agriculture news in marathi, Raju Shetty rises pomogranate issue in maharashtra | Agrowon

डाळिंबाच्या प्रश्‍नापासून सरकारने पळ काढू नये : राजू शेट्टी
सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 15 डिसेंबर 2017

निमगाव केतकी, जि. पुणे ः सरकारच्या योजनांमुळे डाळिंबाचे उत्पादन वाढले आहे. वाढलेल्या उत्पादनाला मार्केट उपलब्ध करून देण ही सरकारची जबाबदारी असताना सरकार जबाबदारी झटकून पळ काढत असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, खासदार राजू शेट्टी यांनी केला. 

निमगाव केतकी, जि. पुणे ः सरकारच्या योजनांमुळे डाळिंबाचे उत्पादन वाढले आहे. वाढलेल्या उत्पादनाला मार्केट उपलब्ध करून देण ही सरकारची जबाबदारी असताना सरकार जबाबदारी झटकून पळ काढत असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, खासदार राजू शेट्टी यांनी केला. 

मागील काही महिन्यांपासून उत्पादन खर्चही निघत नसल्याने डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांनी बागा तोडण्यास सुरवात केली आहे. या संदर्भात शेट्टी यांच्याशी चर्चा केली असता ते म्हणाले, की सरकारने सुरवातीला लागवडीला त्यानंतर ठिबक, शेततळ्यासाठी अनुदान दिले. फळपिकाचे उत्पादन वाढावे हा सरकारचा हेतू होता. शेतकऱ्यांनी निर्यातक्षम उत्पादन घेतले. केवळ उत्पादन वाढीला प्रोत्साहन देऊन न थांबता सरकारने वाढलेल्या उत्पादनाला मार्केट उपलब्ध करून देणे आवश्‍यक आहे. ती सरकारची जबाबदारी आहे. मात्र उत्पादनात वाढ झाली की सरकार मार्केट उपलब्ध करून देण्यासाठी काहीच प्रयत्न करीत नाही. 

डाळिंबाला जागतिकस्तरावर मोठी मागणी आहे. वर्षभर निर्यातीला अनुकूल धोरण सरकारने राबविले पाहिजे. परंतु तसे होत नाही. सरकारने निर्यातीला प्रोत्साहन दिले पाहिजे. डाळिंबात अनेक औषधी गुणधर्म आहेत. कॅन्सरसारख्या आजारावर देखील ते प्रभावी ठरते. त्याची सालही वाया जात नाही. विविध प्रक्रिया उद्योग उभा राहू शकतात. उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढत असताना प्रक्रिया उद्योग उभा राहणे गरजेचे आहे. मात्र तो कुठेच उभा राहत नाहीत. सरकारने यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन व भरीव मदत केली पाहिजे. परंतु याकडे सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप शेट्टी यांनी केला. 

वाढलेला खर्च व अत्यल्प भावामुळे हतबल झालेल्या इंदापूर तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी डाळिंब बागा काढण्यास सुरवात केल्याची बातमी 'सकाळ'मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर त्याची दखल आमदार दत्तात्रेय भरणे यांनी घेतली. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात डाळिंब उत्पादकांचा प्रश्‍न मांडू, असे त्यांनी सांगितले.

इतर ताज्या घडामोडी
बियांद्वारे मिळवता येतील भाताचे ‘क्लोन’ बियांद्वारे मिळवता येतील भाताचे ‘क्लोन’...
प्रथिनांद्वारे मिळवता येईल अधिक टिकाऊ...निसर्गातील कोळ्याच्या धाग्यापासून प्रेरणा घेत चीन...
ऊसतोडणी कामगारांच्या गावांत दुष्काळी...नगर ः जनावरे जगवण्यासाठी आणि रोजगाराच्या शोधात...
नामपूरात शेतमालाला दर, कर्जमाफीसाठी...नामपूर, जि. नाशिक : कांदा पिकासह शेतमालाचे...
वजनकाट्यात घोळ करणाऱ्यांनी लाज बाळगावीमाळेगाव, जि. पुणे ः ‘माळेगाव साखर कारखान्याचे...
कोल्हापूर जिल्ह्यास ३०० एकर तुती...कोल्हापूर : महारेशीम अभियानांतर्गत कोल्हापूर...
हमीभावाने साडेदहा हजार क्विंटल शेतीमाल...नांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांमध्ये...
पुणे बाजारात भाजीपाल्यांचे दर स्थिर;...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
केळी सल्लाकेळी पिकाची उत्तम वाढ व उत्पादनासाठी सरासरी किमान...
करडईवरील मावा किडीचे नियंत्रणकरडई हे रब्बी हंगामातील प्रमुख तेलबियापैकी...
रताळे उत्पादनवाढीसाठी ओडिशाचा...पेरू येथील आंतरराष्ट्रीय बटाटा केंद्राच्या...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात गीर, साहिवाल...पुणे : सिंधुदुर्ग जिल्ह्यात दुग्ध आणि कुक्कुट...
औरंगाबाद जिल्ह्यात ४६९७ क्‍विंटल...औरंगाबाद : हमीभावाअंतर्गत औरंगाबाद जिल्ह्यात मका...
मराठवाड्यातील ५६९ गाव-वाड्यांना टॅंकरऔरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीटंचाईचा सामना...
तुरीला ५००० पर्यंत दर, देशी वाणांना...जळगाव : खानदेशात तुरीची मळणी अनेक भागात सुरू झाली...
टँकरऐवजी पाइपलाइनने पाणीपुरवठा करा :...नागपूर : अपुऱ्या व अनियमित पावसामुळे जिल्ह्यातील...
दिल्लीतील व्यावसायिकांनी फळबागा...नगर : नगर जिल्ह्यामधील पाथर्डी तालुक्‍यातील तीव्र...
सातारा जिल्ह्यातील धरणांत अल्प साठासातारा : जिल्ह्यातील प्रमुख धरणांत गतवर्षीच्या...
नाशिक जिल्हा बँकेत खडखडाट तरी सचिवांना...नाशिक : एकीकडे सभासदांना पुरेशी रक्कम देण्यास...
कर्जमाफीची प्रक्रिया थंडावल्याने...सोलापूर : शेतमालाचे कोसळलेले दर, कर्जमाफी होऊनही...