शेतकऱ्यांनो, संघटित होऊन संघर्ष करा : राजू शेट्टी

शेतकऱ्यांनो, संघटित होऊन संघर्ष करा : राजू शेट्टी
शेतकऱ्यांनो, संघटित होऊन संघर्ष करा : राजू शेट्टी

आळेफाटा, जि. पुणे : ‘‘शेतकऱ्यांवर प्रत्येक वेळी अन्याय करण्याची सरकारची मानसिकता असेल तर शेतकऱ्यांनी संघटित होऊन संघर्ष केला पाहिजे,’’ असे प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी आळेफाटा (ता. जुन्नर) येथे केले.  आळेफाटा येथे तालुक्‍यातील सहकारी दूध संस्था व जुन्नर तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे, दूध दरवाढीसंबंधीचे आंदोलन यशस्वी करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिल्याबद्दल खासदार राजू शेट्टी यांच्या जाहीर सत्कार करण्यात आला. याप्रसंगी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पश्‍चिम विभाग अध्यक्ष प्रकाश बालवडकर, जुन्नरचे आमदार शरद सोनवणे, सभापती ॲड. संजय काळे, उपसभापती दिलीप डुंबरे, विघ्नहर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष भीमाजी गडगे, बाळासाहेब औटी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष रोहिदास कुटे, रमेश शिंदे, आळे दूध संस्थेचे ज्ञानेश्वर कुऱ्हाडे, राजुरीच्या गणेश दूध संस्थेचे अध्यक्ष गोविंद औटी, गोमाता दूध संस्थेचे अशोक गडगे, स्वाभिमानी पक्षाचे तालुका अध्यक्ष राम कुऱ्हाडे उपस्थित होते. या वेळी बोलताना खासदार राजू शेट्टी यांनी हे हिशेबात घोटाळा करून फसवणारे मुनीमजी सरकार असल्याची खरमरीत टीकाही केली. आमदार शरद सोनवणे यांनी राज्याच्या विधिमंडळात शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र कृषी बजेटची मागणी केलेली असल्याचे स्पष्ट केले.

यावेळी ॲड. संजय काळे, भीमाजी गडगे, प्रकाश बालवडकर, बाळासाहेब औटी, ज्ञानेश्वर कुऱ्हाडे आदींची भाषणे झाली. प्रास्ताविक रोहिदास कुंटे यांनी, सूत्रसंचालन गणेश वाघमारे यांनी केले. रमेश शिंदे यांनी आभार केले.

राज्याचे माजी गृहमंत्री आर. आर. पाटील व माझा कायम संघर्ष होता; पण त्यांनी कधीही शेतकरी चळवळ दाबण्याचा प्रयत्न केला नाही. कारण, त्यांना शेतकऱ्यांची जाणीव होती. - राजू शेट्टी, खासदार

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com