agriculture news in marathi, Raju Shetty says, old FRP base rate make continue, Maharashtra | Agrowon

‘एफआरपी'चा बदलेला बेस पूर्वीप्रमाणेच ठेवा ः राजू शेट्टी
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 2 ऑक्टोबर 2018

जयसिंगपूर, जि. कोल्हापूर : मोदी सरकारने ‘एफआरपी'चा बेस वाढवून ऊस उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. पूर्वीप्रमाणेच एफआरपीचा बेस ९.५० टक्‍के करा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, खासदार राजू शेट्टी यांनी केंद्रीय कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष विजयपाल शर्मा यांच्याकडे केली. खासदार शेट्टी यांनी दिल्ली येथे शर्मा यांची भेट घेऊन निवेदन दिले. 

जयसिंगपूर, जि. कोल्हापूर : मोदी सरकारने ‘एफआरपी'चा बेस वाढवून ऊस उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. पूर्वीप्रमाणेच एफआरपीचा बेस ९.५० टक्‍के करा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, खासदार राजू शेट्टी यांनी केंद्रीय कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष विजयपाल शर्मा यांच्याकडे केली. खासदार शेट्टी यांनी दिल्ली येथे शर्मा यांची भेट घेऊन निवेदन दिले. 

श्री. शेट्टी यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की केंद्र सरकारने यंदाच्या साखर हंगामातील उसाच्या ‘एफआरपी''चा बेस बदलून १० टक्के केला आहे. पूर्वी ‘एफआरपी''चा बेस ९.५० टक्‍के होता, तो दहा टक्‍के केला आहे. सध्या सरकारने दोन हजार ७५० रुपये प्रतिटन दहा टक्‍के रिकव्हरीस ‘एफआरपी'' जाहीर केली. याअगोदर ९.५० टक्‍के बेस होता. या बदलामुळे शेतकऱ्यांना प्रतिटन १४५ रुपयांचा फटका बसणार आहे. या निर्णयामुळे ऊस उत्पादकांचे १३ हजार ५०० कोटी रुपयांचे नुकसान होईल. हा निर्णय म्हणजे साखर कारखानादारांना पाठबळ देणारा आहे. महाराष्ट्रातील ऊस उत्पादकांना याचा सर्वाधिक फटका बसेल. 

देशातील इतर राज्यांतील उसाची रिकव्हरी पाहता, महाराष्ट्राची ११.५० टक्‍के रिकव्हरी आहे. १.५ टक्‍केच रक्कम शेतकऱ्यांच्या पदरात पडेल. एकीकडे उसाला आम्ही २०० रुपये दर दिला म्हणायचे आणि दुसरीकडे त्यांच्याकडूनच १४५ रुपयांची कपात करायची. सरकारच्या या धोरणामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सोसावे लागणार आहे. हा निर्णय कृषिमूल्य आयोगाने त्वरित मागे घ्यावा व पूर्वीप्रमाणे एफआरपीचा बेस ९.५० टक्‍के करावा, अन्यथा शेतकरी या निर्णयाविरुद्ध तीव्र आंदोलन करतील.

इतर अॅग्रो विशेष
असाही एक छुपा करनव्वदच्या दशकापासून राबवल्या जात असलेल्या आर्थिक...
शेततळे की गळके भांडेमा  गेल त्याला शेततळे योजनेची सांगड रोजगार हमी...
इक्रीसॅट पद्धतीतून वाढविले भुईमूग...सोहाळे (ता. आजरा, जि. कोल्हापूर) येथील प्रयोगशील...
गौरीनंदन ने ठेवले दर्जेदार, भेसळमुक्त...शनी शिंगणापूर (ता. नेवासा, जि. नगर) येथील...
नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी पाच दिवसांत...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...
गतवर्षी नष्ट झाल्या ४० टक्के मधमाशी...गेल्या वर्षी एप्रिल २०१८ ते एप्रिल २०१९ या...
तुरळक ठिकाणीच जोरदार पावसाची शक्यता पुणे : मध्य महाराष्ट्रात चक्राकार वाऱ्याची स्थिती...
एचटीबीटी बियाणे विक्रीप्रकरणी सहा अटकेतवणी, जि. यवतमाळ  : चंद्रपूर जिल्ह्यातील...
राज्यात मध्यम ते हलक्या सरी पुणे ः मॉन्सून दाखल झाल्यानंतर राज्याच्या...
मराठवाड्यात पिककर्जवाटप केवळ १३...औरंगाबाद : कर्जपुरवठ्याबाबत पुन्हा एकदा ...
‘एचटीबीटी’ लागवडप्रकरणी शेतकरी...अकोला ः जिल्ह्यात एचटीबीटी कापूस बियाणे लागवड...
नाशिक येथे आज पाणी व्यवस्थापन परिषदनाशिक: दर्जेदार पीक उत्पादनासाठी सुपीक जमिनीच्या...
मॉन्सूनने महाराष्ट्र व्यापलापुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...
उत्पन्नवाढीचे गणित चुकते कुठे?साधारणपणे एप्रिल महिन्याच्या आरंभास विविध...
पीकविम्याचे कवित्वप तप्रधान पीकविमा योजनेची देशपातळीवर अंमलबजावणी...
‘वैद्यकीय' प्रवेशास मराठा आरक्षण लागू...नवी दिल्ली : वैद्यकीय आणि दंतवैद्यकीयच्या...
राज्यात सर्वदूर पावसाची हजेरी पुणे : राज्यात मॉन्सून दाखल झाल्यानंतर सर्वदूर...
तीव्र दुष्काळाच्या प्रदेशात ११० एकरांवर...आटपाडी (जि. सांगली) येथील राजेश सातारकर यांची...
आठवडाभराच्या खंडानंतर पुन्हा चांगला...पुणे: राज्याच्या बहुतांशी भागात मॉन्सूनचे आगमन...
मालेगाव बाजार समितीत ‘इतर’च्या नावाखाली...नाशिक: मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ‘इतर...