याच्या पाठीवर खासदार राजू शेट्टी यांनी कौतुकाची थाप दिली. त्यामुळे या दोन्ही नेत्यातील संघर्ष आणखी टोकाला जाणार असल्याची चिन्हे दिसत आहेत.

गेल्या शनिवारी माढा-पंढरपूर दौऱ्यावर असताना मंत्री खोत यांना शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले होते. रिधोरेनजीक त्यांच्या गाडीवर दगडफेकही झाली. या घटनेत दगडफेक करणारा कार्यकर्ता बापू गायकवाड याला पोलिसांनी अटक केली होती. रविवारी त्याला जामीन मिळाला. या घटनेनंतर शेट्टी-खोत वादाला चांगलेच तोंड फुटले आहे. सध्या आरोप-प्रत्यारोपांची धुळवड रंगली आहे. या प्रकारावर प्रतिक्रिया देताना खासदार शेट्टी यांनी खोतच काय, मंत्रिमंडळातील सगळ्या मंत्र्यांच्या गाड्या शेतकऱ्यांकडून अडवल्या जातील, असे सांगून सरकार आणि मंत्री खोतांवर शाब्दिक हल्ला केला. त्यावर मंत्री खोत यांनीही सुरवात तुम्ही केली, पण शेवट आम्ही करणार असे प्रत्युत्तर देऊन पुन्हा आपली शाब्दिक धार कायम ठेवली होती.

या घडामोडी घडतात न घडतात तोच, सोमवारी (ता. २६) खासदार राजू शेट्टी हे माळशिरस तालुक्‍यातील भांबुर्डी येथे एका कार्यक्रमासाठी आले होते. त्या वेळी खोत यांच्या गाडीवर दगडफेक करणारा कार्यकर्ता बापू गायकवाड याला खास बोलावणे पाठवून या कार्यक्रमात खासदार शेट्टी यांनी त्याचा सन्मान करत त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. दरम्यान, या सगळ्या प्रसंगावरून शेतकरी संघटनांतील हा संघर्ष टोकाला जात असल्याचे दिसते आहे.

इतर ताज्या घडामोडी
अकोल्याला रब्बीसाठी हरभऱ्याचे वाढीव...अकोला  ः जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी...
दुष्काळाची व्यथा मांडताना महिला...निल्लोड, जि. औरंगाबाद : विहिरींनी तळ गाठला, मक्‍...
कोल्हापूर जिल्ह्यात खरीप पिकांच्या...कोल्हापूर  : खरीप पिकांची काढणी वेगात...
सोलापुरातील अडचणीतील शेतकऱ्यांसाठी आश्‍...सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची...
नगरमधील ४३३८ शेतकऱ्यांची शेतीमाल...नगर  ः आधारभूत किमतीने मूग, उडीद, सोयाबीनची...
जळगाव जिल्ह्यात ज्वारीच्या पेरणीला...जळगाव : जिल्ह्यात रब्बीतील ज्वारी पेरणीकडे...
ढगाळ वातावरणामध्ये द्राक्ष पिकात...सांगली, मिरज व सोलापूर येथील काही भागांमध्ये हलके...
हुमणी अळीचे एकात्मिक व्यवस्थापनगेल्या काही वर्षांपासून राज्याच्या विविध...
पुणे जिल्ह्यात रब्बीसाठी १९ हजार...पुणे : पुणे जिल्ह्यात रब्बी हंगामाची तयारी सुरू...
सोलापूर जिल्हा बॅंकेकडून ७० हजार...सोलापूर  : सोलापूर जिल्हा बॅंकेच्या सव्वा...
सोयाबीन खरेदी केंद्रे सुरू होईनातसातारा : जिल्ह्यात खरिप पिकांची काढणी अंतिम...
भाजीपाला सल्लासध्याच्या काळात बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन...
कृषी सल्ला : ऊस, कापूस, तूर, गहू, हरभरा...ज्या ठिकाणी पाण्याचा ताण बसत आहे, त्या ठिकाणी...
हाताचा नाकाशी होणाऱ्या संपर्कातूनही...न्यूमोनियाकारक जिवाणू हा नाकाला हात लावणे,...
खानदेशात खरिपातील ज्वारीची आवक सुरुजळगाव : खानदेशात अनेक भागांत ज्वारीची मळणी जवळपास...
परभणी जिल्ह्यात मुगाची उत्पादकता एकरी १...परभणी : यंदा परभणी जिल्ह्यात मुगाची सरासरी...
पुणे जिल्ह्यात चाराटंचाईपुणे   ः पुणे जिल्ह्यातील पूर्व पट्ट्यात...
नगर - मराठवाड्यात पाण्यावरून संघर्षाची...नगर ः पुरेसा पाऊस झाला नसल्याने यंदा...
‘महसूल’च्या जागेवर चाऱ्याच्या...यवतमाळ  ः पांढरकवडा व राळेगाव तालुक्‍यांतील...
सातारा जिल्ह्यात ७७३ एकरांवर तुती लागवडसातारा  ः जिल्ह्यात रेशीम शेती करण्याकडे...