agriculture news in Marathi, Raju shetty says, fight with false things, Maharashtra | Agrowon

'दावणीलाही नाही आणि छावणीत नाही; जनावरे विकण्याची वेळ'
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 19 फेब्रुवारी 2019

सोलापूर :  मागील सरकारच्या काळात छावणीत भष्ट्राचार झाला. पण म्हणून आम्ही चारा दावणीला देण्याची मागणी केली. पण दावणीलाही नाही आणि छावणीत नाही. त्यामुळे जनावरे बाजारात विकण्याची वेळ आली.​ दुष्काळी तालुक्यात पाणी आणण्याच्या निवडणुकीत नुसत्या बाता मारल्या, आता पाणी आणतो म्हणाऱ्याला तुडवा, त्यानंतर त्यांनीच पाणी मागितले पाहिजे, अशा शब्दात खासदार राजू शेट्टी यांनी मंगळवेढ्यातील पाणी प्रश्नावर जोरदार हल्लाबोल केला. 

सोलापूर :  मागील सरकारच्या काळात छावणीत भष्ट्राचार झाला. पण म्हणून आम्ही चारा दावणीला देण्याची मागणी केली. पण दावणीलाही नाही आणि छावणीत नाही. त्यामुळे जनावरे बाजारात विकण्याची वेळ आली.​ दुष्काळी तालुक्यात पाणी आणण्याच्या निवडणुकीत नुसत्या बाता मारल्या, आता पाणी आणतो म्हणाऱ्याला तुडवा, त्यानंतर त्यांनीच पाणी मागितले पाहिजे, अशा शब्दात खासदार राजू शेट्टी यांनी मंगळवेढ्यातील पाणी प्रश्नावर जोरदार हल्लाबोल केला. 

मंगळवेढा तालुक्यातील हुन्नुर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने शेतकऱ्यांच्या प्रश्नावर दुष्काळी परिषदेचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी जिल्हाध्यक्ष समाधान फाटे, कार्याध्यक्ष विजय रणदिवे, विष्णू बागल, अ‍ॅड. राहुल घुले, नवनाथ माने, अमोल हिप्परगी, श्रीमंत केदार, अनिल बिराजदार, विजयकुमार पाटील, तात्या सावंत, मल्लिकार्जुन भांजे, विकास पुजारी, हणमंत यमगर, विठ्ठल कोळेकर, आबा खांडेकर, भाऊसो गरंडे, नामदेव मेडीदार आदी उपस्थित होते.
खासदार शेट्टी म्हणाले, कृष्णा खोऱ्यातील पाणी कर्नाटकात वाया जाते, हे पाणी अडवून या भागाला दिले.

दुष्काळी तीव्रता कमी होऊ शकेल पण, पाणी आले तर शेतकरी पुन्हा आपले ऐकणार कोण? म्हणून पाणी आणण्याची इच्छा होत नाही. साडे चार वर्षांच्या काळात शेतकऱ्याला आश्‍वासनाशिवाय काहीच मिळाले नाही. त्यांची आश्‍वासनाची भाषणे ऐकून आता कंटाळा आलाय. दुष्काळ जाहीर झाल्यापासून एकही उपाययोजना केल्या नाहीत. शासन दुष्काळग्रस्त विदयार्थ्याला परीक्षा शुल्क माफ केल्याचा दावा करत असून यापेक्षा वर्षाचे शैक्षणिक शुल्क माफ करायला पाहिजे. मागील सरकारच्या काळात छावणीत भष्ट्राचार झाला. पण म्हणून आम्ही चारा दावणीला देण्याची मागणी केली. पण दावणीलाही नाही आणि छावणीत नाही. त्यामुळे जनावरे बाजारात विकण्याची वेळ आली.

