agriculture news in Marathi, raju shetty will meet central ministers for sugar issue, Maharashtra | Agrowon

साखर दरप्रश्‍नी राजू शेट्टी भेटणार केंद्रीय मंत्र्यांना
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 2 जानेवारी 2018

कोल्हापूर  : साखरेच्या घसरत्या किमतीबाबत खासदार राजू शेट्टी आज (मंगळवार) केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू व रामविलास पासवान यांची भेट घेणार आहेत.

देशात साखरेच्या खपात कोणत्याही प्रकारे कमी झालेली नसताना गत महिन्याभरात साखरेचे दर ५०० रुपये प्रतिक्विंटलने कमी झाले; मात्र किरकोळ बाजारातील साखर विक्रीचा दर एक रुपयादेखील कमी झालेला नाही, सोमवारीदेखील किरकोळ बाजारात ३८ रुपये प्रतिकिलो दराने साखर विक्री होत आहे. 

कोल्हापूर  : साखरेच्या घसरत्या किमतीबाबत खासदार राजू शेट्टी आज (मंगळवार) केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू व रामविलास पासवान यांची भेट घेणार आहेत.

देशात साखरेच्या खपात कोणत्याही प्रकारे कमी झालेली नसताना गत महिन्याभरात साखरेचे दर ५०० रुपये प्रतिक्विंटलने कमी झाले; मात्र किरकोळ बाजारातील साखर विक्रीचा दर एक रुपयादेखील कमी झालेला नाही, सोमवारीदेखील किरकोळ बाजारात ३८ रुपये प्रतिकिलो दराने साखर विक्री होत आहे. 

पुढील काही दिवसांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील साखर उद्योगाचे शिष्टमंडळ नवी दिल्ली येथे जाणार आहे. साखरेच्या घसरलेल्या किमतीचा थेट फटका ऊस उत्पादकांना बसत असल्याचे श्री. शेट्टी यांनी सांगितले. राज्यातील काही साखर कारखान्यांनी मूठभर बड्या साखर खरेदीदारांना हाताशी धरून मोठ्या प्रमाणात दर पाडत साखर विक्री केल्याने त्याचा फटका राज्यातील इतर साखर कारखान्यांना बसत आहे. कमी दराने मोठ्या प्रमाणात साखर खरेदी करणारे कोण याची चौकशी करण्याची मागणी शेट्टी यांनी केली आहे. 

दरवर्षी बड्या सट्टेबाजांमुळे लहान साखर खरेदीदारांची कोंडी केली जात असल्याची व्यथा काही साखर खरेदीदारांनी आपल्याकडे मांडल्याचे त्यांनी सांगितले. यंदा देशात गरजेइतकेच साखर उत्पादन होणार असताना साखरेच्या दरात थेट ५०० रुपये प्रतिक्विंटल घट कशी होते? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. साखरेचे दर कमी होतात; मात्र इतर वस्तूंचे दर कमी होत नाहीत. त्यामुळे ही एक प्रकारे शेतकऱ्यांची लूट असल्याने सरकारने त्वरित यात लक्ष घालत साखरेचे दर पडणाऱ्या टोळक्याचा बंदोबस्त करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

इतर ताज्या घडामोडी
ऊस गाळपात इंदापूर कारखान्याची आघाडी पुणे  : जिल्ह्यात सर्व १७ साखर कारखान्यांनी...
निवडणुकीमुळे चाराटंचाईकडे दुर्लक्ष;...पुणे  : निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना...
नाशिक जिल्ह्यात चारा छावण्यांसाठी...नाशिक  : जिल्ह्यातील टंचाईच्या झळा तीव्र होत...
सभा मोदींची; प्रशासनाने घेतली...नाशिक : लोकसभा उमेदवारांच्या प्रचारार्थ २२ एप्रिल...
नगर : पशुधन वाचविण्यासाठी इतर...नगर : जिल्ह्यात २८ लाख लहान-मोठे जनावरे आहेत....
सौर कृषिपंप योजना खोळंबलीजळगाव : सौर कृषिपंपासाठी खानदेशातून ८ हजार ९५०...
मराठवाड्यात पाणीपुरवठ्यासाठी २३५९ टँकरऔरंगाबाद : मराठवाड्यात दुष्काळामुळे होणारी...
नत्र ऱ्हास रोखण्यासोबत वाढवता येईल...शेतकरी आपल्या मक्याच्या उत्पादनांचा अंदाज...
खानदेशात पाणंद रस्त्यांची कामे ठप्पजळगाव : खानदेशात जानेवारीत मंजुरी मिळालेल्या,...
म्हैसाळची विस्तारित योजना पूर्ण करणार...जत, जि. सांगली : ‘‘जत तालुक्याच्या पूर्व भागाला...
पुणे विभागात रब्बी कांद्याचे ३६ लाख टन...पुणे   ः रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी...
गारपीट, वादळी पावसाने पुणे जिल्ह्याला...पुणे  : जिल्ह्याच्या उत्तर भागात असलेल्या...
जळगावात आले प्रतिक्विंटल २००० ते ६५००...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता...
अवकाळी पावसाने वऱ्हाडात दाणादाणअकोला   ः वऱ्हाडातील अनेक भागात...
नगर जिल्ह्यातील १२८ गावांत दूषित पाणीनगर  : ‘सर्वांना शुद्ध पाणी’ यासाठी सरकार...
आमच्या काळात एकही घोटाळा नाही :...सोलापूर : काँग्रेस आघाडी देशाला मजबूत करू...
सातारा जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी...सातारा : जिल्ह्यात मंगळवारी सकाळपासून ढगाळ...
बहुपयोगी नत्रयुक्त खत `कॅल्शिअम...सावकाश उपलब्ध होण्याच्या क्षमतेमुळे कॅल्शियम...
जल, मृद्‌संधारणासाठी पूर्वमशागत...जमिनीमध्ये चांगले पीक उत्पादन येण्याकरिता भौतिक,...
कृषी सल्ला : भुईमूग, आंबा पीक भुईमूग शेंगा अवस्था भुईमूग पीक आऱ्या...