agriculture news in marathi, Raju shetty says, will fight on cotton soybean issue, Maharashtra | Agrowon

कापूस, सोयाबीनच्या प्रश्नांवर लढू : शेट्टी
टीम अॅग्रोवन
बुधवार, 3 ऑक्टोबर 2018

बुलडाणा ः या हंगामात सोयाबीन, कापूस या दोन्ही पिकांना मोठा फटका बसला. सोयाबीन पावसाअभावी करपले. एकरी उत्पादन दोन तीन क्विंटलवर अाले. निसर्गाने मारले, सरकारनेही मारले. सध्या कुठल्याच शेतीमालाला भाव नाही. कर्जमाफीची प्रक्रिया सुरूच अाहे. पीककर्जासाठी शरीरसुखाची मागणी केली जाते. अाता शेतकऱ्याला लढाई करायची असेल, तर एकाच वेळी अनेकांना अंगावर घ्यावे लागणार अाहे. यासाठी १९ अाॅक्टोबरपासून विदर्भात चाकबंद अांदोलन सुरू केले जाईल, अशी घोषणा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी केली.

बुलडाणा ः या हंगामात सोयाबीन, कापूस या दोन्ही पिकांना मोठा फटका बसला. सोयाबीन पावसाअभावी करपले. एकरी उत्पादन दोन तीन क्विंटलवर अाले. निसर्गाने मारले, सरकारनेही मारले. सध्या कुठल्याच शेतीमालाला भाव नाही. कर्जमाफीची प्रक्रिया सुरूच अाहे. पीककर्जासाठी शरीरसुखाची मागणी केली जाते. अाता शेतकऱ्याला लढाई करायची असेल, तर एकाच वेळी अनेकांना अंगावर घ्यावे लागणार अाहे. यासाठी १९ अाॅक्टोबरपासून विदर्भात चाकबंद अांदोलन सुरू केले जाईल, अशी घोषणा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी केली.

‘स्वाभिमानी’च्या पुढाकाराने विदर्भात सहा अाॅक्टोबरपर्यंत वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये कापूस-सोयाबीन प्रश्नांवर खासदार शेट्टी व रविकांत तुपकर परिषदा घेणार अाहेत. यातील पहिली परिषद मंगळवारी (ता. २) बुलडाण्यात गर्दे वाचलनाच्या सभागृहात झाली. या वेळी जिल्ह्यातील हजारोंच्या संख्येने कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकरी उपस्थित होते. व्यासपीठावर स्वाभिमानीचे रविकांत तुपकर, सुबोध मोहिते, डॉ. प्रकाश पोफळे, रसिकाताई ढगे, अमोल हिप्परगे, रणजित बागल, दामोदर इंगोले, शर्मिलाताई येवले यांच्यासह संघटनेने पदाधिकारी उपस्थित होते.

खासदार शेट्टी म्हणाले, की या सरकारच्या काळात पीककर्जाची मागणी करणाऱ्या शेतकऱ्याच्या पत्नीला शरीरसुखाची मागणी केली जाते. मागणी करणारा हा अारोपी अधिकारी दोन दिवसांत जामिनावर सुटतो. तर दुधाचे अांदोलन करणारे १५ दिवस अात ठेवले जातात. सोयाबीन, कापूस उत्पादकांना ठोस मदत मिळणे अाज गरजेचे अाहे. पण सरकार पाठबळ देत नाही. पीकविमा कंपनीही तिजोरी भरण्याची यंत्रणा झाली अाहे. महात्मा गांधीच्या जयंतीदिनी अश्रुधूर, पाण्याचे फवारे न्याय मागण्यांवर उडविले गेले.

या वेळी तुपकर यांनी सरकारवर टीका करीत सोयाबीन, कापूस उत्पादकांचे हाल होत असल्याचे सांगितले. पाऊस नसतानाही अाणेवारी वाढवून काढण्यात अाली. अापल्या न्यायासाठी स्वतः लढावे लागेल असे सांगत स्वाभिमानी तुमच्या पाठिशी उभी राहत आहे. या वेळी सुबोध मोहिते, डॉ. पोफळे यांच्यासह इतरांनी घणाघाती भाषणे केली.     

इतर अॅग्रो विशेष
मराठवाड्यात रब्बीची केवळ १९ टक्‍केच...औरंगाबाद : मराठवाड्यात यंदा दुष्काळाची छाया किती...
केळीच्या आगारातून आखातात जाणार ४००...जळगाव ः केळीचे आगार असलेल्या जळगाव जिल्ह्यातून...
महाकॉट ब्रॅण्डची चमक पडली फिकीजळगाव ः पूर्व विदर्भ, उत्तर मराठवाडा व खानदेशातील...
शेतीला मिळाली पूरक उद्योगाची साथअंबाणी (जि. सातारा) येथील सौ. सुरेखा पांडुरंग...
दक्षिण कोकण, पश्‍चिम महाराष्ट्रात आज...पुणे : दक्षिण भारतामध्ये असलेल्या ‘गज’...
अभ्यास अन् नियोजनातून शेती देते समाधाननाशिक शहरातील प्रख्यात हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अनिरुद्ध...
‘सीसीआय’ची कापूस खरेदी मंगळवारपासून...जळगाव : कापूस खरेदीसंबंधी जिनिंगमध्ये केंद्र...
दुष्काळ, मराठा आरक्षण अधिवेशनात गाजणारमुंबई : उद्यापासून (ता. १९) मुंबईत सुरू होत...
शेतकऱ्यांच्या विधवांचे २१ला मुंबईत...मुंबई : देशभरात विविध शेतकऱ्यांचे मोर्चे...
बा सरकार, प्रश्न जगण्याचा आहे!‘‘ज रा कुठे दुष्काळ पडला, गारपीट झाली,  पूर...
विना `सहकार` नाही उद्धारग्रामीण आणि शहरी भागांचा संतुलित विकास साधत...
राज्यातील धरणांमध्ये ५५ टक्के पाणीसाठापुणे   : राज्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढू...
महाबळेश्र्वरमध्ये ३५०० एकरांवर...सातारा  ः महाबळेश्वरसह वाई, जावली, कोरेगाव...
दुष्काळात तीन श्रेणींत कामांचे नियोजन...पुणे : राज्यात आलेल्या दुष्काळात मदतीचा...
ओडिशात भाडोत्री ट्रॅक्टर योजनेस प्रारंभभुवनेश्‍वर ः राज्यातील शेतकऱ्यांना अद्ययावत...
सोयाबीन वधारण्याची चिन्हेपुणे: राज्यात सध्या सोयाबीनचे दर गडगडले असले...
राज्याच्या दक्षिण भागात पावसाची शक्यतापुणे : राज्यात थंडी वाढण्यास सुरुवात झाली आहे....
कापूस खरेदीला आजपासून प्रारंभनागपूर : पणन महासंघाव्दारे कापूस खरेदीला आजपासून...
चारा लागवडीसाठी शासकीय जमिनी देणारमुंबई : राज्यावरील दुष्काळाचे संकट लक्षात...
दुष्काळात २५ एकरांत शेवगा, रंगबिरंगी...मुंबई येथील ‘कोचिंग क्लास’चा व्यवसाय असलेले तपन...