 बाजारात घेणाऱ्यांपेक्षा विकणाऱ्यांची संख्या जास्त असल्याने जनावरे कमी दरात सुद्धा कोण घ्यायला तयार होईना. गोवंश हत्या बंदी कायद्यामुळे जनावराचे काय करायचे हा प्रश्‍न निर्माण झाला. पंतप्रधान मोदी यांनी दौरा आणि जाहिरातीसाठी कोट्यवधी रुपये खर्च केले. पण या भागात पाणी आणण्यासाठी पैसे नसल्याचे कारण सांगून निधी देत नाहीत. 

प्रधानमंत्री फसल विमा योजनेतून अंबानी अदानी यांनी काढलेल्या विमा कंपन्यांच शेतकऱ्याला कर्जबाजारी करून गबरगंड करून ठेवल्या. त्यामुळे शेतकऱ्याला आता न्याय मिळवायचा असेल तर संघर्ष करण्याची तयारी ठेवावी लागेल. भाजपाला मदत केल्याचा पश्चात्ताप होतोय. अच्छे दिन, कर्जमाफी, दीड पट हमी भाव यांसारखे अमिषे दाखवून आणि विचित्र कायदे करून शेतकऱ्याला अडचणीत आणले, असा आरोपही त्यांनी या वेळी केला.

इतर अॅग्रो विशेष
नवसंकल्पना ठीक; पण... राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागातर्फे राज्यात ‘...
उत्पन्न दुपटीसाठी आत्ताही अपुरे उपाय दर्जेदार बियाणांची उपलब्धता  शेतकऱ्यांना...
सौर कृषिपंप योजनेतील लाभार्थी हिस्सा...मुंबई : मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेत...
कृषी विभागात बदल्यांची धूमपुणे  : राज्यात ऐन खरिपाच्या नियोजनात कृषी...
मका लागवड तंत्रज्ञानपेरणी     खरीप हंगाम ः १५...
पावसाचा प्रत्येक थेंब जिरवा ः...पुणे  ः पावसाच्या पाण्याचे विविध प्रयोगांनी...
मॉन्सून आज कोकणात?पुणे  : अरबी समुद्रात आलेल्या ‘वायू’...
ग्रामविकासाचा आदर्श झालेले वडगाव पांडे महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाच्या...
राज्यात डाळिंबाचा मृग बहर अडचणीतसांगली ः राज्यात डाळिंबाचे क्षेत्र एक लाख ३० हजार...
कोकणात पाऊस जोर धरणारपुणे  : मॉन्सूनच्या आगमनास पोषक स्थिती...
सिंधुदुर्ग जिल्हयात मुसळधार पाऊस (video...सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील काही भागात बुधवारी (ता....
मक्यावरील लष्करी अळीचे एकात्मिक नियंत्रणमहाराष्ट्रात फॉल आर्मी वर्म (स्पोडोप्टेरा...
राज्य अर्थसंकल्प : सर्वसमावेशक ‘निवडणूक...मुंबई : राज्यात मोसमी पाऊस लांबला असला तरी आगामी...
‘सबसरफेस ड्रीप’ तंत्राने  ऊस, टोमॅटोची...शेततळ्यातले जेमतेम पाणी आणि उपलब्ध पाण्याचा योग्य...
कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाजपुणे   : राज्यातील मॉन्सूनचे आगमन...
जुनीच वाट की नवी दिशाप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ...
कोरड्या महाराष्ट्रावर घोषणांचा पाऊसराज्यात सत्तेत आल्यानंतर शेतीतील गुंतवणूक वाढविली...
लोकसहभागातून नागरी पर्जन्यजल संधारण शक्यप्रत्येक जलस्रोताचे पुनर्भरण करून त्याचं बळकटीकरण...
बोंडअळी निर्मूलन प्रकल्पात आठ राज्यांचा...नागपूर : देशात सर्वात आधी गुजरात त्यानंतर...
लांबलेला पाऊस आणि नियोजनशून्य कारभारजूनचा पहिला पंधरवाडा उलटून गेला तरी राज्यात...