agriculture news in Marathi, Raju Shetty says farmers in trouble due to cotton seed companies, Maharashtra | Agrowon

बियाणे कंपन्यांमुळे शेतकरी देशोधडीला ः शेट्टी
टीम अॅग्रोवन
शनिवार, 10 फेब्रुवारी 2018

अकोला ः कापूसउत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून सरकारने त्याला मदत दिली नाही. त्यामुळे विदर्भात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये वाढ होत आहेत. कापूस बियाणे उत्पादक कंपन्यामुळे शेतकरी देशोधडीला लागत असून शेतकऱ्यांना त्वरित आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी गुरुवारी (ता. ८) लोकसभेत केली.

अकोला ः कापूसउत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून सरकारने त्याला मदत दिली नाही. त्यामुळे विदर्भात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये वाढ होत आहेत. कापूस बियाणे उत्पादक कंपन्यामुळे शेतकरी देशोधडीला लागत असून शेतकऱ्यांना त्वरित आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी गुरुवारी (ता. ८) लोकसभेत केली.

 या वेळी खासदार शेट्टी म्हणाले, की कापूसउत्पादक शेतकरी बोंडअळी तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे मोठ्या संकटातून जात आहेत. बीटी उत्पादक कंपन्यांनी उत्पादन वाढेल असे सांगून सदर बियाणे शेतकऱ्यांना घेण्यास भाग पाडले. मात्र उत्पादन वाढले नाही. त्यातच बोंडअळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला. परिणामी, कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले. याचा विपरीत परिणाम शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर झाला आहे. विदर्भात शेतकरी आत्महत्या वाढत चाललेल्या आहेत. 

‘‘आमचा तंत्रज्ञानाला विरोध नाही; मात्र कंपन्यांनी ज्या पध्दतीने बीटी कापसाची जाहिरातबाजी केली होती त्या प्रमाणात उत्पादन निघत नाही. बियाणे बाजारात आणताना त्यांची तपासणी न करताच बाजारात आणली जातात. त्यामुळे बोगस बियाण्यांचा फटका देखील शेतकऱ्यांना सोसावा लागतो. कंपन्या मात्र हातवर करून मोकळे होतात. बियाणे तपासणी करूनच बाजारात आणले तर शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही. या कापूस बियाणे उत्पादक कंपन्यांमुळे महाराष्ट्रातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना कोट्यवधी रुपयांचा फटका बसलेला आहे. या शेतकऱ्यांना केंद्राने तातडीने मदत करावी,’’ अशी मागणी देखील खासदार शेट्टी यांनी केली. 

इतर अॅग्रो विशेष
‘उजनी’तील पाणीसाठा उणे पातळीत सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी...
राज्यभरात अन्नत्याग आंदोलनमुंबई ः शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रती...
मार्चनंतरही पणन करणार कापूस बाजारात...यवतमाळ ः शेतकऱ्यांच्या घरातील कापूस विकल्या...
मढी यात्रेला बुधवारपासून प्रारंभनगर ः होळीच्या दिवशी सकाळी कानिफनाथांच्या समाधीला...
दर्जेदार ऊसबेण्याची केली निर्मिती काशीळ (ता. जि. सातारा) येथील उच्चशिक्षित व...
मतदानासाठी सकाळी सात ते सायंकाळी...अकोला ः देशात होत असलेल्या लोकसभा...
कोकणातील आंबा अडकला धुक्याच्‍या फेऱ्यातवेंगुर्ले, जि. सिंधुदुर्ग : ऐन हंगामातच कोकणातील...
विदर्भात वादळी पावसाची शक्यतापुणे : मध्य भारतात होत असलेल्या वाऱ्यांच्या...
हळदीचे दिवसातून दोन वेळा सौदेसांगली ः सांगली बाजार समितीत गेल्या दोन ते...
पदविकाधारकांना कृषिसेवेचे दरवाजे बंद... पुणे : राज्याच्या शेतकरी कुटुंबातील हजारो...
सर्वसामान्यांचा असामान्य नेतामाजी संरक्षणमंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर...
सर्जनशीलतेला सलाम!व र्ष २०१७ च्या खरीप हंगामात कापसावर फवारणी...
प्राणघातक हृदयरोगाचे प्रमाण होतेय कमीगेल्या दोन वर्षामध्ये हृदयरोगाला प्रतिबंध आणि...
अन्नत्याग आंदोलनास प्रारंभ : अमर हबीब,...नवी दिल्ली : शेतकरी आत्महत्यांप्रती सहवेदना आणि...
मच्छीमारी व्यवसायाने आणली समृद्धीगणित विषयात पदवी असूनही बेरोजगार राहणं नशिबी आलं...
काबुली हरभऱ्याने उंचावले अर्थकारण चोपडा तालुक्‍यातील (जि. जळगाव) तापी व अनेर...
जत तालुक्यात द्राक्ष, डाळिंब बागा...सांगली : जत तालुक्यात पश्‍चिम भाग वगळता...
प्रकल्प व्यवस्थापकावर कारवाईचे आदेशपुणे : एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन...
सहवेदना :आज अन्नत्याग आंदोलनयवतमाळ: शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रति...
उन्हाची काहिली वाढलीपुणे: राज्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाची...