agriculture news in Marathi, Raju shetty says, order of stay on sequestration of factories gave back, Maharashtra | Agrowon

कारखाने जप्ती आदेशावरील स्थगिती तत्काळ मागे घ्या : राजू शेट्टी
टीम अॅग्रोवन
सोमवार, 13 ऑगस्ट 2018

सातारा : राज्यातील पाच साखर कारखान्यांच्या जप्ती आदेशाला सहकारमंत्र्यांनी स्थगिती दिली आहे. ही स्थगिती आठ दिवसांत मागे घ्यावी, अन्यथा सहकारमंत्र्यांना घेराव घालून थकित एफआरपीचे पैसे वसूल करू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी येथे दिला. 

दरम्यान, सांगली, जळगाव महापालिकेतील लाटेचा परिणाम आगामी निवडणुकीत दिसणार नाही, त्यामुळे भाजपने हुरळून जाऊ नये, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

सातारा : राज्यातील पाच साखर कारखान्यांच्या जप्ती आदेशाला सहकारमंत्र्यांनी स्थगिती दिली आहे. ही स्थगिती आठ दिवसांत मागे घ्यावी, अन्यथा सहकारमंत्र्यांना घेराव घालून थकित एफआरपीचे पैसे वसूल करू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी येथे दिला. 

दरम्यान, सांगली, जळगाव महापालिकेतील लाटेचा परिणाम आगामी निवडणुकीत दिसणार नाही, त्यामुळे भाजपने हुरळून जाऊ नये, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

कोल्हापूरकडे जाताना शनिवारी (ता. ११) दुपारी खासदार राजू शेट्टी सातारा शासकीय विश्रामगृहात थांबले होते, या वेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. खासदार शेट्टी म्हणाले, की राज्यात भाजपविरोधात लाट निर्माण झाली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत परिवर्तन अटळ आहे. सांगली व जळगाव महानगरपालिका निवडणुकीत सत्ता मिळाली म्हणून भाजपने हुरळून जाण्याची गरज नाही. या निवडणुकीच्या निकालाचा आगामी निवडणुकीवर कोणताही परिणाम दिसणार नाही. 

‘‘ज्या साखर कारखान्यांनी थकित एफआरपीची रक्कम दिली नाही, अशा राज्यातील सहा कारखान्यांवर साखर आयुक्तांनी मालमत्ता जप्तीचे आदेश काढले. त्याला सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी स्थगिती दिली. त्यामुळे शेतकऱ्यांना आजपर्यंत थकित एफआरपी मिळू शकलेली नाही. एकूण ३४३ कोटींची थकबाकी असून १८६कोटी एकट्या सोलापूर जिल्ह्यातील कारखान्यांची आहे. त्यापैकी दहा कोटी सुभाष देशमुख यांच्या लोकमंगल कारखान्याची आहे. त्यामुळेच त्यांनी कारखान्यांवरील कारवाईबाबत धरसोडीचे धोरण अवलंबले आहे. सहकारमंत्र्यांनी येत्या आठ दिवसांत पाच कारखान्यांच्या जप्तीवरील स्थगिती उठविली नाही, तर तीव्र आंदोलन छेडले जाईल. प्रसंगी सहकारमंत्र्यांना घेराव घालून पैसे वसूल करू,’’ असा इशारा त्यांनी दिला.

इतर ताज्या घडामोडी
संघर्ष गोकुळ ‘मल्टिस्टेट’चाकोल्हापूर जिल्हा दूध संघ (गोकुळ) मल्टिस्टेट...
'दारुमुळे दरवर्षी अडीच लाखापेक्षा जास्त...नवी दिल्ली- दारूमुळे दरवर्षी जवळपास अडीच...
जालन्यात पाण्यात बुडून तिघांचा मृत्यूजालना : गणपती बाप्पांचे विसर्जन करताना जालना...
शिखर, रोहितने पाकला धुतले; भारत अंतिम...दुबई : पाकिस्तानने उभारलेल्या 237 धावांचा सहजी...
खानदेशात मध्यम पाऊस; नंदुरबारला हुलकावणीजळगाव : खानदेशात शुक्रवारी (ता.२१) मध्यरात्री व...
पुणे जिल्ह्यात ढगाळ हवामानपुणे  : जिल्ह्यात आठवड्याच्या सुरवातीला...
खानापूर घाटमाथ्यावर तीव्र पाणीटंचाई सांगली  : घाटमाथ्यावर पावसाने ओढ दिली आहे....
नगर जिल्ह्यात साडेसहा लाख हेक्‍टरवर...नगर  ः जिल्ह्यात रब्बी हंगामात सहा लाख ५२...
कौशल्यावर आधारित उपक्रम ‘रयत’मध्ये सुरू...सातारा  ः केवळ पुस्तकी नव्हे तर कौशल्यावर...
नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचा अकोला...अकोला  ः नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या...
सांगली जिल्ह्यात पाणीप्रश्‍न पेटण्याची...सांगली  : पावसाने दिलेली उघडीप आणि पावसाळा...
अकोला, बुलडाण्यात सर्वदूर पाऊसअकोला   ः वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा या...
सावधान... अल्झायमर आला उंबरठ्यावर ! कोल्हापूर : मंगळवार पेठेतल्या विठ्ठल मंदिरात रोज...
परभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ६०० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला...
भातावरील तुडतुडे प्रादुर्भावाकडे...सध्या खरीप हंगामातील भात पीक बहुतेक ठिकाणी...
कमी तीव्रतेच्या वणव्यांचाही मातीच्या...कमी तीव्रतेचे वणवे किंवा मर्यादित प्रमाणात...
ढगाळ वातावरणाने खानदेशात सोयाबीन मळणीला...जळगाव : खानदेशातील धुळे, नंदुरबार व जळगाव...
माळेगावकरांचा औद्योगिक वसाहतीच्या...नाशिक : माळेगाव औद्योगिक वसाहतीच्या टप्पा क्रमांक...
परभणीत व्यापाऱ्यांचे असहकार आंदोलन सुरूचपरभणी ः परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत...
सांगली जिल्ह्यात द्राक्ष क्षेत्रात वाढसांगली  ः दर्जेदार द्राक्ष उत्पादनासाठी...