जलसंवर्धन कामांची राजू शेट्टींनी केली पाहणी

जलसंवर्धन कामांची राजू शेट्टींनी केली पाहणी
जलसंवर्धन कामांची राजू शेट्टींनी केली पाहणी

बुलडाणा ः दुष्काळावर मात करण्यासाठी जलसंवर्धनाची कामे होणे गरजेचे आहे. वृक्ष लागवड व वृक्षसंवर्धन करण्यासह पाणी अडविणे व जिरवणे, पाण्याचे स्रोत मोकळे करणे आवश्यक आहे. नदी, नाल्यांचे खोलीकरण व रुंदीकरण करून जलसंवर्धनाच्या कामांमध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केले. राजू शेट्टी बुलडाण्यात आले असता त्यांनी किन्होळा येथे भारतीय जैन संघटनेचे सहकार्य व लोकसहभागातून सुरू असलेल्या नदी खोलीकरण व रुंदीकरणाच्या कामाची पाहणी केली. किन्होळावासीयांनी या कामासाठी दिलेले योगदान व घेतलेला पुढाकार याबाबत त्यांचे कौतुक केले. या वेळी ‘स्वाभिमानी’चे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर, सरपंच सुमित्राताई बाहेकर, प्रभुकाका बाहेकर, संजूकाका बाहेकर, राणा चंदन, ग्रा. प. सदस्य वसंत जाधव, समाधान हिंगे, दीपक बाहेकर, शेख आरीफ, सचिन बाहेकर, अमोल बाहेकर, नंदू पाटील, केशव महाराज, विजू महाराज, मोतीराम जाधव यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते व गावकरी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com